AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : खामेनेईच्या हातात काही तास, शेवटचा चान्स, नाही तर आज रात्री इराणमध्ये काहीतरी भयंकर घडणार

Iran-Israel War : इराणवर आज सकाळी इस्रायल-अमेरिकेने संयुक्त हल्ला केला. त्यानंतर इराणने आखातामधील अन्य देशांमध्ये असलेल्या अमेरिकी तळांवर हल्ले केले. सत्ता बदल हे इस्रायल-अमेरिकेचे उद्दिष्टय आहे.

Iran-Israel War : खामेनेईच्या हातात काही तास, शेवटचा चान्स, नाही तर आज रात्री इराणमध्ये काहीतरी भयंकर घडणार
Ali Khamenei
| Updated on: Feb 28, 2026 | 4:20 PM
Share

इराण विरुद्ध एका भयंकर युद्धाला सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून इशारे, धमक्या सुरु होत्या. आता प्रत्यक्षात रण मैदानातील लढाई सुरु झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात हे युद्ध सुरु केलय. काही रणनितीक उद्दिष्टय डोळ्यासमोर ठेऊन ही लढाई सुरु झाली आहे. यात तेलापेक्षा पण अन्य उद्दिष्टय अमेरिका-इस्रायलसाठी महत्वाची आहेत. काहीही झालं तरी इराणला अणवस्त्र संपन्न राष्ट्र बनू देणार नाही असं राष्ट्राध्य ट्रम्प हे मागच्या काही दिवसांपासून निक्षून सांगत होते. कालही ते हेच बोलले. कारण इराणचं अणवस्त्र संपन्न होणं सर्वप्रथम इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतं. त्यानंतर त्यांची रेंज अमेरिकेपर्यंत पोहोचू शकते.

त्यामुळे ही लढाई अमेरिकेसाठी अनिवार्य बनली होती. इराणचा अणवस्त्र कार्यक्रम हे एक हल्ल्यासाठी कारण आहेच. पण त्याशिवाय इराणच्या बॅलेस्टिक मिसाइलची वाढत जाणारी ताकद हे सुद्धा त्यांच्यावर हल्ला करण्यामागचं अजून एक कारण आहे. जून महिन्यात इराण-इस्रायलमध्ये पहिलं युद्ध झालं. त्यावेळी इराणी मिसाईल्सची ताकद दिसून आली. या मिसाईल्सची रेंज इस्रायलपर्यंत सहज पोहोचली. भविष्यात ही ताकद आणखी वाढली तर इस्रायल आणि अमेरिका दोघांची डोकेदुखी वाढणार होती. म्हणून इराणला रोखणं त्यांची मजबुरी बनली होती.

हे युद्ध कधीपर्यंत चालणार?

त्यातूनच या युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणवर आज सकाळी इस्रायल-अमेरिकेने संयुक्त हल्ला केला. त्यानंतर इराणने आखातामधील अन्य देशांमध्ये असलेल्या अमेरिकी तळांवर हल्ले केले. सत्ता बदल हे इस्रायल-अमेरिकेचे उद्दिष्टय आहे. तिथे आपल्याला अनुकूल माणूस सत्तेवर येत नाही तो पर्यंत हा त्रास, संघर्ष चालूच राहणार हे त्यांना माहित आहे. म्हणून अंतिम घाव घालणं हाच या युद्धाचा उद्देश आहे.

आज रात्री इराणमध्ये काहीतरी मोठं घडू शकतं

तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी आज आपल्या देशाला संबोधित करताना इराणला एक मोठा इशारा दिला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी सैन्याला आत्मसमर्पण करायला सांगितलं आहे. जर इराणी सैनिकांनी आत्मसमर्पण केलं तर त्यांना चांगली वागणूक देऊ, सुरक्षा देऊ. पण नकार दिला तर मृत्यू अटळ आहे. आज रात्री इराणमध्ये सर्वच ठिकाणी बॉम्ब पडतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज रात्री इराणमध्ये काहीतरी मोठं घडू शकतं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...