AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

South Korea-North Korea Clash : आशिया खंडात अजून एक भारत-पाकिस्तान, कुठल्याही क्षणी होऊ शकते युद्धाची घोषणा

South Korea-North Korea Clash : मे महिन्यात ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारत-पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये सशस्त्र संघर्ष झाला. आता आशिया खंडात आणखी एक युद्धाचा मोर्चा उघडला जाऊ शकतो. या दोन देशांमध्ये सुद्धा भारत-पाकिस्तान सारखेच संबंध आहेत.

South Korea-North Korea Clash : आशिया खंडात अजून एक भारत-पाकिस्तान, कुठल्याही क्षणी होऊ शकते युद्धाची घोषणा
Asia New War Front
| Updated on: Oct 24, 2025 | 12:23 PM
Share

युरोप आणि मिडिल ईस्टनंतर आता आशिया खंडात युद्धाचा एक नवीन मोर्चा उघडला जाऊ शकतो. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये हे युद्ध भडकू शकतं. उत्तर कोरियाकडून सतत चिथावणीखोर कृती सुरु असते. दक्षिण कोरियाने त्याला प्रत्युत्तर देत उत्तर कोरियाच्या 20 सैनिकांवर गोळ्या झाडल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या या कारवाईने दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे शेजारी देश आहेत. त्यांच्यात भारत-पाकिस्तान सारखेच संबंध आहेत. उत्तर कोरियाला रशिया आणि चीन या देशांचा पाठिंबा आहे, तेच दक्षिण कोरियाला अमेरिका, जपानचा पाठिंबा आहे.

न्यूजवीकने दक्षिण कोरियातील स्थानिक मीडियाच्या हवाल्याने दिलेल्या वृ्त्तानुसार, किमचे सैनिक बफर झोनमध्ये भूसुरुंगाची पेरणी करत होते. जेणेकरुन बफर झोनमध्ये उत्तर कोरियाचा विस्तार झाला पाहिजे. ही घटना गँगवॉन प्रांतातील चेओरवॉनची आहे.

आधी उत्तर कोरियाच्या आर्मीला इशारा दिला

दक्षिण कोरियाच्या सैनिकांनी आधी उत्तर कोरियाच्या आर्मीला इशारा दिला. ते ऐकले नाहीत, तेव्हा फायरिंग केली. फायरिंग नंतर उत्तर कोरियाचे सैनिक मागे हटले. सीमापार करुन जवळपास 20 सैनिक भूसुरुंग पेरणीसाठी आले होते.

तीन पॉइंटमध्ये समजून घ्या, दोन्ही देशातील तणावाचं कारण

उत्तर कोरियाने अलीकडेच अनेक बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी केली आहे. ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान दौऱ्याची घोषणा केली, त्यावेळी त्यांनी एक मिसाइल डागलेलं.

दक्षिण कोरियाने नेहमीच उत्तर कोरियावर अणवस्त्र संपवण्यासाठी दबाव टाकला आहे. किम जोंग उनने त्यांची ही इच्छा अनेकदा फेटाळून लावली आहे. किमच्या बहिणीने म्हटलय की, हे काहीही झालं तरी होणार नाही.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात APEC शिखर सम्मेलनात दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांची भेट घेऊ शकतात. उत्तर कोरियाने त्याआधी अमेरिकेला आपली शक्ती दाखवून दिली आहे.

आशिया खंडात अजून कुठे-कुठे युद्धाची स्थिती

आशिया खंडात पाकिस्तान-अफगाणिस्तान, चीन-तैवान आणि चीन-फिलिपींस या देशांमध्ये आधीपासूनच तणावाची स्थिती आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नुकताच सशस्त्र संघर्ष झाला.

तैवानवर चीन सुद्धा हल्ला करु शकतो. फिलीपींसच्या जहाजावर चीनने दोनवेळा हल्ला केलाय.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.