AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Inflation : पाकिस्तान भिकेला लागला, एका टोमॅटोसाठी तब्बल…महागाईमुळे जगणं कठीण!

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. आता याच संघर्षामुळे पाकिस्तानला फटका बसायला सुरुवात झाली आहे. इथे टोमॅटोचा भाव थेट 700 रुपये किलोवर पोहोचला आहे.

Pakistan Inflation : पाकिस्तान भिकेला लागला, एका टोमॅटोसाठी तब्बल...महागाईमुळे जगणं कठीण!
pakistan inflation
| Updated on: Oct 21, 2025 | 4:25 PM
Share

Pakistan Tomato Price Hike : पाकिस्तान हा नेहमीच महागाईने त्रस्त असतो. तिथे कधी अन्नधान्य महाग होते तर कधी तेथे फळभाज्यांचे दर गगनाला भिडतात. याच कारणामुळे तिथे सामान्यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. सध्या पाकिस्तानातील जनता टोमॅटोच्या वाढलेल्या भावामुळे त्रस्त आहे. पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत झालेला संघर्ष तसेच इतर स्थानिक कारणांमुळे तिथे टोमॅटोचा भाव तब्बल 700 रुपये (पाकिस्तानी रुपया) प्रतिकिलोवर जाऊन पोहोचला आहे.

टोमॅटोचा भाव 700 रुपये किलोंपेक्षा जास्त

अफगाणिस्तानसोबत संघर्ष झाल्यानंतर पाकिस्तानातील देशांतर्गत बाजाराची फारच वाईट स्थिती झाली आहे. तिथे टोमॅटोचा भाव चांगलाच वाढला आहे. लाहोर, कराची यासारख्या मोठ्या शहरांत हा भाव थेट 500 रुपयापेक्षाही जास्त झाला आहे. स्वयंपाकघरात टोमॅटोला फार महत्त्व आहे. पाकिस्तानात अगोदर टोमॅटोचा भाव 100 रुपये प्रतिकिलो होता. आता हाच भाव थेट 700 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढला आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत झाली

पाकिस्तानातील या महागाईबाबत तेथील स्थानिक वृत्तवाहिनी समा टीव्हीने सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सध्या पाकिस्तानातील अनेक भागांना अतिवृष्टीने ग्रासलेले आहे. त्यामुळेच या भागातील पीक उद्ध्वस्त झाले आहे. सोबतच अतिवृष्टीमुळे व्यापारदेखील कोडमडला असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे तिते टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरे कारण म्हणजे सीमेवर पाकिस्तानचे अफगाणिस्तानसोबत संबंध खराब झाल्यामुळे आयातीवर परिणाम झाला आहे. परिणामी टोमॅटो तसेच इतर फळभाज्यांचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत.

पंजाब प्रांताला सर्वाधिक फटका

समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये टोमॅटोचा सर्वाधिक भाव पंजाब प्रांतात वाढला आहे. झेलम आणि गुजरांवाला या भागात टोमॅटो अनुक्रमे 700 रुपये आणि 575 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. पाकिस्तानातील अन्य भागांचा विचार करायचा झाल्यास मुल्तानमध्ये टोमॅटोचा भाव 450 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. फैसलाबादमध्ये टोमॅटो 500 रुपये प्रतिकिलोने विकला जातोय. सरकारच्या हिशोबानुसार टोमॅटोचा भाव फार तर 170 रुपये किलो असायला हवा. प्रत्यक्ष मात्र तिथे टोमॅटोचा भाव थेट 500 रुपये प्रतिकिलोच्याही पुढे गेला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...