
पुढच्या काही वर्षात इंडियन एअरफोर्स अजून बलशाली होईल.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रशियाकडून SU-57E फायटर जेट विकत घेण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. SU-57E हे पाचव्या पिढीच फायटर विमान आहे. फक्त विमान खरेदीपर्यंत ही चर्चा मर्यादीत नाहीय,तर देशांतर्गत विमानाची बांधणी आणि संयुक्त उत्पादनावरही विचारमंथन सुरु आहे.
भारताकडे पाचव्या पिढीच एकही फायटर जेट नाहीय.SU-57E ही कमतरता भरुन काढेल. या विमानाची ताकद म्हणजे हे फायटर जेट रशियाच अत्याधुनिक हायपरसोनिक मिसाइल 3M22 ज़िरकॉन वाहून नेण्यास सक्षम आहे. भारतासाठी ही कॉम्बो ऑफर ठरु शकते.
रोखण्याची एअर डिफेन्स सिस्टिमध्ये क्षमता नाही
हे मिसाइल मॅक 9 म्हणजे जवळपास 9,600 किमी/तास वेगाने उड्डाण करुन लक्ष्याच्या दिशेने जातं.सध्याच्या कुठल्याही एअर डिफेन्स सिस्टिममध्ये या मिसाइलला रोखण्याची क्षमता नाहीय तसच SU-57E हे भारत आणि रशियाने मिळून संयुक्तरित्या विकसित केलेलं ब्रह्मोस मिसाइलने हल्ला करण्यासही सक्षम आहे.
पाकिस्तान दहावेळा विचार करेल
भारत-रशियामध्ये हा विमान खरेदीचा करार झाला, तर भारताला चीनमध्ये खोलवर प्रहार करता येईल तसच पाकिस्तान भारतावर हवाई हल्ला करण्याआधी दहावेळा विचार करेल. ज़िरकॉन मिसाइलने सुसज्ज असलेल्या SU-57E मुळे इंडियन एअरफोर्सला जमीन आणि समुद्र दोन्ही ठिकाणच्या लक्ष्यावर निर्णायक प्रहार करता येईल.
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड साठी (HAL) हा करार आर्थिक आणि रणनितीक दोन्ही दृष्टीने फायद्याचा असेल. रशियाने भारत संपूर्ण टेक्नोलॉजी ट्रान्सफर, संयुक्त उत्पादन आणि भारतीय सिस्टिम्सचा समावेश करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
HAL ला काय फायदा होणार?
HAL ला पाचव्या पिढीची स्टेल्थ टेक्नोलॉजी आणि सुपरक्रूज़ क्षमता शिकण्याची संधी मिळेल.
नाशिक प्लांटमध्ये SU-57E च उत्पादन होऊ शकतं. तिथे आधीपासून SU-30MKI च निर्माण कार्य सुरु आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार,2030 पर्यंत ही विमानं थेट रशियावरुन भारतात येतील. बाकी विमानं HAL बनवेल.
यातून हजारो नोकऱ्यांची निर्मिती होईल. भारताला भविष्यात या विमानांच्या निर्यातीची सुद्धा संधी मिळू शकते.
SU-57E च्या स्थानिक उत्पादनामुळे F-35 च्या तुलनेत ही विमानं स्वस्त पडतील. याची देखभाल आणि अपग्रेडच काम HAL करेल. सध्या पाचव्या पिढीची फायटर विमान अमेरिका, चीन, रशिया आणि जपान या देशांकडेच आहेत. पाचव्या पिढीच्या फायटर विमानांचं वैशिष्ट्य म्हणजे ती रडारला सापडत नाहीत.