भारताचा रुपया या 7 देशांवर भारी, कमी पैशात राहा, खा, प्या आणि मजा करा…

Indian Rupee Higher Value: भारतीय रुपयांची किंमत सध्या अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत कमी होताना दिसत आहे. मात्र, जगात काही असेही देश आहेत, तेथील चलनाची अवस्था भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. अशा देशात फिरायला जाताना तेथे हिंडण्याचा आणि फिरण्याचा शॉपिंग करण्याचा खर्च खूपच कमी आहे.

भारताचा रुपया या 7 देशांवर भारी, कमी पैशात राहा, खा, प्या आणि मजा करा...
vietnam
| Updated on: May 19, 2026 | 10:51 PM

Indian Rupee Value: डॉलरच्या तुलनेत जरी भारताचा रुपया कमजोर होताना दिसत आहे. रुपयाची किंमत सतत घसरताना दिसत आहे. परंतू जगात असेही काही देश आहेत जेथे भारतीय रुपयांची व्हॅल्यू खूप मजबूत आहे. या देशांच्या करन्सीच्या तुलनेत भारतीय रुपया भारी आहे. चला तर पाहूयात कोणत्या देशाची करन्सी भारतीय रुपयासमोर कमजोर आहे.

या देशांमध्ये भारतीय रुपयाचा दबदबा

भारतीय रुपया सुमारे ७ देशात आपला दबदबा कायम ठेवून आहे. या देशात आपल्या भारतीय एक रुपयाची जी किंमत आहे, ती भारतीयांसाठी महत्वाची आहे. या यादीत अनेक देशांचा समावेश आहे.त्यात व्हिएतनाम, नेपाळ, इंडोनेशिया सह सात देशांचा समावेश आहे. चला तर पाहूयात या सात देशात भारतीय रुपयाची काय किंमत आहे.

या देशात भारतीय १ रुपयांची व्हॅल्यू पाहा

व्हिएतनाममध्ये भारताच्या १ रुपयाची व्हॅल्यू सुमारे ३०० डोंग आहे.

इंडोनेशियात भारताच्या १ रुपयाची व्हॅल्यू सुमारे १९० रुपिया आहे.

पॅराग्वे येथे भारतीय १ रुपयाची व्हॅल्यू सुमारे ९० गुआरानी आहे.

कंबोडियात भारताच्या १ रुपयाची व्हॅल्यू सुमारे ५० रियाल आहे.

मंगोलियात भारताच्या १ रुपयाची व्हॅल्यू सुमारे ४० तुगरिक आहे.

श्रीलंकेत भारताच्या १ रुपयाची व्हॅल्यू सुमारे ३.५ श्रीलंकन रुपये आहे.

नेपाळमध्ये भारताच्या १ रुपयाची व्हॅल्यू सुमारे १.६ नेपाळी रुपये आहे.

या देशात भारतीय पर्यटकांची संख्या वाढली

या सर्व देशात भारतीय पर्यटक कमी रुपयात चांगले फिरु शकतात. कमी रुपये खर्च करावे लागत असल्याने या देशात पर्यटन करताना चांगले खाऊ- पिऊ शकतो. शॉपिंगचा आनंद घेऊ शकता. चांगला हॉटेलमध्ये थांबू शकता. कमजोर स्थानिक करन्सी आणि स्वस्त राहणीमान यामुळे हे देश भारतीयांना फिरण्यासाठी चांगले आणि बजेट फ्रेंडली मानले जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षात या देशात भारतीय पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. खास करुन व्हिएतनाम हा देश तेथील सुंदर पर्यटन स्थळांमुळे भारतीयांचा खूप आवडता झाला आहे.

Follow Us