हुकूमशाहा किम जोंगने धाड धाड मिसाईल डागल्या, डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का!
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याने क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. त्याने थेट क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे आता दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे.

North Korea Ballistic Missile Testing :t दक्षिण कोरियात लवकरच आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) शिखर परिषद होणार आहे. या शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार आहेत. याच कारणामुळे या शिखर परिषदेला विशेष महत्त्व आलेले आहे. दरम्यान, या शिखर परिषदेच्या अगोदरच दक्षिण कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याने जगाला हादरवून टाकणारे काम केले आहे. त्याने धाड धाड बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्या आहेत. किम जोंगच्या या निर्णयामुळे आता जपान, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठीदेखील हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. किम जोंग उन याने बुधवारी (22 ऑक्टोबर) या मिसाईल्स डागल्याचे साांगितले जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार किम जोंग उन याने बुधवारी नव्या बॅलेस्टिक मिसाईल्सची चाचणी केली आहे. उत्तर कोरियाचे गेल्या पाच महिन्यांतील ही पहिलीच क्षेपणास्त्र चाचणी आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य जागतिक नेते दक्षिण कोरियात APEC परिषदेसाठी एकत्र येणार आहेत. या परिषदेच्या काही दिवस अगोदरच किम जोंग उन याने हे क्षेपणास्त्र परीक्षण केल्यामुळे सर्वांच्याचा भुवया उंचावल्या आहेत. दक्षिण कोरियाचे ‘जॉईंट चिफ ऑफ स्टाफ’ने उत्तर कोरियाच्या या परीक्षणाबाबत माहिती दिली. या माहितीनुसार उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगच्या दक्षिणेस कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाईल्सची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रांनी साधारण 350 किलोमीटपर्यंत प्रवास केला, असे दक्षिण कोरियाच्या जॉईंट चिफ ऑफ स्टाने सांगितले आहे. मात्र उत्तर कोरियाने प्रक्षेपित केलेली ही क्षेपणास्त्रे नेमके कुठे पडले, त्यांचा स्फोट नेमका कुठे झाला हे मात्र दक्षिण कोरियाने सांगितलेले नाही. उत्तर कोरियाच्या या कथित क्षेपणास्त्र चाचणीनंतर दक्षिण कोरियाने आम्ही सज्ज असल्याचे सांगितले. तसेच आम्ही आमचा मित्र अमेरिकेसोबत मिळून उत्तर कोरियाच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ, असेही दक्षिण कोरियाने स्पष्ट केले आहे.
जपान सतर्क, पंतप्रधानांनी दिली प्रतिक्रिया
उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणामुळे जपान देशदेखील सतर्ख झाला आहे. दक्षिण कोरिया साधारणत: कोरियाई दीपकल्प आणि जपान यांच्यादरम्यान असलेल्या पाण्यातच अशा क्षेपणास्त्रांची चाचणी करतो. त्यामुळे जपान नेमहीच सतर्क असतो. उत्तर कोरियाच्या या कथित चाचण्यांमुळे जपनाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्रांच्या परीक्षणावर जपानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान साने ताकाईची यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अमेरिका तसेच दक्षिण कोरियाच्या संपर्कात आहोत. उत्तर कोरियाचे कोणतेही क्षेपणास्त्र जपानच्या जलसीमा किंवा भूभागापर्यंत पोहोचलेले नाही, असे ताकाईची यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र निर्मितीला गती, अमेरिकेलाही धक्का
दरम्यान, उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याने गेल्या काही महिन्यांपासून क्षेपणास्त्र निर्मितीच्या मोहिमेला गती दिलेली आहे. याच वर्षी उत्तर कोरियाने आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. या चाचणीसाठी खुद्द किम जोंग उन हजर राहिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांची चाणी केली आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. दुसरीकडे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात मात्र अनेकदा संघर्ष झालेला आहे. असे असताना उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांचीच चाचणी केली जात असल्यामुळे अमेरिकेसाठीही ही चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे.
