US Iran Ceasefire : हो, आम्ही नाही जिंकू शकलो इराण विरुद्ध हरलो, पहिल्यांदाच अमेरिकेतून मोठी कबुली

US Iran Ceasefire : इथेच अमेरिका-इस्रायलचं सर्व गणित बिघडलं. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये प्रचंड नुकसान झालं. यात अजिबात दुमत नाही. पण कुठल्याही युद्धात उद्दिष्ट्यपूर्ती महत्वाची असते. अमेरिका-इस्रायलचे दोन उद्देश होते.

US Iran Ceasefire : हो, आम्ही नाही जिंकू शकलो इराण विरुद्ध हरलो, पहिल्यांदाच अमेरिकेतून मोठी कबुली
Donald Trump
| Updated on: Apr 08, 2026 | 10:13 AM

अमेरिका आणि इस्रायल या दोन बलाढ्य देशांनी 28 फेब्रुवारी रोजी इराण विरुद्ध युद्ध सुरु केलं. इराणची अणवस्त्र संपन्न राष्ट्र बनण्याची क्षमता नष्ट करणं आणि रेंजीच चेंज म्हणजे सत्ता बदल ही दोन उद्दिष्टय डोळ्यासमोर ठेऊन अमेरिका-इस्रायल या युद्धात उतरले होते. 38 दिवस सुरु असलेल्या या युद्धात अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर अनेक घाव घातले. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी संपवलं. त्यानंतर इराणचे अनेक कमांडर्स, प्रमुख सुरक्षा अधिकारी यांचा खात्मा केला. इराणला नेतृत्वहीन बनवायचं जेणेकरुन त्यांची जनता रस्त्यावरुन उतरेल. तिथल्या शासनकर्त्यांना सत्तेतून बेदखल करेल असा अमेरिका-इस्रायलचा डाव होता. पण त्यात यश आलं नाही. उलट अमेरिका-इस्रायलने हल्ले सुरु केल्यानंतर सर्वसामान्य इराणी अजून एकवटले.महिना दीड महिन्यापूर्वी जे लोक रस्त्यावर उतरुन आपल्याच शासनाविरोधात आंदोलन करत होते, ते युद्ध काळात सरकार सोबत असल्याचं दिसलं.

इथेच अमेरिका-इस्रायलचं सर्व गणित बिघडलं. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये प्रचंड नुकसान झालं. यात अजिबात दुमत नाही. पण कुठल्याही युद्धात उद्दिष्ट्यपूर्ती महत्वाची असते. अमेरिका-इस्रायलचे दोन उद्देश होते. पण त्यांना त्यात यश मिळालं नाही. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट करणं हा उद्देश होता. जो भारताने साध्य केला. पण अमेरिका-इस्रायलला हे जमलं नाही. इराणकडे असलेल्या समृद्ध युरेनियमच पुढे काय झालं? या प्रश्नाच काहीच उत्तर नाहीय आणि दुसरीकडे इराणवर अजूनही IRGC ची मजबूत पकड असल्याचं सिद्ध झालं.

हे जगासाठी असाधारण आणि विनाशकारी पाऊल

मग या युद्धातून अमेरिका-इस्रायलने मिळवलं काय? तर काहीच नाही. हा एकप्रकारे इराणचा विजयच आहे. आता अमेरिकेतील सीनेटर क्रिस मर्फी यांनी एक मोठं विधान केलय. CNN शी बोलताना मर्फी यांनी इराण विरुद्ध युद्धात ट्रम्प यांचा पूर्णपणे पराभव झाल्याच म्हटलं आहे. त्यांनी सरेंडर केलं असे शब्दा वापरले. एका अमेरिकन सिनेटरने आपल्या देशाविरोधात असं बोलण ही खूप मोठी गोष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुज़वर नियंत्रणाला सहमती दिलीय. हे जगासाठी असाधारण आणि विनाशकारी पाऊल आहे असं मर्फी म्हणाले.

Follow Us