Pakistani beggars : पाकिस्तान नाही भिकारीस्तान, एकाचवेळी रस्त्यावर उतरले इतके लाख प्रोफेशनल भिकारी, कारण…

Pakistani beggars : पाकिस्तानच्या कराची शहरात सध्या तुम्ही जिथे पाहाल तिथे भिकारी दिसतील. एकाचवेळी लाखो भिकारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी जनता हैराण झाली आहे. एकाचवेळी इतके भिकारी रस्त्यावर का उतरलेत? त्यामागे काय कारण आहे.

Pakistani beggars : पाकिस्तान नाही भिकारीस्तान, एकाचवेळी रस्त्यावर उतरले इतके लाख प्रोफेशनल भिकारी, कारण...
Pakistani beggars
| Updated on: Apr 11, 2024 | 11:59 AM

पाकिस्तानात ईदच्या निमित्ताने बाजारांमध्ये उत्साह आहे. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला लोकांना वेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. देशाची आर्थिक राजधानी कराचीमध्ये हजारो भिकारी मुक्कामाला आले आहेत. लाखोंच्या संख्येने हे भिकारी कराचीमध्ये पोहोचले आहेत. शहरातील व्यस्त बाजार, मुख्य रस्ते, ट्रॅफिक सिग्नल, शॉपिंग मॉल आणि मशिदीच्या बाहेर सर्वत्र हे भिकारी दिसतायत. पाकिस्तानात सध्या तेल आणि खाण्या-पिण्याच्या वस्तुच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात लोक या प्रोफेशनल भिकाऱ्यामुळे हैराण झालेत. बाजारापासून मशिद, मॉल्स, रस्ते सर्वत्र हे भिकारी दिसतायत.

रमजानचा पवित्र महिना आणि ईदच्या निमित्ताने चांगले पैसे मिळतील म्हणून 3 ते 4 लाख प्रोफेशनल भिकारी कराचीमध्ये आले आहेत, असं द न्यूज इंटरनेशनल वृत्तपत्राने अतिरिक्त महानिरीक्षक (एआयजी) इमरान याकूब मिन्हास यांच्या हवाल्याने लिहिल आहे. भिकारी आणि गुन्हेगार कराची शहराला प्रमुख बाजार म्हणून पाहतात, असं मिन्हास म्हणाले. हे भिकारी आणि गुन्हेगार सिंध, बलूचिस्तान आणि देशाच्या अन्य भागातून कराचीमध्ये येतात.

हाजीच्या वेशात भीक मागायला चाललेले परदेशात

काही महिन्यापूर्वी हाजीच्या वेशातील अनेक पाकिस्तानी भिकाऱ्यांना सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानातून उतरवण्यात आलं होतं. भीक मागण्यासाठी खाडी देशात चालल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.

बुहतांश पाकिटमार पाकिस्तानी

पाकिस्तानी भिकारी जियारतच्या आडून मध्य पूर्वेची यात्रा करतात.  प्रवासी पाकिस्तानी सचिव जीशान खानजादा यांनी मागच्यावर्षी सांगितलेलं की, “बहुतांश भिकारी उमरा वी वीजावर सौदी अरेबियाला जातात. तिथे जाऊन भीक मागण्याच काम करतात” मक्का येथील भव्य मशिदीच्या आवारात अटक करण्यात आलेले बुहतांश पाकिटमार पाकिस्तानातील आहेत. कराचीमध्ये फक्त रमज़ानच्या महिन्यात गुन्हे घडले, त्यामध्ये कमीत कमी 19 जणांचा मृत्यू झाला.