AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्युझिक सुरू होते अन् अचानक… अमेरिकेत मोठी खळबळ, फेस्टिव्हलमध्येच थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेला मोठा धक्का बसताना दिसत आहे. इराण अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास तयार नाही. त्यामध्येच आता अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेत मोठ्या संख्येने लोक जखमी झाली आहेत.

म्युझिक सुरू होते अन् अचानक... अमेरिकेत मोठी खळबळ, फेस्टिव्हलमध्येच थेट..
America shooting
| Updated on: Jun 07, 2026 | 8:10 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका जगाला बसत आहे. होर्मुज खाडी गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचे संकट जगावर आहे. अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही, अशाप्रकारे इराण उत्तर देत आहे. इराण युद्धात माघार घेत नाही. इराणने अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्या आहेत. यासोबतच नुकताच आणखीन काही खाडी बंद करण्याची धमकी इराणकडून देण्यात आली. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेवर मोठा दबाव जगाचा आहे. अमेरिकेचे इराणसोबत युद्ध सुरू आहे, त्यादरम्यानच अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. आता अमेरिकेत मोठी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात अनेक लोक मारले गेले आहेत. ही घटना टोलेडोमध्ये घडली.

लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. टोलडो पोलिसांना माहिती मिळाली की, ओल्ड वेस्ट अॅन्ड फेस्टिव्हलमध्ये एक व्यक्ती गोळीबार करत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस ज्यावेळी पोहोचले, त्यावेळी तिथे जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. पोलिसांनी सांगितले की, जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी असलेला व्यक्ती केविन बेरी यांनी सांगितले की, तो त्याच्या मित्रासोबत गाणे ऐकत होता.

यादरम्यानच त्याला गोळीबाराचा आवाज आला. त्याने बघितले असता अनेक लोक जमिनीवर पडले होते. त्याने मागे वळून बघितले तर एक व्यक्ती गोळीबार करत होता. फेस्टिव्हलमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. या घटनेने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली.

इराणसोबत युद्ध सुरू असतानाच आता पुन्हा एकदा अमेरिकेत खळबळ उडाली. या घटनेत नक्की किती लोक ठार झाले, याबाबत माहिती पुढे येऊ शकली नाही. मात्र, अनेक लोकांवर सध्या उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता थेट फेस्टिवलमध्ये गोळीबार करण्यात आल्याने हाहाकार उडाला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात