मोठा विमान अपघात टळला, थोडक्यात वाचले 282 प्रवाशांचे प्राण

अटलांटा येथे जाणारं डेल्टा एअरलाइन्सच हे विमान रनवेच्या दिशेने रवाना झालं होतं. यावेळी विमानात 282 प्रवासी होते. प्रवाशांना असा अनुभव आला, त्या बद्दल खेद व्यक्त करण्यात आलाय.

मोठा विमान अपघात टळला, थोडक्यात वाचले 282 प्रवाशांचे  प्राण
Plane Fire
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 22, 2025 | 7:44 AM

अमेरिकेच्या ऑरलँडो इंटरनॅशनल एअरपोर्टवर डेल्टा एअरलाइन्सच्या एका विमानात अचानक आग लागली. यावेळी विमानात 282 प्रवासी होते. वेळीच आगीची माहिती मिळाल्याने मोठी जिवीतहानी टळली. प्रवाशांना इमर्जन्सी स्लाइड्समधून तात्काळ बाहेर काढण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्नुसार सोमवारी स्थानिक वेळेनुसार ऑरलँडो इंटरनॅशनल एअरपोर्टवर डेल्टा एअर लाइन्सच्या विमानात अचानक आग लागली. त्यानंतर प्रवाशांना इमर्जन्सी स्लाइड्समधून तात्काळ बाहेर काढण्यात आलं.

अटलांटा येथे जाणारं डेल्टा एअरलाइन्सच हे विमान रनवेच्या दिशेने रवाना झालं होतं. त्याचवेळी दोन इंजिन्सपैकी एकामध्ये आग भडकली. फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशन आणि डेल्टा एअरलाइन्सकडून ही माहिती देण्यात आली. एफएएने या घटनेची चौकशी सुरु केली आहे. उजव्या बाजूला असलेल्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळा निघताना दिसत होत्या. टर्मिनलमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने हे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं.

ही दिलासा देणारी बाब

रिपोर्ट्नुसार विमानात 282 प्रवासी होते. सुदैवाने एकही प्रवासी या दुर्घटनेत जखमी झालेला नाही, ही दिलासा देणारी बाब आहे. विमानाच्या दोन इंजिनपैकी एका टेलपाइपमध्ये आगीच्या ज्वाळा दिसताच डेल्ड फ्लाइट क्रू ने तात्काळ प्रवासी केबिन रिकामी करण्याच्या प्रक्रियांच पालन केलं, असं एअरलाइन्सकडून सांगण्यात आलं.

मेन्टेन्स टीमकडून तपासणी

प्रवाशांना असा अनुभव आला, त्या बद्दल खेद व्यक्त करतो तसच अशावेळी प्रवाशांनी जे सहकार्य केलं, त्या बद्दल त्यांचे आभार असं डेल्टा एअरलाइन्सकडून सांगण्यात आलं. सुरक्षेपेक्षा जास्त महत्त्वाच काही नाहीय. डेल्टाची टीम आमच्या ग्राहकांना लवकरात लवकर अंतिम डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करेल. डेल्टाच्या प्रवाशांना दुसऱ्या विमानाने त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचवलं जाईल. मेन्टेन्स टीम आग लागलेल्या विमानाची तपासणी करत आहे.