AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीजेपीला सलग दुसऱ्या दिवशी सर्वात मोठा दिलासा… आंदोलनापूर्वीच सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; व्यापारी हादरले

कॅनॉट प्लेसमधील कॉकरॉच जनता पार्टीच्या आंदोलनावर तात्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालय या प्रकरणावर विचार करत असल्याने सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप टाळला. यामुळे सीजेपीला मोठा दिलासा मिळाला असून, आंदोलनामुळे व्यवसायात अडथळा येण्याची भीती असलेल्या व्यापाऱ्यांच्या याचिकेला धक्का बसला आहे.

सीजेपीला सलग दुसऱ्या दिवशी सर्वात मोठा दिलासा... आंदोलनापूर्वीच सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; व्यापारी हादरले
Supreme CourtImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 12:22 PM
Share

दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्कमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचं लहरा दो तिरंगा हे आंदोलन होणार आहे. हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात व्यापाऱ्यांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण त्यावर तात्काळ सुनावणी करून आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाने सपशेल नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालय या प्रकरणाशी संबंधित याचिकेवर विचार करत आहे. त्यामुळे आम्ही त्यात सध्या तरी हस्तक्षेप करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा झटका बसला असून कॉकरोच जनता पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे.

दिल्लीतील व्यापाऱ्यांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं. ज्येष्ठ वकील जय अनंत देहाद्राई यांनी किराणा कमिटी ऑफ दिल्ली आणि दिल्ली आयरन अँड हार्डवेअर मर्चंट्स असोसिएशनच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. कॅनॉट प्लेसमधील आंदोलनामुळे व्यापाऱ्यांच्या कामकाजात बाधा येऊ शकते. सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकतं, अशी आशंका अजय अनंत यांनी वर्तवली होती.

हाच कमाईचा काळ असतो

यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने मत व्यक्त केलं आहे. आम्हाला आशा आहे की, सर्व लोक समजूतदारपणे काम करतील. सामान्य लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतील. या काळातील कमाईतून अनेक कुटुंबाची गुजराण होते. कोर्ट या छोट्या दुकानदाराच्या अडचणी समजू शकते, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

यावेळी जस्टीस जॉयमाल्या बागची यांनीही आपलं निरीक्षण नोंदवलं. एका पक्षाला आंदोलन करायचं आहे. दुसरे लोक शेंगदाणे विकून गुजराण करत आहेत, तर प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था राखायची आहे. या सर्व गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. जर धंद्यात नुकसान झालं तर कोर्ट आपल्या संवैधानिक अधिकाराचा वापर करू शकते. सध्या तरी पुढे काय परिस्थिती होते हे पाहावं लागेल, असं बागची यांनी स्पष्ट केलं.

200-250 कोटींचं रोजचं नुकसान

कॅनॉट प्लेसमध्ये होणाऱ्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या परिसरात रोज सुमारे 200 ते 250 कोटींचा व्यवसाय होत असतो. आंदोलनामुळे एवढं मोठं नुकसान होऊ शकतं. नवी दिल्ली महापालिकेने सेंट्रल पार्क बंद करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे, असं वकील जय अनंत देहाद्राई यांनी म्हटलंय.

कोर्टाचा नकार

यावर बागची यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. जर एखादी कारवाई चुकीची दिसली तर कोर्टाकडे संवैधानिक आणि भरपाईशी संबंधित अधिकाराच्या अंतर्गत पावलं उचलण्याचा अधिकार आहे, असं बागची म्हणाले. दिल्ली उच्च न्यायालय सध्या या प्रकरणातील विविध बाबींवर विचार करत आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यावर देहाद्राई यांनी हे प्रकरण वेगळं असल्याचं सांगत कोर्टाने त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यावर, हे प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीत आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. आता या प्रकरणावर 26 वा 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम