AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका हादरली! थेट मोठा गोळीबार, भर दुपारी शाळेमध्येच..

अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. चक्क शाळेवर गोळीबार करण्यात आला. यात काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा जीव गेला. या शाळेत तब्बल 450 विद्यार्थी आणि 40 कर्मचारी ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी उपस्थित होते.गोळीबाराच्या घटनेनंतर शाळेत लॉकडाऊन करण्यात आले.

अमेरिका हादरली! थेट मोठा गोळीबार, भर दुपारी शाळेमध्येच..
United States
| Updated on: Oct 16, 2026 | 8:50 AM
Share

अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील बेंड शहरात धक्कादायक घटना घडली. एका प्रायमरी स्कूलवर गोळीबार करण्यात आला. धक्कादायक घटना म्हणजे या गोळीबारात चार मुले आणि एका टीचरचा जीव गेला. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरावर एका स्थानिक व्यक्तीने गोळीबार केला. ज्यात त्याचाही मृत्यु झाला. ही घटना दुपारी 1 च्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यामागचे नक्की कारण काय याचा शोध हा पोलिसांकडून घेतला जात आहे. बेंड पोलिसांनी सांगितले की, आम्हाला आत्पकालीन फोन आला आणि सांगण्यात आले की, एक अज्ञात व्यक्ती शाळेच्या जवळ गोळीबार करत आहे. त्यानंतर पोलिसांना अनेक फोन आले. हा व्यक्ती थेट शाळेत शिरला आणि त्याने गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस काही सेकंदाच तिथे पोहोचले.

पोलिस अधिकारी माइक क्रांट्जने सांगितले की, स्थानिक व्यक्ती किशोर हा हल्लेखोराच्या मागे शाळेत गेला आणि त्याने हल्लेखोरावर गोळीबार केला. ज्यात त्याचा जीव गेला. या घटनेचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, यातील विद्यार्थ्यांचे वय पाच ते आठ आहे. या गोळीबारात काहीजण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती मिळतंय.

या शाळेत तब्बल 450 विद्यार्थी आणि 40 कर्मचारी ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी उपस्थित होते.गोळीबाराच्या घटनेनंतर शाळेत लॉकडाऊन करण्यात आले. अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली जात आहे. नक्की काय घडले, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. पुढील काही दिवस शाळा बंद राहणार आहे. अमेरिकेच्या तपास यंत्रणांकडून तपास केला जात आहे.

या घटनेनंतर बोलताना बेंडचे माजी महापाैर जेफ ईगर यांनी म्हटले की, या गोळीबाराने स्थानिक लोकांना मोठा धक्का बसला. आम्ही पीडित कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. लहान मुलांच्या शाळेवर कोणी असा कसा हल्ला करू शकते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळेवर गोळीबार करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!