डोनाल्ड ट्रम्प 1 नंबर खोटारडे, भारताने पाडले तोंडावर, थेट म्हटले, भारतीय ग्राहकांचे रक्षण हे…
डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या माध्यमातून जगात एकच खळबळ उडवली आहे. सतत विविध प्रकारे जगाला टॅरिफची भीती दाखवून धमकावताना दिसत आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात खळबळ उडवत मोठा दावा करत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला खात्रीशीरपणे सांगितले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर तेलाच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे बघायला मिळाले. आता भारताने यावर थेट भाष्य केले. भारत खरोखरच रशियाकडून तेल खरेदी बंद करणारा का? यावर जगाचे लक्ष होते. भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आणि म्हटले की, भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे ही नवी दिल्लीची पहिली प्राथमिकता आहे. भारत हा तेल आणि वायूचा एक महत्त्वाचा आयातदार आहे.
अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आमचे प्राधान्य राहिले आहे. आमची आयात धोरणे पूर्णपणे या उद्देशाने निर्देशित आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने अगदी म्हटले आहे. आम्ही कोणत्याही वेगळ्या कारणांमुळे निर्णय घेत नाही, असेही म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, आम्ही बाजाराची परिस्थिती पाहुण वेगवेगळ्या देशांसोबत करार करतो. विषय जर अमेरिकेचा असेल तर आम्ही मागील काही वर्षांपासून अमेरिकेकडूनही खरेदी केली.
ज्यावेळी अमेरिका किंवा इतर देश भारताने रशियाकडून तेल खरेदीबद्दल विधाने करत होते, त्यावेळीही भारताने स्पष्ट म्हटले होते की, तुम्ही भारतावर कोणतेही नियम लागू करू शकत नाहीत. भारताने हे देखील सांगितले की, युरोप सर्वात जास्त गॅसची खरेदी रशियाकडून कशी करतो. डोनाल्ड ट्रम्प यांना थेट उत्तर आता भारताकडून देण्यात आल्याचे स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
अमेरिकेचा भारतावर मोठा दबाव भारतावर आहे. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता अमेरिका प्रयत्न करत आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर रशिया भारतासाठी मैदानात उतरला. फक्त रशियाच नाही तर चीनने देखील मोठ्या प्रमाणात भारताची साथ दिल्याचे जगाने बघितले. भारताच्या तेल खरेदीबद्दल मोठा दावा करून डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा तोंडावर पडल्याचे बघायला मिळतंय.
