AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Tariff: टॅरिफचा निर्णय अमेरिकेच्या अंगलट, ‘या’ वस्तूंना खरेदीदार मिळेना, ट्रम्प चिंतेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर कर लादला आहे, मात्र हा निर्णय अमेरिकेसाठी चिंताजनक ठरत आहे. टॅरिफच्या निर्णयामुळे चीन, रशिया, ब्राझील आणि भारताने कठोर भूमिका घेत व्यापाराबाबत कडक निर्णय घेतला आहे.

US Tariff: टॅरिफचा निर्णय अमेरिकेच्या अंगलट, 'या' वस्तूंना खरेदीदार मिळेना, ट्रम्प चिंतेत
Donald-Trump news
| Updated on: Sep 30, 2025 | 3:56 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर कर लादला आहे, मात्र हा निर्णय अमेरिकेसाठी चिंताजनक ठरत आहे. कारण आता अमेरिकन मका आणि सोयाबीनसाठी खरेदीदार मिळणे कठीण झाले आहे. टॅरिफच्या निर्णयामुळे चीन, रशिया, ब्राझील आणि भारताने कठोर भूमिका घेत व्यापाराबाबत कडक निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सोयाबीन पीक आता तयार झाले असून त्याची काढणी सुरु होणार आहे. मात्र आता सोयाबीन विकायचे कुठे असा प्रश्न अमेरिकेला पडला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर चीनने अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करणे बंद केले आहे. चीन आता ब्राझील आणि अर्जेंटिनामधून सोयाबीन खरेदी करत आहे. अमेरिकेने 2024 मध्ये 24.5 अब्ज डॉलर्स किमतीचे सोयाबीन निर्यात केले होते, त्यातील 50 टक्के म्हणजे 12.5 अब्ज डॉलर्सचे सोयाबीन एकट्या टीनने खरेदी केले होते. मात्र आता चीनने सोयाबीनची खरेदी बंद केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.

भारत अमेरिकेतील संकरित मका आणि सोयाबीन खरेदी करत नाही. तसेच अमेरिकेने यावर 60 टक्के टॅरिफ लादलेला आहे. त्यामुळे भारत भारत सोयाबीन, सोया तेल आणि कृषी संबंधिक पदार्थ अर्जेंटिना, ब्राझील आणि युक्रेनकडून खरेदी करत आहे. भारत आमच्याकडून मका खरेदी करत नाही अशी तक्रारही एका अमेरिकन मंत्र्याने केली होती.

अमेरिकेन उत्पादनांना खरेदीदार मिळणार नाही

चीनच्या या निर्णयामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. भारतीय वकील आणि लेखक नवरूप सिंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी, ‘भारत आणि चीन अमेरिकन सोयाबीनवरील त्यांच्या भूमिकेवर कायम राहिले तर कोणीही अमेरिकन मका आणि सोयाबीन खरेदी करणार नाही. जर ट्रम्प यांनी टॅरिफचा बोजा वाढवत राहिले तर इतरही अमेरिकन उत्पादनांना खरेदीदार मिळणार नाही. असे झाल्यास ट्रम्प यांना त्यांच्याच शेतकऱ्यांकडून विरोध होईल, कारण याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे.

टॅरिफच्या निर्णयाचा अमेरिकेला फटका

अमेरिकन सिनेट नेते जॉन थुन यांनी टॅरिफच्या निर्णयाचा अमेरिकेला फटका बसत असल्याते कबूल केले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे आणि अमेरिकन उत्पादनांना कमी खरेदीदार मिळत आहेत. ट्रम्पच्या टॅरिफला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेवर 34 टक्के टॅरिफ लादला आहे, तसेच सोयाबीन खरेदी थांबवली आहे. तसेच भारत, ब्राझील आणि रशियानेही अमेरिकेविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...