AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले, रशिया फक्त..

Vladimir Putin big statement : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नुकताच अत्यंत मोठा खुलासा केला. पहिल्यांदाच ते युक्रेनसोबतच्या युद्धावर थेट नाटो देशांबद्दल बोलताना दिसले आणि नेमके काय सुरू आहे ते त्यांनी सांगितले आहे.

जग हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले, रशिया फक्त..
Vladimir Putin on America
| Updated on: Oct 03, 2025 | 8:08 AM
Share

गेल्या साडेतीन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. मात्र, जगाला प्रश्न पडला की, इतका मोठा आणि शक्तीशाली देश रशिया युक्रेनचा अजूनही पराभव कसा करू शकला नाही. यावर आता थेट उत्तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलंय. युक्रेनमागे कोणती ताकद आहे हेच त्यांनी थेट सांगून टाकलंय. रशिया-युक्रेन युद्धाची झळ आता संपूर्ण जगाला बसताना दिसतंय. अमेरिकेने भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ लावला. शिवाय काही निर्बंधांच्या धमक्या देखील दिल्या जात आहेत. रशिया काही दिवसात हे युद्ध जिंकेल असे जगाला वाटले. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. आता यावरच बोलताना व्लादिमीर पुतिन हे दिसले आहेत.

व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट म्हटले की, रशिया हा फक्त युक्रेनसोबतच लढत नाही तर तो संपूर्ण नाटो देशांसोबत लढत आहे. रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका युक्रेनला मदत करत असल्याचे जगजाहीर आहे. नाटो देश युक्रेनच्या मदतीसाठी मैदानात आहेत. एकटा रशिया या सर्व देशांविरोधात लढत आहे. यादरम्यान भारत आणि चीन या दोन्ही देशांनी रशियाची साथ सोडली नाही. अमेरिकेने भारताला थेट म्हटले की, तुम्ही रशियाकडून तेल खरेदी बंद करा आम्ही तुमच्यावरील 25 टक्केट टॅरिफ काढू.

फक्त टॅरिफच नाही तर वेगवेगळ्या धमक्या अमेरिका भारताला देत आहे. पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा देत म्हटले की, जर तुम्ही युक्रेनला लांबची मिसाईल देणार आहात तर हे खूप म्हणजे खूप जास्त वाईट होईल आणि परिस्थिती अधिकच खराब होणार हे नक्की आहे. जर अमेरिकेने युक्रेनला मिसाईल दिली तर त्यामुळे रशियाचे मोठे नुकसान होईल. मात्र, तसे असले तरीही रशियाची वायु सुरक्षा या नवीन धोक्यासाठी देखील तयार आहे.

रशियाला पेपर टायगर म्हटले जातंय. मात्र, रशियाला गेल्या काही दिवसांपासून एकटाच पूर्ण नाटो समुहाला पुरून उरला असल्याचे पुतिन यांनी म्हटले. आता पुतिन यांनी स्पष्ट केले की, रशिया हा फक्त युक्रेनसोबत युद्ध करत नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध करत आहे. नाटो देश एकट्या रशियाच्याविरोधात मैदानात उतरली आहेत.

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब