AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सनई चौघडे’ मालिकेत खलनायिका म्हणून लोकप्रिय अभिनेत्रीची निवड

झी मराठी वाहिनीवर 'सनई चौघडे' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत खलनायिका म्हणून लोकप्रिय अभिनेत्रीची निवड झाली आहे. वयाच्या 44 व्या वर्षी ही अभिनेत्री आईची भूमिका साकारली आहे.

'सनई चौघडे' मालिकेत खलनायिका म्हणून लोकप्रिय अभिनेत्रीची निवड
मराठी अभिनेत्रीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 15, 2026 | 3:47 PM
Share

‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘तेजस्विनी खानोलकर’ हे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल अदितीने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. “मी सनई चौघडे मालिकेत तेजस्विनी खानोलकरची व्यक्तीरेखा साकारतेय. नाव जसं भारदस्त आहे, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे. माझ्या सुदैवाने मला नेहमीच छान भारदस्त भूमिका मिळालेल्या आहेत. तेजस्विनीच्या मनात बऱ्याच वर्षांपासून अनेक गोष्टी आहेत. तिने खूप सहन केलं आहे, खूप काही भोगलं आहे, अनुभवलेलं आहे. बऱ्याच गोष्टींनी तिच्या मनावर परिणाम केला आहे. दिसायला जे जसं दिसतं ते तसं मुळात नसतं, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे,” असं ती म्हणाली.

याविषयी अदितीने पुढे सांगितलं, “तेजस्विनी तिच्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे, आपल्या मुलांवर अत्यंत प्रेम करणारी आहे. झी मराठी वर मी नायिकेची, खलनायिकेची भूमिका साकारली आहे, पण आता पहिल्यांदा आता आईची भूमिका करणार आहे. आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरु आहेत, बऱ्याच नाटकांचं वाचन चालू आहे, मी आता स्वतः आई असल्यामुळे मला सशक्त भूमिका हवी होती. तेजस्विनीची भूमिका अगदी तशीच आहे, जिचं स्वतःचं काही म्हणणं आहे, तिच्याभोवती बऱ्याच गोष्टी फिरत आहेत. खरं सांगायचं तर आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती. पण काही गोष्टी तुम्ही स्वीकारता, हल्ली टेलिव्हिजनमध्येही चांगले बदल घडून येत आहेत. म्हणून मी या सगळ्यांचा खोलवर विचार करून माझ्या तत्वांचा सांभाळ करत, ही भूमिका स्वीकारली.”

राजू सावंत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची मनापासून इच्छा होती, हेसुद्धा अदितीने मान्य केलं. यावेळी भूमिकेतील वेगळेपण सांगताना ती पुढे म्हणाली, “आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका कशी वेगळी आहे हे सांगायचे झाले तर ‘वादळवाट’ मधली रमा चौधरी, ‘लक्ष’ मधली सलोनी देशमुख ‘हम बने तुम बने’ मधली तुलीका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधली मालविका, आणि आता ‘सनई चौघडे’ मधली तेजस्विनी.. प्रत्येक भूमिकेचे काहीतरी कंगोरे असतात. प्रत्येक भूमिकेची काहीतरी खास वेगळेपण असतं, दिसण्यामध्ये वागण्यामध्ये वावरण्यामध्ये. मी अनेक मालिका केलेल्या आहेत, तर मी नक्की म्हणेन की लेखकापासून प्रत्येकानेच माझ्या भूमिकेतलं वेगळेपण जपलेलं आहे. आणि त्याच खास वेगळेपणासोबत प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी मी माझ्या परीने खूप प्रयत्न केलेला आहे.” ‘सनई चौघडे’ ही मालिका येत्या 16 मार्चपासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या नेत्याचा पराभव करत दणदणीत विजय
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
Nashik Gite Vs Darade Rada | दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही...
नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
Nagpur Vidhan Parishad Result | नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का