दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीची मोठी घोषणा, जगभरातील..
सीजेपी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. त्यातच आता या आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत पोहोचणार आहे. ध्रुव राठी याने लंडनमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देत मोठे आवाहन केल्याचे बघायला मिळतंय.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. ध्रुव राठीने देखील या आंदोलनाला सपोर्ट केला. तो दिल्लीत दाखलही झाला. 10 ऑक्टोबरच्या आंदोलनानंतर ध्रुव राठी थेट लंडनला पोहोचला. 9 ऑक्टोबर रोजी जर्मनीहून ध्रुव राठी भारतात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला त्याच्या गुरूग्रामच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळात पोलिसांनी त्याला सोडले. त्यातच आता लंडनला पोहोचल्यानंतर ध्रुव राठीने मोठा इशारा दिला. ध्रुव राठीने आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, आता इंटरनॅशनल स्तरावर आवाज उठवण्याची वेळ आली. भारतात आल्यानंतर ध्रुव राठीच्या समस्येत मोठी वाढ झाली. पहिल्यांदा ध्रुव राठीवर आरोप करण्यात आला की, तो भारताचा नागरिक नाही.
त्यानंतर ध्रुव राठीने पासपोर्ट दाखवत स्पष्टीकरण दिले. 2018 च्या प्रकरणात कोर्टाने त्याला समन जारी केला. भारतात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ध्रुव राठी भारतात दाखल झाला पण त्याच्या समस्येत मोठी वाढ झाली. भारतातील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत पोहोचली आहे. भारतीय उच्चायोगाच्या समोर एनएसयूआयच्या समर्थकांनी आंदोलन केले.
त्यातच आता ध्रुव राठी पार्ल्यामेंट स्क्कायरमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ध्रुव राठी याच्याकडून करण्यात आले. त्यातच सीजेपीच्या महत्वाच्या नेत्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये पाठवले. विदेशात लढा उभारण्याचे काम ध्रुव राठीकडून केले जात आहे.
ध्रुव राठी याने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, फॉरेनमध्ये डंका वाजवायची वेळ आलेली आहे. ज्ञानेश यांनी देशा बरोबर गद्दारी केली आहे. लोकतंत्र्याचा गळा दाबला आहे. प्रोटेस्टरला डिटेन करत आहेत. जगभर राहणाऱ्या NRI यांनी एकत्र आले पाहिजे. आज मी लंडनमध्ये आहे, माझ्या गोष्टीची सहमत असाल तर लंडन पार्लमेंटच्या समोर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बारा वाजता भेटा.
