
नवी दिल्लीः सुदानच्या (sudan) दक्षिणेकडील आदिवासींमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षानंतर किमान 220 लोकं ठार (220 killed) झाली आहेत. तेथील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिवासींचा संघर्ष हा जीवघेणा ठरला आहे. आदिवासींच्या या अशांततेमुळे गृहकलह आणि राजकीय अनागोंदीत अडकलेल्या आफ्रिकन देश एक भलत्याच संकटात सापडला आहे. हा संघर्ष देशातील ब्लू नाईल (blue nile) प्रांतातील हौसा जमाती आणि बर्टा लोकांमध्ये सुरू झाला आहे.
ब्लू नाईलच्या आरोग्य मंत्रालयाचे महासंचालकाकडून या संघर्षाबद्दल माहिती देताना सांगितले की, इथियोपियाच्या सीमेवरील वड अल-माही शहरात बुधवारी आणि गुरुवारी तणाव वाढला होता.
त्यावेळी त्या संघर्षात शनिवारी रात्रीपर्यंत किमान 220 लोकं मृत्यूमुखी पडली होती. त्यांचा संघर्ष इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, घटनास्थळापर्यंत वैद्यकीय पथकांना पोहचेपर्यंत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
आदिवासींच्या या संघर्षाची पहिली ठिणगी बुधवारी पडली होती. त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी त्या ठिकाणी लष्करही तैनात करण्यात आले.
मागील गेल्या काही दिवसांपासून ब्लू लाइनला गेल्या अनेक महिन्यांपासून वांशिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी जूनमध्ये सुदानच्या युद्धग्रस्त दारफुर प्रांतात वांशिक संघर्षामध्ये सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला होता.
यूएनएचसीआरचे समन्वयक टोबी हार्वर्ड यांनी सांगितले की, पश्चिम दारफुर प्रांतातील कुलबास शहरातील अरब आणि आफ्रिकन जमातींमध्ये जमिनीच्या वादावरून हा संघर्ष पेटला होता.
यानंतर, स्थानिक मिलिशियाने परिसरातील अनेक गावांवर हल्ले करण्यात आल्याने अनेक नागरिकांनी गाव सोडून पळ काढला आहे. मिलिशयांकडून 20 हून अधिक गावं जाळली गेल्यानंतर त्या ठिकाणी 62 नागरिकांचे जळालेले मृतदेह सापडले होते.