AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोव्यात आमचाच मुख्यमंत्री होणार, आम्ही…, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठं विधान केलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार आहोत, तसेच मुख्यमंत्री देखील आमचाच होईल असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

गोव्यात आमचाच मुख्यमंत्री होणार, आम्ही..., शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Gajanan KirtikarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 3:49 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठं विधान केलं आहे. 2027  मध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने गोवा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आम्ही फक्त ही निवडणूक लढवणारच नाही तर मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, गोव्यामध्ये बाहेरचे लोक सत्ता गाजवायला लागले आहेत. गोव्याच्या लोकांना नोकरी मिळत नाही, त्यांच्यावर अन्याय चालू आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. गजानन कीर्तिकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.

नेमकं काय म्हणाले गजानन कीर्तिकर? 

गोव्यामध्ये येत्या 2027  मध्ये निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठं विधान केलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन गोव्यात शिवसेना स्थापन झाली आहे. त्याला आता एक वर्ष झालं आहे.  2027 मध्ये शिवसेना पूर्ण ताकतीने गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे, इथे आम्ही मुख्यमंत्री देखील शिवसेनेचाच बनवणार आहोत, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. मात्र अजून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला नाही, येत्या काळात त्याबद्दल स्पष्ट होईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

गोव्यामध्ये बाहेरचे लोक सत्ता गाजवायला लागले आहेत. गोव्याच्या लोकांना नोकरी मिळत नाही, त्यांच्यावर अन्याय चालू आहे, असा आरोप देखील यावेळी गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. गजानन कीर्तिकरांचं हे विधान म्हणजे शिवसेना शिंदे गट गोवा विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संकेत मानले जात आहेत? त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत गोव्यात शिवसेना शिंदे गटाला किती यश मिळणार? मुख्यमंत्री कोणाचा होणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान सध्या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. यावर देखील कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युद्धामुळे जगभरात मोठा तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे जगभरातील जे व्यापारी लोक आहेत, ते भाववाढ करत असल्याचं कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले