Today new gold rates : सोन्याच्या दरात प्रचंड मोठी उलथापालथ, तब्बल 7 हजारांनी घसरलं, जाणून घ्या नवे दर
सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सारखी चढ-उतार सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र आता मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर झपाट्याने बदलत आहेत. नवे दर जारी करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. कधी अचानक सोन्याचे दर वाढत आहेत, तर कधी सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण पहायला मिळत आहे. दिवाळीनंतर आता लग्नसराई सुरू होत आहे. या काळात तर सोन्याच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ज्यांना सोन्याची खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी एक गुडन्यूज आहे, ती म्हणजे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. बुलियन वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आज 21 ऑक्टोबर बुधवार रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 146270 रुपये प्रति तोळा एवढा आहे. तर 22 कॅरट सोन्याचा दर 134081 रुपये प्रति तोळा एवढा आहे. दरम्यान बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी 24 कॅरट सोन्याचा दर हा प्रति तोळा 153780 रुपये एवढा होता.
याचाच अर्थ गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात तब्बल 5.13 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या महिनाभरात सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे सात हजार रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याच्या दरात दर दिवशी चढ-उतार सुरू आहे. मात्र महिन्याचा विचार करता, सोन्याच्या दरात पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे.
मात्र तज्ज्ञांच्या मते जरी सध्या घसरण सुरू असली तरी देखील लग्नसराईच्या आधी सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरू शकतं, आधी दिवाळी आणि नंतर येणाऱ्या लग्नसराईमुळे येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. तसेच दुसरीकडे जागतिक स्थरावर अनेक देशांमधील सेंट्रल बँकांनी सोने खरेदीचा धडका लावल्यामुळे येणाऱ्या काळात सोनं आणखी महाग होण्याची शक्यता आहे. मात्र ग्राहकांनी सर्व बाजुंचा आर्थिक जोखमीचा विचार करून मगच सोने खरेदीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला देखील या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे दर गगनला भिडले आहेत. सोनं प्रचंड महाग झालं आहे.
