AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, महत्त्वाच्या भागावर दहशतवाद्यांचा ताबा? आता बंदू घेऊन थेट…

पाकिस्तानी लष्कर तसेच पाकिस्तानी सरकारपुढे टीटीपी या दहशतवादी संघटनेने मोठे आव्हान निर्माण केले आहे. खैबर पख्तुनख्वा या भागात टीटीपीचे सदस्य बंदुक घेऊन खुलेआम फिरताना दिसत आहेत.

पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, महत्त्वाच्या भागावर दहशतवाद्यांचा ताबा? आता बंदू घेऊन थेट...
pakistan
| Updated on: Oct 24, 2025 | 9:22 PM
Share

TTP In Pakistan : पाकिस्तान हा देश नेहमीच आपल्या शेजारच्या देशांसोबत काहीतरी कुरापती करत असते. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानात आतापर्यंत अनेक कट रचण्यात आले आहेत. हाच देश अफगाणिस्तान या शेजारी राष्ट्रालाही डिवचत असतो. नुकतेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्लेही केले. दरम्यान, आता याच अफगाणिस्तानातून पाकिस्तानविरोधी कारवाया करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या काही भागावर ताबा मिळवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

नेमकं काय घडलं?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांच्या सीमेजवळ पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्वा नावाचा प्रांत आहे. याच प्रांतातील अनेक जिल्ह्यांत तहरीक ए तालिबान पाकिस्तान तसेच या संघटनेशी संबंधित असलेल्या इतर दहशतवादी संघटनेने आपला विस्तार केला आहे. या संघटनेने पाकिस्तानचा काही भाग आपल्या ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच या भागात पाकिस्तान सैनिकांचे येणे-जाणे कठीण होऊन बसले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असलेल्या डुरँड लाईच्या आसपासचा मोठा भाग टीटीपी संघनटेने आपल्या ताब्यात घेतला आहे. सध्या खैबर, कुर्रम, उत्तरी दक्षिणी वजीरिस्तान आणि बाजौर हे भाग पाकिस्तान लष्करासाठी नो झोन बनले आहेत.

टीटीपीचे सदस्य खुलेआम फिरतायत

म्हणजेच पाकिस्तानी लष्कराला या भागात जाता येत नाहीये. इथे टीटीपी या संघटनेने आपल्या काही चौक्या उभ्या केल्या आहेत. सोबतच टीटीपीचे सदस्य या भागातील वाहनांची खुलेआम तपासणी करत आहेत. सोबतच पेशावर-खैबर रोड, हंगरू-खुर्रम कॉरिडोर आणि बन्नू-डेरा इस्माइल खान या भागातील रस्त्यांवर टीटीपीचे सदस्य खुलेआम जिहादच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेत आहेत. या दहशतवाद्यांनी याचे काही व्हिडीओ समाजमाध्यमावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

टीटीपीचा विस्तार पाकिस्तानसाठी आव्हान

टीटीपीचे हे कृत्य म्हणजे पाकिस्तानी सरकार तसेच पाकिस्तान लष्करासाठी खुले आव्हान असल्याचे बोलले जात आहे. अगोदर टीटीपीचे सदस्य डोंगर प्रदेशात तसेच ग्रामीण भागात राहायचे. आता हे सदस्य पेशावरच्या आजसपास दिसू लागले आहेत. बदाबेर, मत्तानी आणि बारा रोड या भागात TTP चे नेटवर्क चांगलेच सक्रिय झाले आहे. टीटीपीचा हा विस्तार पाकिस्तानातील सुरक्षेसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास पाकिस्तानाल खैबर पख्तुनख्वा हा प्रदेश सोडून द्यावा लागतो की काय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी सेना, पाकिस्तानी सरकार नेमके काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..