AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता थेट टोकाचं युद्ध, इराणचं अमेरिकेला थेट खुलं आव्हान; येऊनच दाखवा… ट्रम्प यांना भरली धडकी!

Iran Challenge to USA : अमेरिकेची सर्वात प्रगत विमानवाहू नौका युएसएस जेराज्ड आर फोर्ड इराणजवळ तैणात करण्यात आली आहे. त्यानंतर आता इराणने अमेरिकेला खुलं आव्हान दिले आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

आता थेट टोकाचं युद्ध, इराणचं अमेरिकेला थेट खुलं आव्हान; येऊनच दाखवा... ट्रम्प यांना भरली धडकी!
Iran give Challange to USAImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 16, 2026 | 7:48 PM
Share

इराण-अमेरिकेतील युद्ध सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. यामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता हे युद्ध आणखी आक्रमक रूप घेणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेची सर्वात प्रगत विमानवाहू नौका युएसएस जेराज्ड आर फोर्ड इराणजवळ तैणात करण्यात आली आहे. यानंतर आता इराणच्या इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. यामुळे आता युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणचे ट्रम्प यांना खुलं आव्हान

IRGC चे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी प्रेस टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आतापर्यंत युद्धात वापरल्या गेलेल्या क्षेपणास्त्रांपैकी बहुतेक किमान 10 वर्षे जुनी आहेत. मागील वर्षी जूनमध्ये अमेरिका-इस्रायल संघर्षानंतर विकसित करण्यात आलेल्या नव्या शस्त्रसाठ्याचा अजून वापर केलेला नाही.’ पुढे बोलताना नैनी यांनी म्हटले की, हार्मुझच्या सामुद्रधुणीवर इराणचे पूर्ण नियंत्रण आहे. जर शत्रू आमची नौदल शक्ती नष्ट केल्याचा दावा करत असेल, तर त्यांनी आपली युद्धनौका फारसच्या आखातात आणून दाखवाव्यात असं आव्हान त्यांनी अमेरिकेला केले आहे.

अमेरिका आव्हान स्वीकारणार?

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे म्हटले होते की, इराणची सैन्यशक्ती मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे आणि त्यांचे नौदल आता प्रभावी राहिलेले नाही. मात्र आता नैनी यांनी ट्रम्प यांना थेट उत्तर देत फारसच्या आखातात युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता हे आव्हान अमेरिका स्वीकारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमेरिकेने इराणचे आव्हान स्वीकारल्यास भयंकर युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

होर्मुज सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक प्रभावित

युद्ध सुरू झाल्यानंतरहोर्मुज सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. हा मार्ग जगातील सुमारे 20 टक्के कच्च्या तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या संकटावर उपाय शोधण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सात देशांशी संपर्क साधून या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. मात्र यातील अनेक देशांनी युद्धनौका पाठवण्यास विरोध केला आहे. त्यामुळे या युद्धात आता अमेरिका एकटी पडल्याचे दिसत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल