इमरान खान यांना 12 लाखांचा दंड, ‘या’ प्रकरणामुळं पंतप्रधानांनी भरले पैसे?

इमरान खान (Imran Khan) यांनी 12 लाख रुपये (Fine)भरल्यानंतर त्यांच्या बनी गाला रेसिडेन्सीचा नकाशा सीडीएने मंजूर केला.

इमरान खान यांना 12 लाखांचा दंड, 'या' प्रकरणामुळं पंतप्रधानांनी भरले पैसे?

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. इमरान खान यांनी त्यांच्या घराच्या नकाशामध्ये फेरफार केल्यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. इमरान खान यांनी 12 लाख रुपये भरल्यानंतर त्यांच्या बनी गाला रेसिडेन्सीचा नकाशा कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने मंजूर केला. (Imran Khan paid fine of twelve lakh rupees for changing map of house)

पाकिस्तानातील ‘द न्यूज’च्या वृत्तानुसार इमरान खान यांच्या घराच्या नकाशाला बिल्डींग रेग्युलेशन 2020 नुसार मंजुरी देण्यात आली आहे. मास्टर प्लॅन ऑफ इस्लामाबादनुसार इमरान खान यांच्या घराच्या नकाशाची तपासणी न करताच मंजुरी देण्यात आली. बनी गाला रेसिडेन्सीला 5 मार्चला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्याची सार्वजनिकरित्या घोषणा करण्यात आली नव्हती.

कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इमरान खान यांच्या घरामध्ये 6 बेडरुम, एक ड्रॉईंग रुम, एक डायनिंग रुम, एक प्लेरुम, एक ऑफिस आणि रिसेप्शन असेल. कॅपिटल डेव्हलपमेंटअथॉरिटीनुसार इमरान खान यांचे घर झोन 4 या प्रकारात येते. सीडीएकडून आतापर्यंत सहा जणांच्या घरांच्या नकाशांना मंजुरी दिली आहे. इमरान खान यांच्यापूर्वी दोन जणांनी परवानगी घेतली होती. मात्र, इमरान खान यांच्या बनी गाला रेसिडेन्सीच्या नकाशाला अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही. याबाबत पंतप्रधान इमरान खान यांना कळवण्यात आले आहे.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार पंतप्रधान इमरान खान यांना 37 एकरात असलेले घर भेट म्हणून मिळाले होते. बनी गाला रेसिडेन्सीच्या निर्मितीसाठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे.

इमरान खान यांची संपत्ती

पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार इमरान खान यांच्याकडे 8 कोटी 60 लाख रुपये संपत्ती आहे. इमरान खान यांच्याकडे एकूण 10 घरे आहेत. प्रत्येक घराची किंमत 4.5 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

पाकिस्तानातील विरोधी पक्ष आक्रमक

पंतप्रधान इमरान खान यांच्या नेतृत्त्वातील सरकारपुढे कोरोनामुळे मोठं आव्हान निर्माण केलं आहे. इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांचे नेते सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना जनतेचेही समर्थन मिळत आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्षाचे संसद सदस्य सामूहिक राजीनामा देण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ चीनच्या ताब्यात जाणार का?

पाकिस्तानातील गोंधळ वाढला, इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांचे नेते सामूहिक राजीनामे देणार

(Imran Khan paid fine of twelve lakh rupees for changing map of house)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI