Russia-Ukraine war | युद्धात पुतिन यांच्या प्रतिष्ठेला धक्का, युक्रेनने बुडवली रशियाची शक्तीशाली युद्धनौका, Video

Russia-Ukraine war | रशिया आणि युक्रेनमध्ये 2022 पासून युद्ध सुरु आहे. मागच्या दीड ते पावणेदोन वर्षात या युद्धात दोन्ही बाजूंच्या हजारो सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत. पण अजूनही हे युद्ध थांबलेलं नाहीय.

Russia-Ukraine war | युद्धात पुतिन यांच्या प्रतिष्ठेला  धक्का, युक्रेनने बुडवली रशियाची शक्तीशाली युद्धनौका, Video
Russia-Ukraine war Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 8:24 AM

Russia-Ukraine war | रशिया-युक्रेन युद्धाला पुढच्या काही दिवसात दोन वर्ष पूर्ण होतील. पण अजूनही हे युद्ध संपलेल नाहीय. रशिया काही दिवसात युक्रेनवर विजय मिळवेल हा तज्ज्ञांचा अंदाज पूर्णपणे चुकला. अमेरिका आणि नाटो देशांकडून मिळणाऱ्या मदतीच्या आधारावर युक्रेन अजूनही हे युद्ध लढत आहे. या युद्धात आजही रशिया सरस आहे, या बद्दल दुमत नाही. कारण युक्रेनचा बराच मोठा भूभाग रशियाने जिंकला आहे. रशियाची बाजू वरचढ असतानाच आता त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणारी एक गोष्ट घडली आहे. रशियाची एक युद्धनौका युक्रेनने नष्ट केली आहे. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियाजवळ एका स्पेशल मिशनमध्ये रशियन युद्धनौका बुडवण्यात आली. युक्रेनने ब्लॅक सी मध्ये हे ऑपरेशन केलं. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात कथित रशियन वॉरशिप बुडताना दिसत आहे. युक्रेनने दिलेली ही जखम एक प्रकारे रशियाच्या प्रतिष्ठेला धक्का आहे.

युक्रेन सैन्याच्या एका स्पेशल युनिटने मिसाइल कार्वेट इवानोवेट्स नष्ट केलीय, असं युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे. यूक्रेनच्या स्पेशल युनिट ग्रुपच्या 13 सैनिकांनी ब्लॅक सी मध्ये तैनात असलेल्या रशियाच्या ताफ्यातील मिसाइल कार्वेट इवानोवेट्सला नष्ट केलं. 6 ते 7 कोटी डॉलर या युद्धनौकेची किंमत होती. युक्रेनने व्हिडिओ पोस्ट करुन जबाबदारी स्वीकारली आहे.

कुठे झाला हल्ला?

युक्रेन संरक्षण मंत्रालयाच्या गोपनीय विभागाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर यशस्वी ऑपरेशनची माहिती दिलीय. हे ऑपरेशन युक्रेनच डिजिटल परिवर्तन मंत्रालय आणि यूनायटेड 24 प्लेटफॉर्मच्या सहकार्यामुळे शक्य झालं. मिळालेल्या माहितीनुसार, रशियन युद्धनौका क्रिमिया जवळच्या डोनुजलाव भागात काळ्या सागरात गस्तीवर होती. तिथे हा हल्ला करुन रशियन युद्धनौका बुडवण्यात आली.

युक्रेनची लढण्यामागची ताकद काय?

रशिया आणि युक्रेनमध्ये 2022 पासून युद्ध सुरु आहे. मागच्या दीड ते पावणेदोन वर्षात या युद्धात दोन्ही बाजूंच्या हजारो सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत. रशियाने युक्रेनच्या काही भागांवर ताबा मिळवला आहे. युद्धा दरम्यान युक्रेनला अमेरिका आणि नाटो देशांकडून युद्ध साहित्य आणि आर्थिक मदत मिळतेयय

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.