AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine Crisis: ‘आम्ही आमच्या मातृभूमीच रक्षण करु आणि हे युद्धही जिंकू’, युक्रेनची गर्जना

गुरुवारी केलेल्या संबोधनात व्लादिमिर पुतिन (Vladimir putin) यांनी सैन्याला आक्रमणाचे आदेश दिले आहेत. पुतिन यांनी रशिया आणि युक्रेनच्या फौजांमध्ये संघर्ष अटळ असल्याचं म्हटलं आहे.

Russia Ukraine Crisis: 'आम्ही आमच्या मातृभूमीच रक्षण करु आणि हे युद्धही जिंकू', युक्रेनची गर्जना
| Updated on: Feb 24, 2022 | 11:46 AM
Share

नवी दिल्ली: रशियाने युक्रेनविरोधात युद्ध (Russia-Ukraine war) पुकारलं आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या कीव (Kyiv) आणि खारकीव या दोन शहरांवर रशियाने मिसाइल स्ट्राइक केला आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या दिशेने चाल करुन येत असताना, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. आम्ही आमच्या मातृभूमीच रक्षण करु आणि हे युद्ध जिंकू असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमिट्रो कुलेबा (Dmytro Kuleba) म्हणाले. गुरुवारी केलेल्या संबोधनात व्लादिमिर पुतिन यांनी सैन्याला आक्रमणाचे आदेश दिले आहेत. रशिया आणि युक्रेनच्या फौजांमध्ये संघर्ष अटळ असल्याचं  पुतिन यांनी म्हटलं आहे. त्यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खाली ठेवण्याचे आव्हान केलं आहे. युक्रेनची लष्करीशक्ती संपवणं हा लष्करी कारवाईमागे उद्देश असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे.

आता कृती करण्याची वेळ आली

युक्रेनवर लष्करी चाल करुन जातानाच व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेसह अन्य देशांना थेट इशारा दिला आहे. “आमच्या कारवाईत हस्तक्षेप केला, तर पाहिले नसतील असे परिणाम भोगावे लागतील”. “रशियाने पूर्ण क्षमतेने आक्रमण केलं आहे. युक्रेनच्या शांततामय शहरांवर हल्ला झाला आहे. युक्रेन स्वत:च रक्षण करेल व हे युद्ध जिंकेल. जगाने पुतिन यांना रोखलं पाहिजे. आता कृती करण्याची वेळ आली आहे” असं दिमिट्रो कुलेबा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. ते युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज सकाळी लष्करी कारवाईचे म्हणजे युद्धाचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या कीव आणि खारकीव या दोन शहरांवर रशियाने मिसाइल स्ट्राइक केला आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुगंस्क या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, तेव्हाचं पुतिन कुठल्याही क्षणी युद्ध पुकारू शकतात, हे स्पष्ट झालं होतं. पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर, आता युरोपसह जगावर त्याचे परिणाम होऊ शकतात.

Russia Ukraine Crisis Will defend and win says Ukraine after Russia declares war

Follow Us
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत