AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोकळ धमक्यांनंतर रशियाचे थेट अमेरिकेला उत्तर, भारताबद्दल केले महत्वाचे विधान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही म्हणत जगात खळबळ उडून दिली. शेवटी भारताने देखील यावर थेट भाष्य केले. आता रशिया देखील मैदानात उतरला आहे.

पोकळ धमक्यांनंतर रशियाचे थेट अमेरिकेला उत्तर, भारताबद्दल केले महत्वाचे विधान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या...
Donald Trump and Russia
| Updated on: Oct 16, 2025 | 2:26 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाकडून आयात होणाऱ्या कच्च्या तेलामुळे चिंतेत आहेत. त्यांनी मला वचन दिले की, भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली. भारताने स्पष्ट केले की, भारत बाजाराची स्थिती पाहून निर्णय घेतो आणि प्रत्येक निर्णय भारतीय नागरिकाच्या फायद्यासाठी घेतला जातो. अनेक देशांसोबत भारत करार देखील करतो. मात्र, भारताने कुठेच म्हटले नाही की, आम्ही रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहोत. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तोंडावर पडल्याचे बघायला मिळाले.

आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर रशिया देखील मैदानात उतरला. रशियाने थेट अमेरिकेला धमकी देत मोठे भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धक्कादायक विधानानंतर मॉस्कोने प्रतिक्रिया दिली. भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह म्हणाले की, भारताच्या अर्थव्यवस्थेला रशियन तेलाची नक्कीच आवश्यकता आहे. विशेष म्हणजे भारत आणि रशियाची एक विश्वासार्ह भागीदारी राहिली आहे.  भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी एक तृतीयांश आयात रशियाकडून केली जाते.

आम्ही भारतासाठी एक खूप चांगला पर्याय आहोत. रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी जगात स्थिरता आणणारी एक अत्यंत मोठी शक्ती म्हणून पाहिली जाते. मुळात म्हणजे हे नाते मजबूत स्थितीत उभे आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये आम्ही भारताचे मोठे भागीदार आहोत. अमेरिकेला इशारा देत त्यांनी म्हटले की, ग्लोबल नॉर्थ देश अजूनही शुल्क आणि काही निर्बंध लादत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय.

भारताने गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे. मात्र, याला काही कारण असल्याचे स्पष्ट सांगण्यात आलंय. भारताने इतर काही देशांसोबत बाजारस्थिती पाहून करार केली असल्याचे भारताने स्पष्ट केले. भारतासोबतच अमेरिकेने चीनवर देखील 100 टक्के टॅरिफ लावला आहे.

Follow Us
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...