US vs Russia : वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेला अंगावर घेण्यासाठी रशियाने थेट यमराजच उतरवला, ताकद इतकी की…
US vs Russia : वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेने रशियन ऑइल टँकर जप्त केला आहे. या टँकरची सुटका करण्यासाठी व्लादीमीर पुतिन यांनी थेट यमराजच उतरवला आहे. हा यमराज कोण आहे? त्याची क्षमता काय आहे? अमेरिकेला सुद्धा या यमराजाला भिडण्याआधी दहावेळा विचार करावा लागेल.

रशिया आणि अमेरिकेमध्ये अणवस्त्र युद्ध सुरु होण्याचा धोका वाढला आहे. 2026 मध्ये दोन्ही महाशक्ती असलेले देश आपली अणवस्त्र आणि शस्त्र घेऊन एकमेकांच्या समोर आले आहेत. त्याआधी या दोन्ही सुपरपावर देशांमध्ये अणवस्त्रांवरुन मोठ्या प्रमाणात डायलॉगबाजी सुरु आहे. या डायलॉगबाजीमध्ये जगाला महाविनाशाचे संकेत दिसू लागले आहेत. आपल्याकडे जशी संसद आहे तसं रशियन स्टेट ड्यूमाच्या संरक्षण समितीचे पहिले डेप्युटी हेड आणि पुतिन यांचे निकटवर्तीय एलेक्सी जुरालेव यांनी अमेरिकेला जोरदार धमकी दिली आहे. “अमेरिकेवर टॉरपीडोने हल्ले करा. अमेरिकेवर अणूबॉम्ब टाका किंवा अटलांटिकमध्ये अमेरिकेच्या काही नौकांवर हल्ला करुन त्या बुडवून टाका” अमेरिकेने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, “संपूर्ण पश्चिमी गोलार्ध अमेरिकेचा भाग आहे. वेनेजुएलाला विरोधी शक्तींच ऑपरेटिंग हब बनू देणार नाही. वेनेजुएलाच तेल शत्रुंच्या ताब्यात जाऊ देणार नाही”
रशिया आणि अमेरिकेत सुरु असलेल्या या शाब्दीक वादाच्या केंद्रस्थानी वेनेजुएला आहे. अमेरिकेने वेनेजुएलाच्या राष्ट्रपतींच अपहरण करुन त्यांना बंधक बनवलं. वेनेजुएलातून रशिया अणि चीनला कच्चा तेलाचा पुरवठा होतो. वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेने रशियन तेल टँकर आपल्या ताब्यात घेतला आहे. या घटनेनंतर पुतिन यांचा पार हाय आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुठल्याही दिवशी संघर्ष अणवस्त्र वापरण्यापर्यंत जाऊन पोहोचेल, अशी स्थिती आहे. अटलांटिकमध्ये अमेरिकेपासून आपले तेल टँकर वाचवण्यासाठी वेनेजुएलाच्या समुद्रात पुतिन यांनी पाणबुडी, युद्धनौका पाठवल्या आहेत. हे सर्व रशियन नॉर्दर्न फ्लीटचा भाग आहे. जागतिक स्तरावर सर्वात जास्त चर्चा त्या पाणबुडीची होतेय, ज्याला यमराज म्हटलं होतं.
रेडियोएक्टिव सुनामी निर्माण करण्याची क्षमता
अटलांटिक सागराच्या पोटात रशियाने पाठवलेला यमराज सध्या गस्त घालतोय. BS-329 बेलगोरोद ही रशियन अणवस्त्र पाणबुडी आहे. जगातील ही सर्वात लांब आणि रहस्यमयी पाणबुडी आहे. यात 100 मेगाटन न्यूक्लियर पेलोड भरलेला आहे. जगातील ही एकमेव सुपर टॉरपीडो, अंडर वॉटर ड्रोन पोसायडन घेऊन जायला सक्षम आहे. या सबमरीनवरील शस्त्रांचा वापर करुन रशियाकडे 500 मीटर ऊंच रेडियोएक्टिव सुनामी निर्माण करण्याची क्षमता आहे.
अमेरिकेकडे सुद्धा असं शस्त्र नाहीय
अमेरिकेच्या किनारपट्टीवरील शहराला ही पाणबुडी क्षणार्धात कब्रस्तान बनवू शकते. या पाणबुडीच्या हल्ल्यामुळे जे रेडिएशन पसरेल त्यामुळे येणारी काही वर्ष माणसाला पाऊल ठेवणं कठीण होऊन बसेल. सध्या जगातील कुठल्याही देशाकडे या पाणबुडीला तोड नाहीय. अमेरिकेकडे सुद्धा असं शस्त्र नाहीय.
