AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

५०० वर्षांपासून बंद होती राजाची कबर, उघडताच एकामागोमाग झाले १५ संशोधकांचे मृत्यू, आत काय होते?

पोलंडच्या एका राजाची ५०० वर्षे जुनी कबर उघडताच, एकामागून एक १५ शास्त्रज्ञांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरुवातीला लोकांना हा ममीचा शाप आहे असे वाटले. पण, मात्र, प्रयोगशाळेचा अहवाल आला, तेव्हा मृत्यूचे कारण काहीतरी वेगळेच निघाले...

५०० वर्षांपासून बंद होती राजाची कबर, उघडताच एकामागोमाग झाले १५ संशोधकांचे मृत्यू, आत काय होते?
polish king casimir iv jagiellon tomb
| Updated on: Aug 01, 2026 | 10:15 AM
Share

साल १९७३ मध्ये पोलंडच्या राष्ट्रीय माध्यमात एका बातमीने खळबळ उडाली होती. संशोधक आणि पुरातत्ववाद्यांच्या एका टीमने पोलंडच्या १५ व्या दशकातील महान राजा कॅसिमिर चतुर्थ जगियेलोन याच्या कबरीला उघडण्याची विशेष परवानगी मिळाली होती. या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. राजा कॅसिमिर याचे निधन १४९२ मध्ये झाले होते. आणि सुमारे ५०० वर्षांनी त्याच्या चिरकाल विश्रांती घेत असलेल्या स्थळाला उघडले जाणार होते. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे इतिहासातील रहस्याचा माग घेणाऱ्या संशोधकांना त्यांचे प्राण देण्याची किंमत यासाठी चुकवावी लागली होती.

लागोपाठ झाले संशोधकांचे मृत्यू

राजाचे थडगे उघडल्याच्या काही दिवसात आत प्रवेश करणाऱ्या १२ संशोधकांपैकी ४ संशोधकांचा संशयास्पदरित्या मृ्त्यू झाल्याने खळबळ उडाली. तर काही आठवड्यात मरणाऱ्यांची संख्या १० पर्यंत पोहचली. काही काळानंतर थडग्याच्या आत काम करणारे किंवा राजाच्या मृतदेहाचा शोधण्यात सहभागी एकूण १५ संशोधकांचा मृत्यू झाला.

या मृत्यूच्या रहस्यामागे इजिप्तच्या ममी सारखा शाप असावा किंवा एखादी अदृश्य शक्ती असावी असा समज पसरला. तसाच जसा १९२२ मध्ये राजा तुतनखामेन याची कब्र उघडणाऱ्या लॉर्ड कार्नारवॉन यांचा अचानक मृत्यू झाला होता.

शाप की आणखी काही ?

१५ संशोधकांनाच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वजणांना धक्का बसला होता. अखेर या मोहिमेवर काम करणाऱ्या १५ लोकांचा अचानक मृ्त्यू होण्यामागे खरंच शाप आहे की आणखी काही कारण याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर जे सत्य समोर आले ते धक्कादायक होते.

या राजाच्या कबरीत खोदकाम करायला जाणारे १५ लोक एकामागोमाग मरण पावल्याच्या घटनेचा शोध जेव्हा घेतला तेव्हा कळले की अनेक शतकांपासून पासून हे थडगे बंद असल्याने येथे एक विचित्र प्रकराच्या अति विषारी बुरशीने डेरा घातला होता.

१९७३ मध्ये जेव्हा हे थडगे उघडले तेव्हा हवेत बुरशीचे प्रमाण प्रचंड होते. चाचणीत आढळले की थडग्याच्या आत Aspergillus, Penicillium rubrum आणि Penicillium rugulosum सारखे घातक बुरशी ( फंगस ) खूपच जास्त प्रमाणात होती.

फुप्फुसात गेले ‘सायलंट किलर’

नॉर्मल स्थिती ही बुरशी केवळ एलर्जी किंवा हलका ताप आणते. मात्र, शेकडो वर्षे ही बंद जागी वाढल्याने श्वासातून संशोधकांच्या पोटात ती मोठ्या प्रमाणात शिरली आणि ती जीवघेणी ठरली. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय क्षीण होती त्यांच्या फुप्फुसात श्वासावाटे ही बुरशी गेली. त्यामुळे इन्फेक्शन वाढल्याने काही जण काही दिवसांनी तर काही जणांचा वर्षाने मृ्त्यू झाला होता.

साल २०१५ मध्ये प्रकाशित ‘जर्नल ऑफ द एअर एंड वेस्ट मॅनेजमेंट एसोसिएशन’ने प्रसिद्ध केलेल्या एका संशोधनाने याला दुजारा दिला आहे. या ऐतिहासिक प्राचीन कबरीतील बुरशीची पातळी मानवासाठी सुरक्षित मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जादा होती. त्यामुळे त्यानंतर आज कोणत्याही जुन्या कब्र किंवा थडग्यात प्रवेश करणाऱ्या विशेष मास्क आणि सुरक्षा उपकरणाची मदत दिली जाते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी