AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा जनरल झाला वेडापिसा…भारताबद्दल बोलताना बरळला, नेमकं काय म्हणाला?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद फार जुना आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर आता एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने भारताबद्दल गरळ ओकली आहे. आम्ही भारतासोबत चर्चा करायला तयार आहोत, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

पाकिस्तानचा जनरल झाला वेडापिसा...भारताबद्दल बोलताना बरळला, नेमकं काय म्हणाला?
india vs pakista
| Updated on: Oct 21, 2025 | 6:27 PM
Share

India Vs Pakistan : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांत कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. अजूनही भारत-पाकिस्तान यांच्यातील व्यापार सुरू झालेला नाही. दरम्यान, भारताने हल्ले केल्यानंतर पाकिस्ताननेदेखील भारतावर हवाई हल्ले केले होते. याच हल्ल्यांचा आधार घेत आम्ही भारताला नमवलं असा दावा पाकिस्तानी लष्कराकडून केला जातो. सध्या पाकिस्तानी लष्करात मोठ्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना अनेक बडे दावे केले आहेत. विशेष म्हणजे भारतीय लष्कराचे राजकीयीकरण झाले आहे, असा मोठा दावा या अधिकाऱ्याने केला आहे.

‘भारतीय लष्करात राजकरणाचा हस्तक्षेप’

या आधिकाऱ्याचे नाव जनरल साहीर शमशाद मिर्झा असे आहे. या अधिकाऱ्याला एका कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली. हीच संधी साधत या आधिकाऱ्याने भारतावर गंभीर आहे. भारतीय लष्करात राजकरणाचा आणि भारतीय राजकारणात लष्कराचा मोठा हस्तक्षेप आहे, असा दावा या पाकिस्तानी अधिकाऱ्याने केला आहे. आमचा पाकिस्तान देश संवादाला प्राधान्य देतो. संघर्षाऐवजी शांततेला महत्त्व देतो, असा पोकळ दावा या अधिकाऱ्याने केला.

आम्ही चर्चा करायला तयार

सोबतच, या अधिकाऱ्याने काश्मीरच्या मुद्द्यावरही भाष्य केले. आम्ही भारतासोबत चर्चा करायला तयार आहोत. भारतासोबत असलेल्या सर्व वादावर चर्चा करायची आमची तयारी आहे. पाकिस्तानला भारतासोबतचे संबंध पूर्ववत हवे आहेत. शांतपूर्ण सहअस्तित्वाला आम्ही प्राधान्य देतो. पण भारताकडूनही अशाच प्रकारची इच्छा व्यक्त होणे गरजेचे आहे, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

‘वाद मिटवण्यासाठी तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप गरजेचा’

काश्मीरचा मुद्दा हा फक्त भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील मुद्दा आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही तृतीय शक्तीचा हस्तक्षेप मान्य नाही, अशी भारताची भूमिका आहे. पण या अधिकाऱ्याने मात्र भारतासोबतचा वाद मिटवण्यासाठी तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप गरजेचा आहे, अशी आमची भूमिका असल्याचे या आधिकाऱ्याने सांगितले. सोबतच अशा प्रकारचा हस्तक्षेप करण्यास जगातील कोणताही देश तयार असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असेही मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...