भारताला ज्याची भीती तेच घडतंय, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता, थेट तेल..
इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढताना दिसले. आताही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यातच भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. पुन्हा एकदा हल्ले केले जात आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला की, त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर बघायला मिळतो. जागतिक बाजारात आता कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात भारतातही महागाई वाढली. तब्बल चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली. जगाला ज्याची भीती तेच घडले आहे. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्या संघर्षात ब्रेंट क्रूडच्या दरात तब्बल 1.5 टक्क्यांनी वाढ झाली. प्रति बॅरल 97.88 डॉलर्सवर पोहोचला. 23 जुलैनंतर पहिल्यांदा तेलाचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. जर हा संघर्ष पुढील काही दिवस सुरू राहिला तर अधिक किंमती वाढण्याची शक्यता आहे.
भारताने खरेदी केलेल्या कच्च्या तेलाच्या मिश्रणाची सरासरी किंमत ही कच्च्या तेलाच्या सध्याच्या दरापेक्षा अधिक आहे. भारत सध्या 99.38 डॉलर्स प्रति बॅरल या सरासरी दराने कच्चे तेल खरेदी करत आहे. गेल्या शुक्रवारी हा दर 101 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंतही पोहोचला होता. इंडियन बास्केटची सरासरी किंमत जूनमध्ये प्रति बॅरल 83 डॉलर्स तर जुलै महिन्यात 82 डॉलर्स तर ऑगस्ट महिन्यात 90 डॉलर्स इतकी पोहोचली.
अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकांविरुद्ध इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्यानंतर आता अमेरिकन लष्कराने इराणच्या तीन तेल टँकर्सवर हल्ला केला, त्याने कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडाला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे किमती भडकत आहेत. भारतीय तेल कंपन्यांवरील तणाव यामुळे प्रचंड वाढला आहे.
ज्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी अधिक होताना दिसत आहेत. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान वाढ झाली.
