पाकिस्तानला दणका, अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाने उडाली झोप, थेट भारताच्या..
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव बघायला मिळतोय. दोन्ही देशातील संबंध तणावात असून हल्ले केले जात आहेत. त्यातच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या निर्णयाने मोठी खळबळ उडाली. पाकिस्तानला मिरच्या लागल्या आहेत.

अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात प्रचंड तणाव आहे. सीमेवर दोन्ही बाजूकडून हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओने एकच खळबळ उडाली. पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भारतासोबत पुढच्या सीरिजच्या प्रमोशनच्या व्हिडीओ अफगाणिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आला. हा व्हिडीओ एसीबीने आपल्या सोशल मिडिया एक्स अकाऊंटवर शेअर केला. ज्यात एसीबीने गिलगित- बाल्टिस्तान आणि पीओकेला भारताचा हिस्सा दाखवले. या व्हिडीओनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीका केली. पाकिस्तानने यावर हस्तक्षेप घेतला. पाकिस्तान आता हा मुद्दा जागतिक मंचावर उचलण्याच्या तयारीत आहे.
काहीही झाले तरीही जागतिक मंचावर असे मुद्दे मांडून पाकिस्तान कायम रडत असतो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव वाढला. भारत हा अफगाणिस्तानला मदत करत असल्याचे कायमच आरोप पाकिस्तान करतो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध चांगले आहेत. भारत अफगाणिस्तानला मदत करतो. अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, या सीरिजची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत.
ही सीरिज दोन्ही देशांना जवळ आणणार आहे. हे एक सामन्यापेक्षा खूप जास्त मोठा आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सीरिज 13, 14 आणि 17 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळली जाईल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांपासून अधिक मजबूत होताना दिसत आहेत. त्यात आता दोन देशात ही सीरिज होत आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर काही दिवसापूर्वी मोठा हल्ला केला.
ज्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले होते. हॉस्पिटलवर पाकिस्तानने हल्ला केला होता. ज्यानंतर भारत अफगाणिस्तानच्या मदतीला धावून गेला. भारताने अफगाणिस्तानला मोठी मदत पाठवली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. अफगाणिस्तानचे मंत्री काही दिवसांपूर्वीच भारत दाैऱ्यावर आले होते. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील जवळीकता पाकिस्तानसाठी मोठी पोटदुखी ठरत आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पाणी बंद केले. ज्यामुळे पाकिस्तानच्या काही भागात स्थिती अत्यंत गंभीर आहे.
