AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran War: सौदीपासून ते रशियापर्यंत, इराण-इस्त्रायल युद्धात भारताचे मित्र कुणाच्या पाठिशी? मोदींची भूमिका काय?

US Israel Iran War: इस्त्रायलने इराणवर हल्ला चढवला आहे. अमेरिकेच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला. या युद्धात भारताचे मित्र कोणत्या देशाच्या पाठीशी आहेत, या युद्धाचा काय परिणाम होईल, भारताला काय झळ बसेल असाही प्रश्न विचारला जात आहे.

US-Iran War: सौदीपासून ते रशियापर्यंत, इराण-इस्त्रायल युद्धात भारताचे मित्र कुणाच्या पाठिशी? मोदींची भूमिका काय?
अमेरिका-इस्त्रायल-इराणImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Feb 28, 2026 | 2:01 PM
Share

US Israel Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आज इस्त्रायलयच्या मदतीने इराणवर हल्ला चढवला. इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानसह सहा मोठ्या शहरांवर मोठा हल्ला चढवला. क्षेपणास्त्र सोडली. खोमेनी यांच्या निवासस्थानाजवळही स्फोट झाल्याची वार्ता समोर येत आहे. इराणच्या राष्ट्रपती भवनावरही क्षेपणास्त्र सोडण्यात आले. इराणच्या अणू ठिकाणं लक्ष्य करण्यात आली. इराणकडूनही या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मध्य-पूर्वेतील या युद्धाची झळ आता जवळच्याच सर्वच राष्ट्रांना बसणार आहे. पण चीन आणि रशियाने या इराणला मदत केली तर जागतिक युद्ध भडकण्याची भीती वर्तवली जात आहे. या युद्धात भारताची आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचा कुणा कुणाला पाठिंबा आहे हे पाहूयात.

भारताचा पाठिंबा कुणाला?

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण-इस्त्रायल युद्धा दरम्यान भारताची भूमिका तटस्थ असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही देशाबाबत काही सांगणे सध्या कठीण आहे. या पट्ट्यात रशिया, सौदी अरब, अमेरिका, फ्रान्स आणि कतार हे भारताचे पक्के दोस्त मानले जातात. कतार आणि सौदी अरब हे मुस्लिम देश आहेत. तर रशिया आणि अमेरिकेत युक्रेन युद्धावरून तणाव आहे. त्यामुळे हे युद्ध जास्त वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. भारताने शांततेचे आवाहन केले आहे.

1 इस्त्रायल अमेरिकेच्या पक्षात

या युद्धात इस्त्रायल अमेरिकेच्या बाजूने उतरले आहे. यापूर्वी सु्द्धा इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ला चढवला होता. इराण इस्त्रायलवर प्रति हल्ले केले होते. ट्रम्प हे इराणसोबत अणू करारावर चर्चा करत होते. पण चर्चा फिसकटली आणि इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने ताबडतोब हल्ले सुरू केले. चर्चेच्या सात फेऱ्या संपल्या आहेत. आता 15 जून रोजी ओमान येथे पुढील चर्चा होणार होती. त्यापूर्वीच हल्ले सुरू झाले आहेत.

2 सौदी अरब इराणसोबत पण…

सौदी अरबने इराण आणि इस्त्रायल युद्धात, इराणची बाजू घेतली. सौदीने इस्त्रायलला शांतता धोरणाचे आवाहन केले होते. आता युद्धा पुन्हा भडकल्यानंतर सौदी अरब अमेरिकेच्या बाजूने उभे राहते की इराणच्या बाजूने हे लवकरच समोर येईल. सौदीने दोन्ही देशांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.

3 रशियाची भूमिका महत्त्वाची

रशियाची भूमिका ही शांततेच्या बाजूने आहे. पुतिन यांनी मध्य-पूर्वेत शांतता धोरण ठेवण्याचे आवाहन यापूर्वी सुद्धा केले होते. पण युक्रेन युद्धावरून आणि विविध प्रतिबंधांमुळे रशिया आणि अमेरिकेत तणाव वाढलेला आहे. अशा परिस्थितीत रशिया काय भूमिका घेते याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

तर फ्रान्स ही तटस्थ आहे. इराणने फ्रान्सला सुद्धा धमकी दिली होती. त्यामुळे फ्रान्स इस्त्रायलची बाजू घेण्याची शक्यता आहे. तर कतर हा मुस्लिम देश इराणच्या बाजूने आहे. कतार आणि इस्त्रायलचे वाजलेले आहे. त्यामुळे कतारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...