ट्रम्प यांचा डोक्यावरचा हात उठताच रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला, एकापाठोपाठ २७ मिसाईल डागल्या…

अमेरिकेने युक्रेनला पेट्रिएट मिसाईल इंटरसेप्टर तंत्रज्ञान देण्यास नकार दिला आहे. हे कळताच रशियाने युक्रेनवर सर्वात घातक हल्ला केला आहे. त्यानंतर युक्रेनने देखील काळ्या समुद्रात रशियाचे मोठे जहाज बुडवत बदला घेतला आहे.

ट्रम्प यांचा डोक्यावरचा हात उठताच रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला, एकापाठोपाठ २७ मिसाईल डागल्या...
Russia launched a massive attack on Ukraine
| Updated on: Aug 02, 2026 | 4:25 PM

Russia Attack On Ukraine: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला पेट्रिएट इंटरसेप्टर तंत्रज्ञान देण्यास आणि स्वत: विकसित करण्यासही बंदी घातली आहे. ट्रम्प यांनी युक्रेनला असे वाऱ्यावर सोडल्यानंतर रशियाने युक्रेनवर आतापर्यंतच्या सर्वात भीषण हल्ल्यापैकी एक मोठा केला आहे. रशियाने रात्रभर २७ बॅलिस्टिक मिसाईल डागल्या आहेत. मात्र, त्यातील केवल एक मिसाईल पाडण्यात युक्रेनला यश आले आहे. उर्वरित २६ मिसाईलन कीव सह अनेक शहरात मोठा उत्पात घडवला आहे. या हल्ल्यात युक्रेनचे किमान ९ नागरिक मृत्यू पावले आहेत तर ३० जखमी झाले आहेत. याला उत्तर म्हणून युक्रेन देखील काळा समुद्रात रशियाचे विशाल कंटेनर जहाज बुडवून टाकले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की देशात आता पेट्रीयट इंटरसेप्टर मिसाईलचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता रशिया सातत्याने बॅलेस्टिक मिसाईलने हल्ले करत चालला आहे. झेलेन्स्की यांना पश्चिम देशांना विनंती केली आहे की पेट्रिएट सिस्टीम गोदामात ठेवण्याच्या ऐवजी आम्हाला द्याव्यात कारण प्रत्येक इंटरसेप्टर लोकांचे प्राण वाचवू शकतो.

ट्रम्प यांच्या यू-टर्नने अडचणी वाढल्या

काही आठवड्याआधी नाटो शिखर परिषदेत ट्रम्प यांनी संकेत दिले होते की अमेरिका स्वत: युक्रेनला पेट्रिएट इंटरसेप्टर तयार करण्याची परवानगी देऊ शकतो. मात्र, आता कॅप डेव्हिड मध्ये झालेल्या बैठकी दरम्यान त्यांनी घुमजाव करत अति संवेदनशील तंत्रज्ञान देणे सोपे नाही आणि अमेरिकेला खूपच सावधानता बाळगावी लागणार आहे. ते हे म्हणाले की भविष्यात अशा तंत्रज्ञानाचा चुकीच्या वापराची शक्यता नाकारता येत नाही. ट्रम्प यांच्या या घुमजावानंतर लागलीच काही तासात रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे, राजधानी कीव्ह तसेच सूमी, खारकीव्ह आणि पोल्टावा भागाला टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यात एका २२ वर्षी पोलिस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.जो लोकांना वाचवत असताना अन्य एका मिसाईलच्या हल्ल्याचा बळी ठरला.

27 पैकी 1 मिसाईल रोखता आले

रशियाने एकूण २७ बॅलेस्टिक मिसाईल युक्रेनवर डागली. त्याती एकाच मिसाईलला रोखण्यास युक्रेनला यश आले. उर्वरित सर्व मिसाईलनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले. यावरुन हे स्पष्ट होते की युक्रेनची डिफेन्स सिस्टीम कमजोर झाली आहे. आणि पेट्रिएट इंटरसेप्टरच्या तुटवड्याने हे युद्ध अधिक प्राणघातक झाले आहे.

रशियाच्या या हल्ल्यानंतर काही तासात युक्रेनने काळा समुद्रात रशियाचा वचपा काढला. राष्ट्राध्यक्ष झेलेस्की यांनी दावा केला की युक्रेन सैन्याने रशियाच्या प्रतिबंधित कंटेनर जहाज यानिना (Yanina) याला टार्गेट करुन समुद्रात बुडवले आहे. सुमारे एक लाख टन क्षमतेचे हे जहाज रशियाच्या सप्लाय चैन आणि युद्ध संचलनासाठी महत्वाचे मानले जात होते. रशियाच्या युद्ध मशिनला जे जीवंत ठेवत आहे त्या सर्व लक्ष्यांना आता युक्रेन टार्गेट करत आहे असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. हा हल्ला युक्रेनने विकसित केलेल्या मिडिल स्ट्राईक शस्रास्राने केला आहे.

रशियाच्या जहाजावर युक्रेनचा हल्ला

‘कीव इंडिपेंडंट’ वृत्तपत्रातील बातमीनुसार, रशियाची सरकारी अणुऊर्जा कंपनी, रोसाटॉमनेही हे मान्य केले आहे की, युक्रेन नौदलाच्या दोन ड्रोन हल्ल्यानंतर काळ्या समुद्रात रशियन जहाज बुडाले आहे. हा हल्ला नोवोरोसिस्क बंदरापासून सुमारे १३० सागरी मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत झाला. रशियाने दावा केला की, जहाजावर केवळ गोठवलेले अन्न आणि बांधकाम साहित्यासारखा नागरी माल होता आणि या हल्ल्याचे वर्णन “समुद्री चाचेगिरी” असे केले. जहाजावरील सर्व १७ कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले, असेही रशियाने म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us