AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येमेनमध्ये लँड होणार होते प्रवाशांनी भरलेले इराणी विमान, रनवेवर सौदीचे मिसाईल हल्ले

येमेनमध्ये सौदी समर्थित आणि हुथी समर्थित सरकारात कट्टर दुश्मनी आहे. यानंतर वरिष्ठ हुती अधिकारी हजम अल-असद यांनी धमकी दिली आहे. ते म्हणाले की सौदी सरकारला आता कळेल की त्यांनी स्वत: ची कब्र खोदली आहे.

येमेनमध्ये लँड होणार होते प्रवाशांनी भरलेले इराणी विमान, रनवेवर सौदीचे मिसाईल हल्ले
Saudi attacks on Iranian plane in Yemen
| Updated on: Jul 13, 2026 | 10:58 PM
Share

इराण आणि अमेरिकेत पुन्हा घमासान युद्ध सुरु झाले आहे. या युद्धाने पुन्हा आखातातील मुस्लीम देशांतील अमेरिकन तळांवर इराणने ड्रोन आणि क्षेपणास्रे डागणे सुरु केले आहे. अमेरिकेने देखील इराणच्या भूमीवर खोलवर क्षेपणास्रे हल्ले सुरु केले आहेत. या युद्धाचा परिणाम आता येमनमध्ये पाहायला मिळणार आहे. सौदी अरबने सना इंटरनॅशन एअरपोर्टवर लँड होत असलेल्या एका जहाजावर हल्ला केला आहे. हे विमान इराणच्या महान एअरवेज होते. प्रवाशांनी भरलेल्या विमानावर सौदी अरबने जेव्हा हा हल्ला केला तेव्हा हे विमान एअरपोर्टवर उतरणारच होते.

येमनच्या हुती अतिरेकी गटाने सोमवारी सौदी अरबवर आरोप लावला की त्याने इराणच्या एका विमानाला सना इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरण्यापासून रोखण्यासाठी हे हवाई हल्ले केले. सौदी अरबने या आरोपांवर कोणतेही उत्तर दिलेले नाही.

हूती-समर्थित अल-मसीराह टेलिव्हीजन चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार हल्ल्यात एअरपोर्टच्या लँडींग आणि टेकऑफ रनवेला टार्गेट केले गेले. हुती-नियंत्रित राजधानीच्या रहिवाशांना धमक्यांचे आवाज ऐकले आणि वर आकाशात जेट विमानांना घिरट्या घालताना पाहिले.

धावपट्टीवर या हल्ल्यानंतर धुराचे ढग दाटलेले पाहायला मिळाले. रनवे हल्ला झाल्यानंतर मोठी अफरा – तफरी माजली आहे आणि तात्काळ दुसऱ्या विमानांचे लँडींग रोखण्यात आले.  हुती बंडखोर गटाचे सैन्य प्रवक्ते याह्या सरी म्हणाले की एका अन्यायपूर्ण हल्ल्यात, सौदी शत्रूंनी सना इंटरनॅशनल एअरपोर्टवर अनेक हल्ले केले.

येमनमध्ये इराणच्या समर्थवाल्या हुती बंडखोरांनी सोमवारी सांगितले की सना एअरपोर्टवर हल्ल्याचा उत्तर देईल. प्रवक्त्यांनी याह्या सरी यांनी सौदी अरबवर आरोप लावला आहे की सौदीने तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नांना समाप्त केले आहे. आणि आपल्या आक्रमकतेच्या परिणामांना संपूर्ण जबाबदार राहतील. आम्ही हे स्पष्ट करत आहोत की या आक्रमकेचे उत्तर जरुर दिले जाईल आणि शिक्षा केल्यावाचून आम्ही सोडणार नाही.

येमेनच्या सौदी समर्थित सरकारने या हल्ल्यावर वेगळी प्रतिक्रीया दिले आहे आणि या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या सरकारने सांगितले की त्यांनी सना एअरपोर्टवर हल्ला केला. या सरकारने म्हटले की या विमानात नागरिक नव्हे तर हुती बंडखोर होते. त्यांनी सांगितले की हा हल्ला हुती प्रतिनिधी मंडळाला घेऊन जात असलेल्या एका इराणी विमाना संदर्भात झालेल्या वादानंतर केला गेला.

हे विमान इराणहून परतत होते. येमेनच्या सौदी-समर्थित सरकारने आरोप केला आहे की, हुथींनी त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय विमानाला उतरण्याची परवानगी नाकारली, परंतु येमेनी सार्वभौमत्वाचे उल्लंघन करून इराणी विमानाला सना येथे उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, सरकारने धावपट्टीला लक्ष्य केले. नंतर हे इराणी विमान होदेदाह विमानतळावर उतरवले गेले.

साना हवाई अड्ड्यांच्या रनवेवर हल्ला

सौदी समर्थित येमेन सरकारच्या संरक्षण मंत्री जनरल ताहेर अल-अकीली यांनी एक्सवर म्हटले की इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंतिम संस्कारात सामील झाल्यानंतर हुती प्रतिनिधीमंडळाला घेऊन येणाऱ्या एका विमानाला रोखण्यासाठी साना हवाई अड्ड्यांच्या रनवेवर हल्ला केला गेला.

येथे पोस्ट पाहा –

हल्ल्यांच्या काही वेळापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत, अल-अकिली यांनी इराणी विमानांच्या येमेनी हवाई हद्दीत घुसखोरीविरोधात इशारा दिला. “या क्षणी, आम्ही म्हणतो की आमचा संयम संपला आहे. आम्ही या विश्वासघातकी आणि क्रूर कृत्याला योग्य प्रत्युत्तर देऊ, आणि येमेनी हवाई हद्द आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणाऱ्या शत्रू विमानांचा सर्व उपलब्ध साधनांनी सामना करून त्यांना धडा शिकवू असे असे म्हटले आहे.

Follow Us
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरे...
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरेंच्या बहिणीसोबतचे खास फोटो समोर
दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी