AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Dombivli News : दुर्घटना, दहशत, निष्काळजीपणा आणि ड्रग्सविरोधी कारवाई; ठाणे-कल्याण-नवी मुंबईतील मोठ्या बातम्या

ठाणे परिसरात विविध गंभीर घटनांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे. भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेचा तपास, डोंबिवलीतील घरफोडीच्या वाढत्या घटना, कल्याण पूर्वेतील नालेसफाईचा बोजवारा आणि नवी मुंबईतील अंमली पदार्थ जप्ती कारवाई या प्रमुख घडामोडी आहेत. बेकायदेशीर बांधकामे, वाढती गुन्हेगारी आणि नागरिक सुविधांमधील त्रुटी हे सध्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

Kalyan Dombivli News : दुर्घटना, दहशत, निष्काळजीपणा आणि ड्रग्सविरोधी कारवाई; ठाणे-कल्याण-नवी मुंबईतील मोठ्या बातम्या
ठाणे- कल्या- डोंबिवलीतील महत्वाच्या बातम्या
| Updated on: Aug 03, 2026 | 9:02 AM
Share

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरात विविध गंभीर घटनांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे. भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेचा तपास वेगाने सुरू असून, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मात्र इतर दोन आरोपी अजूनही फरार आहेत. दुसरीकडे घरफोडीच्या घटनांनी डोंबिवलीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तर कल्याण पूर्वेत नालेसफाईच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण झाले असून, नवी मुंबई गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

भिवंडी दुर्घटनेप्रकरणी 1 अटकेत, दोघे फरार

भिवंडीतील भंडारी कंपाऊंड परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंटचा एक भाग ३० जुलैच्या रात्री नूतनीकरणाच्या कामादरम्यान कोसळून १० जणांचा मृत्यू, तर ३ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीत राहणारा आणि बिल्डरचा केअरटेकर म्हणून काम पाहणारा अमृतलाल निपत याला अटक केली असून त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इमारतीचा मालक बिलाल अब्दुलकर खान आणि त्याचा साथीदार दानिश एजाज शेख हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेनंतर शहरातील बेकायदेशीर बांधकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता बेकायदेशीर घोषित करण्यात आलेली इमारत लोकांनी आपल्या आयुष्यभराची बचत खर्च करून खरेदी केली होती. फ्लॅट्सची नोंदणी झाली होती, मालमत्ता कर वसूल करण्यात आला होता आणि महानगरपालिकेने घरांचे क्रमांकही दिले होते. परिणामी, लोक इमारतीच्या बेकायदेशीरपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

अपघातानंतर, भिवंडी महानगरपालिकेने नुकसान झालेल्या कोहिनूर अपार्टमेंट्स इमारतीच्या पाडकामाची प्रक्रिया सुरू केली. मात्र, घटनास्थळी आलेल्या बाधित रहिवाशांनी याचा विरोध केला. त्यांनी पुनर्वसन, सुरक्षित निवारा आणि त्यांच्या सामानाची ने-आण करण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. पर्यायी व्यवस्था न करता इमारत पाडणे योग्य नाही, असे रहिवाशांनी सांगितले. विरोधानंतर महानगरपालिकेने त्यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाईचे आश्वासन दिले आहे.

डोंबिवलीत मास्कधारी चोरट्यांची दहशत !

दरम्यान, डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात काळे कपडे, टोपी आणि मास्क घालून आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी समर्थ कृपा इमारतीतील एका घराचा दरवाजा तोडून घरफोडी केली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याआधी त्यांचे चेहरे आणि हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या. सलग घरफोडीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅक्स भरूनही घाणीतून प्रवास! कल्याण पूर्वेत नालेसफाईचा बोजवारा; चिखल-गाळामुळे नागरिक हैराण

तर कल्याण पूर्वेतील सूचक नाका, चक्की नाका आणि लोकग्राम परिसरात अपूर्ण नालेसफाईमुळे रस्त्यांवर चिखल, गाळ आणि दूषित पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरातील शाळांमधील शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना दररोज दुर्गंधीयुक्त चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत असून, वेळेवर कर भरूनही मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नवी मुंबईत लाखोंचे अमली पदार्थ जप्त

याचदरम्यान, “ड्रग्समुक्त शैक्षणिक परिसर” अभियानांतर्गत नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-1 ने ऐरोली येथे मोठी कारवाई करत 41 लाख 60 हजार रुपयांचे हॅश ऑईल आणि हायड्रो गांजा जप्त केला आहे. क्रिकेट ग्राउंड, शनी मंदिर रोड, सेक्टर-20 येथे संशयितरित्या फिरणाऱ्या रोहित प्रदीप मुठे (वय 26) याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून 338 ग्रॅम हॅश ऑईल आणि 78 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. एफएसएल पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करून आरोपीवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रबाळे पोलीस करत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी