
युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला आता तब्बल चार वर्ष पूर्ण होतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेने या युद्धात अगोदर युक्रेनला मदत केली आणि आता हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी तयार आहे. मात्र, त्यांच्या काही अटी आहेत. सुरक्षेची हमी त्यांना हवी आहे. मात्र, त्या बदल्यात ते मोठी शस्त्र अमेरिकेला देत आहेत. अमेरिका युक्रेनची सुरक्षा हमी घ्यायला तयार असतानाच रशियाकडून थेट मोठा झटका देण्यात आला आहे. हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्काच म्हणाला लागणार आहे.
हेच नाही तर रशियाने स्पष्ट केले की, आम्हाला मध्यस्थी केल्याशिवाय कोणतीही सुरक्षा हमी मिळणार नाही. अमेरिकेमध्ये दोन्ही देशातील नेत्यांच्या बैठका होऊन हवाई हल्ले सुरूच आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची शांततेत चर्चा सुरू असताना रशियाने युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात रात्री ड्रोन हल्ले केली. युक्रेनने त्यांच्या एका वीज प्रकल्पावर ड्रोनने हल्ला केला होता आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने 21 ऑगस्ट रोजी ड्रोन हल्ला केल्याचे म्हटले.
युक्रेनच्या काही भागांमध्ये ही ड्रोन हल्ले करण्यात आलीत. रशिया आणिय युक्रेन यांच्यातील शांततेच्या चर्चेनंतर सहाव्या दिवशी ही हल्ले झाली आहेत. हेच नाही तर काही भागांमध्ये धमक्यांची आवाज ऐकून आली. यानंतर संपूर्ण युक्रेनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला. युक्रेनची राजधानी कीवमध्येही काही भागात रशियाचे ड्रोन बघायला मिळाली. पहाटे चार वाजता हा हल्ला रशियाकडून करण्यात आला.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटले की, पश्चिमी देशांनी युक्रेनला सुरक्षा हमी देण्यासाठी केलेल्या चर्चेत रशियाला सहभागी करून घेतले नाही तर सर्वकाही निरर्थेक जाणार हे स्पष्ट आहे. मला नक्कीच खात्री आहे की, पश्चिमी देशांना आणि त्यामध्येही अमेरिकेला माहिती आहे की, रशियाला सहभागी न करता सुरक्षा हमीबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा अजिबातच केली जाऊ शकत नाही. रशियाने या हल्ल्याच्या माध्यमातून थेट अमेरिकेलाच मोठा इशारा दिला आहे.