चीनबाबत धडकी भरवणारा अहवाल, भारत संकटात? अमेरिकेच्या रिपोर्टनंतर जगात खळबळ
भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफचा वाद चिघळलेला असतानाच आता चीनबद्दल एक धक्कादायक असा रिपोर्ट झालाय. या रिपोर्टने जगाला धडकी भरवली आहे. मुळात म्हणजे टॅरिफच्या वादात चीन आणि भारतातील संबंध चांगले होताना दिसत आहेत. दरम्यानच्या काळात काही करार देखील करण्यात आली.

अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेसचे कमांडर जनरल अँथनी कॉटन यांनी केलेल्या दाव्यानंतर जगाला मोठा धक्का बसलाय. त्यांनी चीनचा बुरखा फाडला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला 2027 पर्यंत तैवान ताब्यात घेण्यासाठी सज्ज राहण्याचे थेट निर्देश दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकीकडे भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफवरून मोठा वाद सुरू आहे. चीन भारतासोबत जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे मोठा गेम चीनचा आहे. चीन आपल्या अण्वस्त्रांचा साठा आणि क्षमता सतत वाढवत आहे, जे संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे.
ही शस्त्रे जमीन, हवा आणि थेट समुद्रातून डागता येतात. बीजिंग हे वारंवार सांगताना दिसत आहेत की, ‘नो फर्स्ट युज’ धोरण अबाधित ठेवले जाणार आहे. चीन कोणत्याही परिस्थितीत अगोदर अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. हेच नाही तर त्यांच्याकडून कोणत्याही अण्वस्त्र नसलेल्या देशाविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर अजिबात होणार नाही. हेच नाही तर चीनने त्यांच्या संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात काही दावे केले. चीनच्या अहवालानुसार, रणनीतीमध्ये हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अण्वस्त्रांचा पहिला वापर करणार असल्याचे स्पष्ट म्हटले.
हेच नाही तर त्यामुळे असेही म्हटले की, जर सैन्याचा पराभव होत असेल तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल. बुलेटिन ऑफ द अॅटोमिक सायंटिस्ट्सच्या मते, चीनकडे सध्याच्या परिस्थितीला 600 अण्वस्त्रे आहेत आणि ते 350 नवीन क्षेपणास्त्र सायलो आणि मोबाईल लाँचर बेस आहेत, ते सर्वांच्यासाठी धोक्याचे आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) कडे सुमारे 712 ग्राउंड मिसाईल लाँचर असल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
यासोबतच चीनकडून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाल कमी करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण दहशतवादाला कंटाळलो असून भारताकडून त्रास दिला जात असल्याचे पाकिस्तानने म्हटले. सध्याच्या परिस्थितीला चीनकडून अण्वस्त्रे वाढवली जात आहेत. दिवसेंदिवस त्याची संख्या ही वाढताना दिसत आहे. आता तर धक्कादायक असा रिपोर्ट पुढे आल्याचे बघायला मिळतंय. 2027 पर्यंत चीन कोणत्याही देशाला उद्धस्थ करू शकतो असेही सांगितले जातंय.
