AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Nepal : भारत-नेपाळ सीमावादाच्या विषयात हस्तक्षेप करण्याबाबत ब्रिटनकडून भूमिका स्पष्ट, बालेन शाह यांना दुसरा धक्का

India-Nepal Border Dispute : नेपाळमध्ये सत्तांतर होऊन बालेन शाह पंतप्रधान बनले. नेपाळला एक युवा पंतप्रधान लाभला. पण बालेन शाह सत्तेत आल्यापासून सतत भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत-नेपाळ संबंध सुधरवण्याऐवजी खराब करण्याकडे त्यांचा कल आहे.

India-Nepal : भारत-नेपाळ सीमावादाच्या विषयात हस्तक्षेप करण्याबाबत ब्रिटनकडून भूमिका स्पष्ट, बालेन शाह यांना दुसरा धक्का
Nepal PM Balen Shah-British Ambassador
| Updated on: Jun 01, 2026 | 4:17 PM
Share

भारताशी सीमा वादाच्या विषयात नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना मोठा झटका बसला आहे. सुगौली कराराचा हवाला देत नेपाळच्या पंतप्रधानांनी ब्रिटनकडे मदत मागितली होती. पण ब्रिटनने बालेन शाह यांची विनंती धुडकावून लावली आहे. भारत-नेपाळमधला हा द्विपक्षीय विषय आहे. यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. भारताशी सीमा वादाच्या विषयावरुन नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांची आपल्याच देशात कोंडी झाली आहे, त्यानंतर त्यांना आता ब्रिटनच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. द काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार बालेन शाह यांचे मुख्य सल्लागार कुमार ब्यांजंकर यांनी काही दिवसांपूर्वी राजधानी काठमांडूमध्ये ब्रिटिश राजदूत रॉब फेन यांची भेट घेतली होती. “नेपाळ आणि भारतामध्ये बॉर्डर संदर्भात सुगौली करार आहे. त्यात ब्रिटनही एक पक्षकार आहे. अशावेळी सीमावाद सोडवण्यासाठी ब्रिटनने पुढाकार घेतला पाहिजे” असं ब्यांजंकर यांचं म्हणणं आहे.

1816 साली ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळमध्ये सुगौली करार झाला होता. दोन्ही देशांमध्ये बॉर्डरच्या सर्वेक्षणासंदर्भात निर्णय झाला होता. नेपाळ हा करार मान्य करायला तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे की, या करारात काठमांडूची काही जमीन भारताला देण्यात आली आहे. कालापानी याचं मुख्य उदहारण आहे, असं नेपाळचं म्हणणं आहे. बालेन शाह यांचे मुख्य सल्लागार ब्यांजंकर यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना सांगितलं की, तुम्ही त्यावेळी एक पक्षकार होता, त्यामुळे तुम्ही या विषयावर बोललं पाहिजे. तुम्ही पुढाकार घेतला, तर नेपाळ आणि भारतामध्ये करार होऊ शकतो असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

बालेन शाह माफी मागणार का?

यावर ब्रिटनच्यावतीने भूमिका स्पष्ट करताना फेन म्हणाले की, भारत आणि नेपाळमधाल द्विपक्षीय विषय आहे. ब्रिटन यात हस्तक्षेप करणार नाही. त्यानंतर बालेन शाह यांचे सल्लागार ब्यांजंकर माघारी फिरले. रविवारी 31 मे रोजी नेपाळी संसदेत बोलताना बालेन शाह यांनी सीमा वादासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. बालेन म्हणाले की, “पंतप्रधान झाल्यावर मला कळलं की, नेपाळने सुद्धा भारताच्या काही भूभागावर कब्जा केला आहे” त्यांच्या या वक्तव्याला विरोधी कम्युनिस्ट पार्टीने राष्ट्रद्रोह ठरवलं आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक स्टेटमेंट जारी करुन हे वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते नेपाळचे काही शेतकरी भारतात शेती करतात. बालेन शाह यांनी या वक्तव्यासाठी माफी मागितली पाहिजे अशी नेपाळमधल्या विरोधी पक्षांची मागणी आहे.

Follow Us
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग