‘या’ देशाने नोबेलवर उमटविली मोहोर; एकाच देशातील तीन अर्थशास्त्रज्ञांचा होणार गौरव

अर्थशास्त्रातील नोबेल हा बँका आणि आर्थिक संकटांवरील संशोधनासाठी हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

या देशाने नोबेलवर उमटविली मोहोर; एकाच देशातील तीन अर्थशास्त्रज्ञांचा होणार गौरव
| Updated on: Oct 10, 2022 | 5:16 PM

नवी दिल्लीः विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा जागतिक पातळीवर नोबेल पुरस्कार देऊन गौरव केला जातो. त्या नोबेल पारितोषिकामधील आज अर्थसास्रात्रील नोबेल पुरस्कारांची (Nobel Award) घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने बेन एस. बर्नान्के (Ben S. Bernanke), डग्लस डब्ल्यू. डायमंड ((Douglas W. Diamond)  आणि फिलिप एच. डायबविग (Philip H. Dybwig) यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

बँका आणि आर्थिक संकटांवरील संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाला ‘आल्फ्रेड नोबेलच्या स्मृतीतील अर्थशास्त्रातील स्वेरिजेस रिक्सबँक पुरस्कार’ म्हणून संबोधले जाते म्हणतात.

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची आज घोषणा झाली असली तरी त्या पुरस्काराचे वितरण मात्र 10 डिसेंबर रोजी होणार आहे.

या पुरस्कारांतर्गत 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे 9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) रोख पारितोषिक दिले जाते.
हा पुरस्कार 10 डिसेंबर रोजी प्रदान केला जाणार असून इतर नोबेल पारितोषिकांप्रमाणे, अर्थशास्त्रातील पारितोषिकाचा उल्लेखही अल्फ्रेड नोबेल यांच्या 1895 च्या मृत्यूपत्रात करण्यात आला नव्हता.

परंतु स्वीडिश केंद्रीय बँकेने त्यांच्या स्मरणार्थ त्याची स्थापना करुन पहिला विजेत्याची निवड 1969 मध्ये करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड कार्ड आणि जोशुआ अँग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांना देण्यात प्रदान करण्यात आला होता.

किमान वेतन, इमिग्रेशन आणि शिक्षण यांचा श्रम बाजारावर कसा परिणाम होतो, याच्या संशोधनासाठी कार्डला या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

अँग्रिंस्ट आणि इम्बेन्स यांना पारंपरिक वैज्ञानिक पद्धतींनी स्पष्ट नसलेल्या विषयावरील त्यांच्या अभ्यासासाठी पुरस्कार देण्यात आला.

वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांततेसाठी कार्य करणाऱ्यांसाठी नोबेल पारितोषिकांची स्थापना केली गेली होती.

श्रीमंत स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोध लावणारे सर अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रावर आधारित आहे. सर आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी 1901 मध्ये पहिला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अर्थशास्त्रातील नोबेल, अधिकृतपणे आल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ बँक ऑफ स्वीडन प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस म्हणून ओळखला जातो, आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूपत्रावर स्थापित केले गेले नाही, परंतु स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेकडून हे सुरु करण्यात आले होते.