AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प रागाने लाल; इराणचे वाईट दिवस पुन्हा सुरू? चर्चा निष्फळ ठरल्याने पुन्हा भयंकर युद्ध?

US Iran Peace Talk : इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता कराराबाबतची चर्चा फिस्कटली आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प रागाने लाल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. ट्रम्प नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प रागाने लाल; इराणचे वाईट दिवस पुन्हा सुरू? चर्चा निष्फळ ठरल्याने पुन्हा भयंकर युद्ध?
Trump angry Image Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 12, 2026 | 3:21 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता कराराबाबत पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा सुरू होणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण दोन्ही देशांनी आपण युद्धासाठी तयार असल्याची माहिती दिली आहे. ही चर्चा फिस्कटल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका विधानामुळे युद्धाच्या शक्यतेची चर्चा पुन्हा वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी संतप्त होत नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा पार पडली, मात्र यात तोडगा निघालेला नाही, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले आहेत. त्यांनी इराणला पुन्हा पाषाण युगात पाठवण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे इराणचे वाईट दिवस पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी आधीच म्हटले आहे की, करार झाला किंवा नाही, याने आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आधीच जिंकलो आहोत.

अमेरिका इराणला कसं घेरणार?

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक बातमीचा लेख शेअर केला आहे, ज्यामध्ये असा उल्लेख आहे की, चर्चा अपयशी झाल्यानंतर आता ट्रम्प यांच्याकडे इराणची नौदल नाकेबंदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हा लेख चर्चा सुरु असतानाचा असला तरी त्यात असे लिहिलेले आहे की, जर इराणने अंतिम प्रस्ताव नाकारला, तर ट्रम्प यांच्याकडे अनेक पर्याय तयार आहेत. यात इराणला पाषाण युगात पाठवण्याची धमकीही दिली आहे. तसेच अमेरिका आता व्हेनेझुएलासारखीच इराणची आर्थिक नाकेबंदी करू शकते.

हॉर्मुज सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवणे सोपे

लेक्सिंग्टन इन्स्टिट्यूटच्या सुरक्षा तज्ज्ञ रेबेका ग्रँट यांनी म्हटले की, अमेरिकन नौदलासाठी आता हॉर्मुज सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होईल. मागील 24 तासांत सुमारे 10 जहाजांनी प्रवास केला, यात एका रशियन टँकरचीही समावेश होता. त्यांनी पुढे म्हटले की, जर इराणने आक्रमक भूमिका घेतली, तर अमेरिकन नौदल आपली देखरेख वाढवेल. असं झाल्यास खार्ग बेट किंवा ओमानजवळील अरुंद मार्गातून जाण्यासाठी अमेरिकन नौदलाची परवानगी घेणे गरजेचे असून शकते. त्यामुळे अमेरिका या मार्गावर नियंत्रण मिळवू शकते.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ