AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine Crisis: अमेरिकेने फक्त बोंबाबोब केली, पुतिन यांना रोखणं अशक्य, वाचा डिफेन्स एक्सपर्ट मारुफ रझा यांचं परखड विश्लेषण

"अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना पुतिन यांनी बनवलेला हा प्लान आहे, हे माहित होतं. हल्ला करणार म्हणून ओरडत होते. यांना माहित होतं, हल्ला करणार मग पुतिन यांचं सैन्य इतक्या सहजतेने युक्रेनमध्ये कसं काय घुसलं? यांनी फक्त आवाज केला पण प्रत्यक्ष जमिनीवर लढण्याची तयारी केली नाही"

Russia Ukraine Crisis: अमेरिकेने फक्त बोंबाबोब केली, पुतिन यांना रोखणं अशक्य, वाचा डिफेन्स एक्सपर्ट मारुफ रझा यांचं परखड विश्लेषण
| Updated on: Feb 24, 2022 | 11:11 AM
Share

नवी दिल्ली: मागच्या काही दिवसांपासून जी भिती व्यक्त केली जात होती, ती अखेर खरी ठरली आहे. रशियाने युक्रेनच्या काही शहरांवर हल्ला (russia ukraine war crisis) केल्याचं वृत्त आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज सकाळी लष्करी कारवाईचे म्हणजे युद्धाचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या कीव (Kyiv) आणि खारकीव या दोन शहरांवर रशियाने मिसाइल स्ट्राइक केला आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुगंस्क या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, तेव्हाचं पुतिन कुठल्याही क्षणी युद्ध पुकारू शकतात, हे स्पष्ट झालं होतं. पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर, आता पुढे काय घडू शकतं? युरोपवर, जगावर त्याचे काय परिणाम होतील, या बद्दल मारुफ रझा (Maroof Raza) यांनी आपल्या नजरेतून विश्लेषण केलं आहे. ते डिफेन्स एक्सपर्ट आहेत.

निर्बंध युद्ध रोखू शकत नाही “अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना पुतिन यांनी बनवलेला हा प्लान आहे, हे माहित होतं. हल्ला करणार म्हणून ओरडत होते. यांना माहित होतं, हल्ला करणार मग पुतिन यांचं सैन्य इतक्या सहजतेने युक्रेनमध्ये कसं काय घुसलं? यांनी फक्त आवाज केला पण प्रत्यक्ष जमिनीवर लढण्याची तयारी केली नाही. सैनिकांना हल्ल्याचं चॅलेंज दिलं जातं, तेव्हा ते समोरच्या शत्रूचा विचार करुन तयारी करतात. अमेरिकेने कितीही निर्बंध लावले तरी, युद्धासारखी गोष्ट सॅक्शन्स रोखू शकत नाही. निर्बंधांनी युद्ध रोखल्याची उदहारण इतिहासात तुम्हाला फार कमी सापडतील” असं मारुफ रझा म्हणाले. ते टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीवर बोलत होते.

हेल्मेटने युद्ध लढलं जात का? “इराणसारख्या छोट्या देशावर अमेरिका मागची काहीवर्ष कमी-अधिक प्रमाणात निर्बंध लावत आहे, पण म्हणून त्यांचा व्यापार थांबला का? असं सवाल रझा यांनी उपस्थित केला. या युद्धात व्लादिमिर पुतिन यांचं काही नुकसान नाहीय. त्यांच्याकडे तेल आणि नैसर्गिक गॅसची मोठी शक्ती आहे. चीनचं समर्थन आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना आता हा विचार करायचा आहे की, आता नव्याने सुरु होणाऱ्या शीत युद्धात ते पुतिन यांचा सामना कसा करणार. युरोपातील देशांना लढायची अजिबात इच्छा नाही. पुतिन यांनी पहिल्यांदा हल्ल्याचं आव्हान दिलं, तेव्हा जर्मनीने युक्रेनमध्ये हेल्मेट पाठवले. हेल्मेटने युद्ध लढलं जात का? असा प्रश्न मारुफ रझा यांनी उपस्थित केला.

तर रशिया सायबर हल्ले करेल “युरोपमध्ये लढण्याची इच्छा नाही हे पुतनि यांना माहिती आहे. नेटो आणि युरोपला ते जिंकू शकतील अशीच लढाई लढायची आहे. पुतिन गेल्या सातवर्षांपासून सांगत होते की, मला अखेरचं पाऊल उचलायला लावू नका. क्रिमिया वॉर्निंग शॉट होता. डोनेत्सक आणि लुगंस्क या प्रांतासाठी आठ लाख पासपोर्ट इश्यू केले होते. तिथल्या शाळांमध्ये रशियन भाषा शिकवली जात होती. इतक्या दिवसांपासून हल्ला होणार बोलत होता. तुम्ही हल्ला रोखण्यासाठी काय केलं? रशियन सैन्यासमोर युक्रेन टीकू शकणार नाही. युरोपमध्ये रशियाशी लढण्याची क्षमता नाही. तुम्ही निर्बंध वाढवले, तर रशिया सायबर हल्ले करेल. तुमचे व्यवहार थांबतील. हे नवीन हायब्रीड वॉर आहे. युरोपसाठी हा एक मोठा धडा आहे. पैशाने तुम्ही स्वत:च रक्षण करु शकत नाही. अमेरिका आणि नेटो मिळूनही पुतिन यांच्या सैन्याचा सहज सामना करु शकत नाही” असे मारुफ रझा म्हणाले.

russia ukraine war crisis russia starts military operation in ukraine defence Expert Maroof Raza Analysis on war

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.