
मागच्या महिन्यात भारतात अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात झाला होता. एअर इंडियाच विमान कोसळून 270 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या भागातून विमान अपघाताच्या बातम्या सतत सुरुच आहेत. आता रशियामध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. रशियाच्या अमूर भागात अंगारा एअरलाइन्सच एक विमान कोसळलं. यात 49 प्रवासी होते. रशियन सैन्याला विमानाचा ढिगारा मिळाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. काही तासांपूर्वी हे विमान रडारवरुन गायब झालं होतं. प्लेन क्रॅशमध्ये सर्व 49 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती आहे. तास या वृत्तसंस्थेनुसार एन-24 कोडने संचलित होणाऱ्या या विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी होते. 6 चालक दलाचे सदस्य सुद्धा विमानात होते.
अंगारा एअरलाइन्सच हे विमान AN-24 मध्ये दोन महिन्यांपूर्वी रनवेवर आग लागली होती. विमान किरेन्स्कमध्ये लँड करत असताना त्याचं नाक तुटलं होतं. त्यामुळे विमानात आग भडकलेली. त्यावेळी कोणती जिवीतहानी झाली नव्हती. जुलै 2023 मध्येच AN-24 सीरीजच एक विमान कोसळलं होतं. विमानात त्यावेळी 37 प्रवासी होते.
देशांतर्गत हवाई सेवा देणारी महत्त्वाची कंपनी
अंगारा एअरलाइन्स ईस्टलँड समूहाचा भाग आहे. त्यांची स्थापना वर्ष 2000 मध्ये झालेली. रशिया आणि सायबेरियात देशांतर्गत हवाई सेवा देणारी ही प्रमुख कंपनी आहे. अंगारा देशांतर्गत उड्डाणासह चार्टर विमान उड्डाण सुद्धा संचलित करते.
कंपनीकडे किती विमानं?
अंगारा एअरलाइन्सच्या विमानांची इरकुत्स्क विमानतळ (हँगर कॉम्प्लेक्स, पार्किंग, ग्राउंड स्टाफ आदी) येथे देखभाल होते. ग्राऊंड हँडलिंगमध्ये तो सर्वात मोठा आधार आहे. कंपनीनुसार त्यांच्या ताफ्यात 32 विमानं आहेत. यात पाच एएन-148, सात एएन-24, तीन एएन-26-100, दोन एएन-2 आणि 11 एमआय-8 हेलीकॉप्टर आहेत.
दोन दिवसांपूर्वी बांग्लादेशात अपघात
दोन दिवसांपूर्वी बांगलादेशातही एक विमान अपघात झाला होता. एका शाळेच्या परिसरात एक F-7 BGI हे लष्करी विमान कोसळले होते. या अपघातात 17 मुलांसह किमान 31 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृतदेह जळाल्याने मृतांची ओळख पटवणे कठीण बनले होते.
इटलीतही कोसळलं विमान
इटलीत एक विमान कोसळलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हायवेवरून अनेक वाहने जाताना दिसत आहेत. यात मोठ्या वाहनांचा आणि कारचाही समावेश आहे. अशाचत एक छोटे विमान रस्त्यावर कोसळल्याचे दिसत आहे.