AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balen Shah : बालेन शाहा यांचा भारताबाबत खळबळजनक दावा, आता थेट घेणार या बलाढ्य देशाची मदत, नेपाळमुळे डोकेदुखी वाढणार

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा बालेन शाह यांनी भारताबाबत मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मार्चमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच संसदेमध्ये बोलत होते.

Balen Shah : बालेन शाहा यांचा भारताबाबत खळबळजनक दावा, आता थेट घेणार या बलाढ्य देशाची मदत, नेपाळमुळे डोकेदुखी वाढणार
balen shahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 4:25 PM
Share

नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी रविवारी पहिल्यांदाच नेपाळच्या संसदेमध्ये भाषण केलं. नेपाळमध्ये झालेल्या जेन झीच्या आंदोलनामुळे देशात सत्ता बदल झाला. गेल्या मार्च महिन्यात नेपाळमध्ये निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये बालेन शाह यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. दरम्यान बालेन शाहा यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत, जे भारतासाठी अडचणीचे ठरणार आहेत. त्यांनी मार्चमध्ये पंतप्रधानपदाची सुत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच ते संसदेमध्ये बोलले आहेत. संसदेमध्ये बोलत असताना बालेन शाह यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ज्यामध्ये नेपाळचं परराष्ट्र धोरण, नेपाळचे भारत आणि चीनसोबत असणारे संबंध अशा गोष्टींवर त्यांनी चर्चा केली आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भारताबद्दल पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. भारतासोबत जो वाद सुरू आहे, त्यावर चर्चा करून मार्ग काढला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मी पंतप्रधान झाल्यानंतर मला असं कळालं आहे की, फक्त भारतानेच नेपाळच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं नाही तर काही ठिकाणी नेपाळने देखील भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी मिळून यावर तोडगा काढणं गरजेचं आहे, असं बालेन शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुन्हा एकदा बालेन शाह यांनी लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी यावर नेपाळचा दावा सांगितला आहे. तसेच हे प्रश्न चर्चेद्वारे सोडवले जाऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. नेपाळने यापूर्वीही भारताला एक अधिकृत राजनैतिक पत्र पाठवले आहे, आणि त्यांचं उत्तर देखील मिळालं आहे, असा खुलासाही यावेळी बालेन शाह यांनी केला आहे. भारतासोबत जो जमिनीसंदर्भात वाद सुरू आहे, त्यावर आपण चर्चेद्वारे तोडगा काढू शकतो, यामध्ये केवळ भारतानेच नाही तर ब्रिटश सरकारने देखील लक्ष द्यावं, कारण हे प्रकरण तेव्हापासून सुरू आहे, जेव्हापासून ब्रिटश राजवटीने भारत सोडला होता, आम्ही या संदर्भात ब्रिटश सरकारसोबत देखील चर्चा केली असल्याचं बालेन शाहा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...