AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात हाहाकार! आपल्याच लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश, शाहबाज शरीफच्या निर्णयाने संताप

सध्या पाक व्याप्त कश्मिरमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे. नागरिकांनी पाकिस्तानी सरकार विरोधात आवाज उठवला आहे. पण शहबाज शरीफ यांनी थेट टोकाचे पाऊल उचलत नागरिकांवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानात हाहाकार! आपल्याच लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश, शाहबाज शरीफच्या निर्णयाने संताप
PakistanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 29, 2025 | 4:29 PM
Share

पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारची दडपाशी सुरु असते आणि हे जगजाहीर आहे. या भागाला पाकिस्तानी सरकारने दहशतवाद्यांचे अड्डे बनवून ठेवले आहे, तसेच येथे राहणाऱ्या लोकांना कोणतीही सुविधा मिळत नाही. याच मुद्द्यावरुन पाक व्याप्त कश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांना सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याऐवजी गोळीबार केला आहे. नागरिकांवर होत असलेल्या गोळीबाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकव्याप्त कश्मीरमधील नागरिक त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे विनंती करत आहेत. हे लोक रस्त्यांवर उतरले आहेत. ते पाहून पाकिस्तानची सेना आणि सरकारने आपल्या लोकांवरच गोळ्या झाडायला सुरुवात केली आहे. सोमवारी या आंदोलनाला समोरे जाण्यासाठी पाकिस्तान सरकार योजना आखत होते. तीन हजाराहून अधिक सैनिक पाकव्याप्त कश्मिरमध्ये हजर झाले आहेत. तसेच रविवारी रात्रीपासूनच इंटरनेट बंद करण्यात आलं होतं, जेणेकरून जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाहीत. सरकारच्या या निर्णयाला देखील नागरिकांनी मोडीत काढले. अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना हाकलण्यासाठी पोलिसांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली आहे.

वाचा: धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा शॉर्ट सर्किटमुळे गुदमरून मृत्यू

विरोध करताच गोळ्या झाडल्या

पाकव्याप्त कश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या संघटनेने एएसीने आपल्या ३८-सूत्री मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्या मुख्य मागण्या पीओके विधानसभेतील १२ राखीव जागा रद्द करण्याचा समावेश आहे. या जागा पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या काश्मीरी शरणार्थींसाठी राखीव आहेत. स्थानिक लोकांचा युक्तिवाद आहे की, या जागा त्यांच्या प्रतिनिधित्वाला कमकुवत करतात आणि प्रादेशिक प्रशासनावर बाहेरील नियंत्रण वाढवतात. इतर प्रमुख मागण्या म्हणजे सबसिडी असलेले पीठ, मंगला डॅम जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित योग्य वीज दर आणि संघीय सरकारने वचन दिलेल्या प्रलंबित घटनात्मक सुधारणांचा तात्काळ अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे.

जेव्हा याच मागण्या घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले, तेव्हा तुम्ही पाहू शकता की त्यांना पोलिसांच्या क्रूरतेचा सामना करावा लागला. आता हे आंदोलन पाकिस्तानपुरता मर्यादित राहिलेले नाही. जगातील विविध देशांमध्ये राहणाऱ्या पीओके नागरिकांचानीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

शहबाज शरीफांची अपील

पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ एकीकडे नागरिकांवर गोळ्या झाडत आहेत, तर दुसरीकडे लंडनमध्ये बसून सरकारने आधीच ३८ पैकी ३६ मागण्या मान्य केल्या आहेत असे म्हणत आहे. तसेच पाकिस्तानात परतल्यानंतर तेथील नेत्यांशी भेट घेतील असेही म्हणत आहेत. माध्यमांशी बोलताना शहबाज शरीफ यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या भाऊ आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पूर्ण पाठिंबा आहे. शहबाज शरीफ यांनी दावा केला की आसिम मुनीर आणि ते मिळून निर्णय घेत आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.