AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर नको तेच घडलं… ध्रुव राठीला सर्वात मोठा झटका, थेट घरी येऊन…

युट्यूबर ध्रुव राठीला मानहानी प्रकरणी दिल्लीच्या साकेत कोर्टाने समन बजावले आहे. गुरुग्राम येथील त्याच्या घराच्या मुख्य दारावर ही नोटीस लावण्यात आली आहे. भाजप आयटी सेलचे सदस्य विकास पांडे यांनी 2018 च्या एका व्हिडिओमुळे हा खटला दाखल केला आहे.

अखेर नको तेच घडलं... ध्रुव राठीला सर्वात मोठा झटका, थेट घरी येऊन...
Dhruv RatheeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 12:46 PM
Share

युट्यूबर ध्रुव राठी याच्या मागच्या अडचणीचा ससेमिरा सुटताना दिसत नाहीये. ध्रुवच्या विरोधात सुरू असलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणी दिल्लीच्या साकेत कोर्टाचं समन त्याच्या घराला चिपकवण्यात आलं आहे. गुरुग्राम येथील त्याच्या घराच्या मेन गेटवर हे समन चिपकवण्यात आलं आहे. ध्रुवचं घर सेक्टर 56च्या केंद्रीय विहार सोसायटीत आहे. भाजपच्या आयटी सेलचे सदस्य विकास सांस्कृत्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी ही केस दाखल केली आहे. या प्रकरणी आता 17 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

कोर्टाने तक्रारदाराला कोर्टाच्या स्टाफ सोबत जाऊन समन जारी करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर ही नोटीस ध्रुव राठीच्या घरावर चिपकवण्यात आली आहे. म्हणजे ध्रुवच्या हातात समन देण्याऐवजी त्याच्या घरावर चिपकवून कोर्टाची सूचना त्याच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

एक व्हिडीओ आणि असंख्य आरोप

हे संपूर्ण प्रकरण 2018मध्ये एक व्हिडीओ अपलोड करण्याच्या संदर्भातील आहे. ‘BJP IT Cell Part-2’ असं या व्हिडीओचं नाव आहे. या व्हिडीओतून भाजपची आयटी सेल आणि माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत, असा दावा विकास पांडे यांनी केला आहे. विकास पांडेंच्याद्वारे महावीर प्रसाद नावाच्या व्यक्तीला लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच ध्रुव राठीची बदनामी करण्यासाठी 50 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा आरोप या व्हिडीओतून करण्यात आला आहे. विकास पांडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. सर्व आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत. या आरोपांमुळे माझी वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाली आहे, असं पांडे यांनी म्हटलं होतं.

म्हणून अंमलबजावणी नाही

तक्रारदाराच्या मते, जुलै 2019मध्ये पहिल्यांदा समन जारी करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. ध्रुव राठी ऑस्ट्रेलियात राहत असल्याचं कारण देण्यात येत होतं आणि नोटीस स्वीकारली जात नव्हती. मात्र, आता तो भारतात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच तो दिल्लीच्या एनसीआरमध्ये असल्याचं कळलं आहे. त्यामुळे कोर्टाने हे समन जारी केलं आहे.

ध्रुव आंदोलनात जाणार?

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवण्याचं आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ध्रुव राठीही या आंदोलनात सामील होण्याची चर्चा आहे. अशावेळी ध्रुव राठीला समन बजावण्यात आलं आहे. आता 17 ऑक्टोबर रोजी काय सुनावणी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष