मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारताबद्दल अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाले, भारत कोणापुढेही..
Vladimir Putin on America Tariffs : व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच अमेरिकेच्या टॅरिफबद्दल अत्यंत मोठे विधान केले. फक्त विधानच नाही तर त्यांनी नाटो देशांना थेट मोठा इशाराच दिला आहे.

रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण त्यामधून कोणताही मार्ग निघू शकला नाही. उलट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया-युक्रेन युद्धात मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. या युद्धात युक्रेनला हवी ती मदत करण्याचे मोठे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. जर अमेरिकेने युक्रेनची मदत या युद्धात केली तर हे युद्ध अधिकच पेटणार हे निश्चित आहे. यासोबतच नाटो देश हे रशियावर धक्कादायक आरोप करत आहेत. भारत आणि चीनवर मोठा टॅरिफ लावण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प नाटो देशांवर दबाव टाकत आहेत. भारतावर अगोदरच अमेरिकेने तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. भारत आणि चीन रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने दोन्ही देशांवर कारवाई करण्याची मागणी अमेरिका करत आहे.
नुकताच आता व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले कर अपयशी ठरला आहे. मुळात म्हणजे भारत आणि चीन हे दोन्ही देश अत्यंत स्वाभिमानी देश आहेत. भारतीय लोक कधीच त्यांचा अपमान सहन करत नाहीत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन युद्धाला भारत रशियाला सहकार्य करत असल्याचा आरोप अमेरिका करत करत आहे.
भारताने अगोदरच स्पष्ट केले की, आम्ही आमच्या नागरिकांच्या हितासाठी ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दलचे निर्णय घेतो. यासोबतच पुतिन यांनी नाटो देशांना चांगलेच सुनावले आहे. नाटोवर रशियाच्या हल्ल्याची खोटी भीती निर्माण करत आहे. हवेतून काढलेला मूर्खपणा पुतिन यांनी म्हटले आणि इशारा दिला की रशिया कोणत्याही चिथावणीला प्रत्युत्तर देईल. पुतिन यांनी स्पष्ट केले की, नाटो देशांवर हल्ला करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाहीये.
पण जर युरोपने चिथावणी दिली तर नक्कीच त्यांना प्रतिउत्तर चांगल्याप्रकारे दिले जाईल. रशियाने नाटोमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न यापूर्वी दोनदा केला. मात्र, रशियाला नाटोमध्ये घेतले नाही, असेही पुतिन यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, जर कोणत्या देशाचे लष्कर रशियाला टक्कर देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही उत्तर देऊ.
