AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या नव्या प्रजातीवर ‘ही’ लस प्रभावी ठरणार?, वाचा सविस्तर

कोरोनाच्या नव्या प्रजातीवर स्पुटनिक-वी ही लस प्रभावी ठरत असल्याचा दावा रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने केला आहे.

कोरोनाच्या नव्या प्रजातीवर 'ही' लस प्रभावी ठरणार?, वाचा सविस्तर
SPUTNIK V VACCINE
| Updated on: Dec 22, 2020 | 1:11 AM
Share

मॉस्को :  कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळली आहे. या नव्या कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देश धास्तावले आहेत. मात्र, कोरोनाच्या नव्या प्रजातीवर स्पुटनिक-वी ही लस प्रभावी ठरत असल्याचा दावा रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) किरिल दिमित्रिक यांनी केला आहे. (Sputnik v vaccine will be effective against the new corona virus strain said RDIF)

रशियातील स्पुटनिक या वृत्तसंस्थेने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, “ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रजातीवर स्पुटनिक- व्ही ही लस प्रभावी आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्यूटेशन्स झाले असले तरी, स्पुटनिक – व्ही लस नव्या कोरोना विषाणूविरोधात तिचा प्रभाव चांगल्या प्रकारे सिद्ध करत आहे,” असे दिमित्रिज यांनी सांगितलं. तसेच, रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (RDIF) अ‌ॅझेनेका या कंपनीसोबतसुद्धा नव्या कोरोनाशी मुकाबला करणारी प्रभावी लस तयार करण्यावर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

नव्या कोरोना व्हायरसमध्ये 17 प्रकारचे बदल

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या नव्या प्रजातीमध्ये कमीतकमी 17 बदल झाले आहेत. या बदलांमुळे कोरोनाच संसर्ग अधिक वेगाने होत आहे. कोरोना व्हायरसमध्ये सर्वात मोठा बदल हा स्पाईक प्रोटीनमध्ये झाला आहे. स्पाईक प्रोटीन कोरोना व्हायरसमधील असा भाग आहे, जो विषाणूला मानवी शरिरात घुसण्यासाठी मदत करतो. याच स्पाईक प्रोटीनमध्ये बदल झाल्यामुळे कोरोनाची नवी प्रजाती घातक असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

New Strain of Coronavirus : ब्रिटनच नाही तर ‘या’ देशांतही आढळली कोरोनाची नवी प्रजाती, भारताची स्थिती काय?

इमरान खान यांना 12 लाखांचा दंड, ‘या’ प्रकरणामुळं पंतप्रधानांनी भरले पैसे?

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

(Sputnik v vaccine will be effective against the new corona virus strain said RDIF)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...