AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरेपेक्षाही गोड किंमतही लाखांमध्ये हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, जाणून घ्या यात असं काय आहे खास

आंबा हा सर्वांना आवडणारे फळ आहे.भारतात त्याचे अनेक चाहते आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, एक असाही खास आंबा आहे ज्याची किंमत लाखो रुपये आहे? चला तर मग या लेखात आपण या खास आंब्याबद्दल जाणून घेऊयात.

साखरेपेक्षाही गोड किंमतही लाखांमध्ये हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, जाणून घ्या यात असं काय आहे खास
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Apr 05, 2026 | 3:44 PM
Share

भारतात आंब्याला ‘फळांचा राजा’ असे म्हटले जात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. कारण त्याची चव, सुगंध आणि रसाने परिपूर्ण असलेले आंबा हे फळ आहे. उन्हाळा सुरू होताच बाजारपेठा आंब्यांनी भरून जातात. भारतात तुम्हाला आंब्याच्या 1500 हून अधिक जाती आहेत, त्यापैकी काही जगभरात लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला महित आहे का की जगात असा एक आंबा आहे ज्याची किंमत लाखो रुपये असू शकते? हे खूप ऐकायला खूप आश्चर्यकारक असले तरी ते अगदी खरे आहे. होय ‘मियाझाकी आंबा’ नावाची आंब्याची एक विशेष जात आहे आणि त्याची किंमत लोकांना चकित करते.

हा आंबा केवळ त्याच्या किमतीमुळेच नव्हे, तर त्याच्या अद्वितीय रंग, चव आणि गुणवत्तेमुळेही ओळखला जातो. चला तर मग आजच्या लेखात आपण जगातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच तो इतका खास आणि इतका मौल्यवान का आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत.

जगातील सर्वात महागडा आंबा कुठे आढळतो?

मियाझाकी आंब्याची कहाणी त्याच्या चवीइतकीच आकर्षक आहे. जपानच्या मियाझाकी प्रांतात पिकणाऱ्या या आंब्याची लागवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. लागवडीच्या प्रक्रियेमध्ये तापमान, सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषणतत्त्वांचा इतका अचूक समतोल साधला जातो की प्रत्येक आंब्याचे पीक हे एक उत्कृष्ट बनते. यामुळेच हा आंबा सामान्य बाजारात आढळत नाही तर केवळ खास लिलावांमध्ये आणि हाय-एंड ग्राहकांकडेच मिळतो.

मियाझाकी आंब्याचे वैशिष्ट्य काय आहे?

मिझायाकी आंबा अद्वितीय आहे. तो सर्वसाधारण आंब्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. त्याची चव साखरेपेक्षाही गोड असते. तसेच या आंब्याचा रंग पिवळा किंवा हिरवा नसून गडद लाल असतो आणि तो खूप आकर्षक दिसतो. ज्यामुळे हा आंबा खाण्यासाठी मऊ आणि मुलायम लागतो. जपानमध्ये त्याच्या अंड्यासारख्या आकारामुळे आणि सूर्यासारख्या रंगामुळे त्याला ‘एग ऑफ द सन’ म्हणूनही ओळखले जाते. शिवाय त्याची लागवड अत्यंत नियंत्रित आणि वैज्ञानिक पद्धतीने केली जाते, ज्यात प्रत्येक फळाची विशेष काळजी घेतली जाते. यामुळेच हा आंबा केवळ चवीतच नव्हे, तर दिसण्यात आणि गुणवत्तेतही जगातील सर्वात उत्कृष्ट फळांपैकी एक मानला जातो.

मियाझाकी आंब्यांची किंमत किती आहे?

मियाझाकी आंब्याचा भाव प्रति किलो अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत असू शकतो. भारतात या किमतीत एक चांगली बाईक किंवा सेकंड-हँड कारसुद्धा विकत घेता येते. या उच्च किमतीचे कारण असे आहे की, हे आंबे सामान्य बाजारात विकले जात नाहीत. त्याऐवजी जपानमध्ये आंब्यांसाठी अनेक लिलाव कार्यक्रम आयोजित केले जातात. तथापि आता भारतात मध्य प्रदेशातील जबलपूर, बिहारमधील पूर्णिया आणि उत्तर प्रदेशातील वाराणसीसह अनेक ठिकाणी आंब्याची लागवड सुरू झाली आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा