AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Israel Iran News LIVE : अमेरिका आणि इराणमधील युद्ध लवकर थांबणार नाही – डॉ. विजय खरे

| Edited By: | Updated on: Mar 02, 2026 | 9:46 PM
Share

US-Israel Iran War News LIVE Updates in Marathi: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे. यामध्ये आता इराणला पाठिंबा देण्यासाठी हिजबुल्लाहने युद्धात उडी घेतली आहे. युद्धासंबंधी आणि देशातील, राज्यांमधील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या या ब्लॉगमध्ये...

US-Israel Iran News LIVE : अमेरिका आणि इराणमधील युद्ध लवकर थांबणार नाही - डॉ. विजय खरे

अमेरिका-इस्रायल या दोन देशांनी संयुक्तपणे कारवाई करत इराणवर भीषण हल्ला केला आहे. सगल तीन दिवस युद्ध सुरु आहे. इराणने देखील प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत, ज्यामुळे संघर्ष वाढत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे खामेनी यांच्या मृत्युनंतर, इराणनेही आपला अटल पवित्रा दाखवला आहे. आता या युद्धात हिजबुल्लाहने देखील उडी घेतली आहे. नोव्हेंबर 2024 मधील युद्धविरामाच्या करारानंतर पहिल्यांदा हिजबुल्लाह युद्धात सक्रिय झाला आहे. युद्धात सक्रिय झाल्यानंतर हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमधील अनेक समुदायांवर मोठ्या प्रमाणात रॉकेट डागले आहेत. रिपोर्टनुसार, या हल्ल्यात हायफा परिसरात थेट 6 हल्ले झाले आहेत. हिजबुल्लाहने लेब़नॉनच्या भूमीवरून कारवाया सुरू केल्या आहेत. इस्रायलचा लेबनीज सरकारशी कोणताही प्रश्न नाही. युद्धासंबंधी आणि देशातील, राज्यांमधील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या या ब्लॉगमध्ये…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Mar 2026 06:00 PM (IST)

    ओमानच्या जवळ तेल टँकरवर हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

    ओमानच्या जवळ तेल टँकरवर भीषण हल्ला

    तेल टँकरवर ड्रोन हल्ला

    एका भारतीय व्यक्तीचा हल्ल्यामध्ये मृत्यू

    इतर जणांना वाचवण्यात यश

  • 02 Mar 2026 05:45 PM (IST)

    कुवेतमध्ये अमेरिकेचे फायटर जेट पाडले, इराणचा मोठा दावा

    इस्रायल, अमेरिका, इराणमध्ये भीषण युद्ध

    इराणकडून अमेरिकेचं सैन्यतळ असलेल्या इतर देशांवरही हल्ला

    कुवेतमध्ये अमेरिकेचे फायटर जेट पाडल्याचा इराणचा दावा

    इस्रायल आणि अमेरिकेकडूनही इराणवर भीषण हल्ले

  • 02 Mar 2026 05:30 PM (IST)

    दुबईत अडकले चंद्रपूरचे विद्यार्थी, सरकारकडे मदतीची मागणी

    इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे विद्यार्थी दुबईत अडकले

    युद्धामुळे विमान सेवा बंद

    विद्यार्थांकडून भारत सरकारकडे मदतीची मागणी

    दुबईच्या जबेल पोर्ट भागात अडकले विद्यार्थी

  • 02 Mar 2026 05:15 PM (IST)

    नागपुरात व्यापाऱ्यांनी केलं होलिका दहन

    नागपुरात व्यापाऱ्यांनी केलं होलिका दहन

    व्यापारी संघटना  नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सकडून  आयोजन

    व्यापाऱ्यांससाठी असलेल्या काही जाचक अटी आणि नियमांचं केलं होळीत दहन

    एकमेकाना रंग लावत दिल्या होळीच्या शुभेच्छा

    दरवर्षी व्यापाऱ्यांकडून होळी दहन केलं जातं

    मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचा सहभाग

  • 02 Mar 2026 04:54 PM (IST)

    सातारा : विमा कंपनीतील 21 जण दुबईमध्ये अडकले

    कराड मधील विमा अधिकारी पी व्ही जाधव यांच्यासह सहलीला गेलेले विमा कंपनीतील 21 जन दुबईमध्ये अडकून पडले आहेत. ते राहत असलेल्या हॉटेलमधून त्यांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण या हॉटेलच्या जवळच बॉम्ब ब्लास्ट झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

  • 02 Mar 2026 04:40 PM (IST)

    चंद्रपूर : दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांची केंद्राकडे मदतीची मागणी

    दुबईत अडकलेल्या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. युद्धजन्य भागातून मायदेशी परतण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची विनवणी त्यांनी केली आहे. दुबईच्या जबेल पोर्ट भागात हे विद्यार्थी अडकले आहेत. युद्ध किती दिवस चालेल हे सांगता येत नाही आणि मिसाईल व स्फोटाच्या आवाजांनी सर्वच दहशतीत आहे असं या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

  • 02 Mar 2026 04:27 PM (IST)

    सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावरून दरीत पडून मजूराचा मृत्यू

    सातारा शहरा लगत असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर दगड फोडण्याचे काम करणाऱ्या मजूराचा दोनशे फूट खोल दरीत पाय घसरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने दोनशे फूट खोल दरीतून मजूराचा मृतदेह बाहेर काढला आहे.

  • 02 Mar 2026 04:11 PM (IST)

    अमेरिका आणि इराणमधील युद्ध लवकर थांबणार नाही – डॉ. विजय खरे

    आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ. विजय खरे यांनी म्हटले की, अमेरिका आणि इराण मधील युद्ध लवकर थांबणार नाही. इराणमधील त्यांचे सर्वोच्च नेते गेल्यामुळे इराण पुढील काही दिवसात युद्ध अधिक आक्रमक होणार आहे. या युद्ध परिस्थितीत भारताला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. या युद्धाचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे.

  • 02 Mar 2026 03:55 PM (IST)

    डोंबिवलीत स्कायवॉकवर भरदिवसा चेन स्नॅचिंग

    डोंबिवलीत स्कायवॉकवर भरदिवसा चेन स्नॅचिंगचे प्रकरण समोर आले आहे. सतर्क रिक्षाचालकाच्या धाडसामुळे दोघे आरोपी जेरबंद. विष्णूनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  • 02 Mar 2026 03:45 PM (IST)

    बोईसर तारापूर एमआयडीसी पुन्हा एकदा दुर्घटना

    पालघर येथील बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. एमआयडीसीतील भगरिया केमिकल्स कंपनीत आगी नंतर गॅस गळती. ओलियम वायूची गती झाल्याने कामगारांसह स्थानिकांची पळापळ. बोईसर तारापूर एमआयडीसी दुर्घटनांच सत्र सुरूच

  • 02 Mar 2026 03:15 PM (IST)

    विवाहितेचा ‘सौदा’, इव्हेंटच्या नावाखाली दाेन लाखांत विक्री

    नाशिकमध्ये विवाहितेचा ‘सौदा’, इव्हेंटच्या नावाखाली दोन लाखांत विक्री केली आहे. पतीपासून विभक्त असलेल्या महिलेच्या हतबलतेचा गैरफायदा घेत दोन महिलांनी केली विक्री.

  • 02 Mar 2026 02:50 PM (IST)

    खामेनींच्या मृत्यूनंतर इराणनं आक्रमक, अमेरिकेच्या युद्धनौकेलाच निशाणा बनवलं

    खामेनींच्या मृत्यूनंतर इराणनं आक्रमक होत थेट अमेरिकेच्या युद्धनौकेलाच निशाणा बनवलंय. इराणी मिडीयानं केलेल्या दाव्यानुसार अब्राहम लिंकन युद्धनौकेवर इराणनं 4 मिसाईल्स डागल्या आहेत. दुसरीकडे सर्वात घातकी B-2 बॉम्बर विमान अमेरिकनं मैदानात उतरवलंय.

  • 02 Mar 2026 02:40 PM (IST)

    इराणमधील परिस्थिती चिंताजनक- IAEA

    इराणमधील परिस्थिती चिंताजनक. इराणमधील अणुकेंद्रांवर आमची नजर. इराणमध्ये आण्विक रेडिएशनचं संकट येऊ शकतं.  इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजंसिचा मोठा दावा. मोठ्या शहारांना रिकामं करावं लागण्याची शक्यता- IAEA

  • 02 Mar 2026 02:30 PM (IST)

    इजरायलच्या टार्गेटवर हिजबुल्ला चिफ

    इजरायलच्या टार्गेटवर हिजबुल्ला चिफ. जो खामेनाईच्या रस्त्यावर जाणार त्याला मारणार. हिजबुल्लाला मोठी किंमत चुकवावी लागेल. हिजबुल्ला चिफ नईम कासिम इजरायलच्या टार्गेटवर.

  • 02 Mar 2026 02:20 PM (IST)

    अमेरिकेकडून इराणच्या गॅस पाईपलाईनर हल्ला

    अमेरिकेकडून इराणच्या गॅस पाईपलाईनर हल्ला. अहवाजमधील गॅसच्या पाईपलाईनवर हल्ला. गॅस पाईपलाईनचं हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान.

  • 02 Mar 2026 02:10 PM (IST)

    सर तरुना ऑईल रिफायनरीवर ड्रोन हल्ला

    सर तरुना ऑईल रिफायनरीवर ड्रोन हल्ला. इराणकडून सौदीतील दुसऱ्या रिफायनरीवर हल्ला. आतापर्यंत इराणकडून ३ रिफायनरी लक्ष

  • 02 Mar 2026 01:59 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर विभागातील 51 नागरिक मध्य पूर्व देशात अडकले

    “छत्रपती संभाजीनगर विभागातील 51 नागरिक मध्य पूर्व देशात अडकले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यटक आणि विद्यार्थी आहेत आणि त्यांचा, त्यांच्या कुटुंबाशी संपर्क आहे. आम्ही सूचना केल्या आहेत, त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि राजकीय दूतावासांच्या संपर्कात राहावं. या मध्यपूर्वेत अडकलेल्या 51 नागरिकांच्या आकड्यात वाढ होऊ शकते. आमचे मध्यपूर्वेत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी आमच्याशी आणि संबंधित दूतावासांशी संपर्क साधावा,” असे आवाहन छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.

  • 02 Mar 2026 01:45 PM (IST)

    दुबईत अडकलेल्या मराठी बांधवांशी एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

    महाराष्ट्रातून दुबईत कामानिमित्त गेलेल्या पण युद्धामुळे अडकलेल्या मराठी बांधवांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आहे. दुबईत कामानिमित्त गेलेल्या ठाण्यातील एका तरुणाशी एकनाथ शिंदेंनी संवाद साधला. तिथली परिस्थिती घेतली जाणून त्यांनी सगळ्यांची माहिती मागवली आहे. एकनाथ शिंदे या सगळ्यांना एअरलिफ्ट करण्याची तयारी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 02 Mar 2026 01:35 PM (IST)

    आयआरजीचीचा अमेरिकन तेल टँकरवर मोठा हल्ला

    आयआरजीसीने अमेरिकन तेल टँकरवर मोठा हल्ला केला असून त्यात मोठी जीवितहानी झाल्याचा दावा इराणी रेव्होल्युशनरी गार्ड्सने (आयआरजीसी) केला आहे. या हल्ल्यांमध्ये तीन अमेरिकन आणि ब्रिटिश तेल टँकर्सना लक्ष्य करण्यात आलं होतं. बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन तळांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये शेकडो सैनिक मारले गेल्याचाही त्यांचा दावा आहे.

  • 02 Mar 2026 01:25 PM (IST)

    सततच्या हल्ल्यांदरम्यान दूतावासातील कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना सूचना

    कुवेतमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या सततच्या धोक्यात अमेरिकन दूतावासाने त्यांच्या नागरिकांसाठी सूचना जारी केली आहे. दूतावासातील कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना त्यांच्या घरांच्या सर्वांत खालच्या मजल्यावर लपण्याचा आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • 02 Mar 2026 01:15 PM (IST)

    दहशतवाद हा मानवतेसाठी मोठं आव्हान, चर्चेतून मार्ग काढला पाहिजे- मोदी

    भारत आणि कॅनडाचे चांगले संबंध आहेत. भारताला कॅनडा युरेनियम देणार. दहशतवाद हा मानवतेसाठी मोठं आव्हान आहे. चर्चेतून योग्य मार्ग काढला पाहिजे.

  • 02 Mar 2026 01:05 PM (IST)

    इराणचा इस्रायलवरचा आतापर्यंतचा सर्वात खतरनाक हल्ला, 9 ठार

    इस्रायलच्या एम्बुलेंस सर्विस नुसार इराणने इस्रायलच्या बेत शेमेश शहरावर हल्ला केला. यात कमीत कमी 9 लोक मारले गेले. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरु झाल्यानंतरचा इस्रायलवरील हा आतापर्यंतचा सर्वात खतरनाक हल्ला आहे.

  • 02 Mar 2026 01:00 PM (IST)

    मोबाईल चोरांचा सुळसुळाट पावणे तीन लाखांचा ऐवज चोरीला

    ठाणे रेल्वे स्थानकामध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट पावणे तीन लाखांचा ऐवज चोरीला. अवघ्या 48 तासात स्थानक परिसर आणि धावत्या लोकलमध्ये मोबाईल चोरीच्या तब्बल नऊ तक्रारी दाखल झाल्या आहेत. चोरट्याने अंदाजे दोन लाख 72 हजार रुपये किमतीचे 10 महागडे मोबाईल फोन लंपास केले आहेत. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान या चोरीच्या घटना घडल्या.

  • 02 Mar 2026 12:49 PM (IST)

    इराणचा इराकच्या एरबिल एअरपोर्टवर हल्ला

    इराकी एअर डिफेन्स सिस्टिम त्या मिसाइल्स आणि ड्रोन्सचा सामना करतेय जे एरबिल इंटरनॅशनल एअरपोर्ट लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतायत. रॉयटर्स न्यूज एजन्सीनुसार, उत्तर इराकच्या कुर्दिस्तान भागात एरबिल एअरपोर्टजवळ तीन सशस्त्र ड्रोन्स पाडले.

  • 02 Mar 2026 12:35 PM (IST)

    बहरीनमध्ये रेड अलर्ट, ब्रिज बंद केला

    बहरीनच्या गृह मंत्रालयाने एअर रेड अलर्ट एक्टिवेट केला आहे. लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितलं आहे. शेख खलीफा बिन सलमान ब्रिज बंद करण्यात आला आहे. लोकांना गरज पडल्यास महत्वाच्या रस्त्यांचा वापर करण्यास सांगितलं आहे.

  • 02 Mar 2026 12:26 PM (IST)

    काल दुबई आज कुवैत टार्गेट

    इराणने काल दुबईवर हल्ले केले. आज त्यांनी कुवैतवर निशाणा साधला. कुवैतमध्ये आज F-15 फायटर जेट पाडलं. नंतर अमेरिकी दूतावासाला टार्गेट केलं.

  • 02 Mar 2026 12:14 PM (IST)

    इराणच्या नव्या सुप्रीम लीडरचाही मृत्यू का?

    इराणचे नवीन सुप्रीम लीडर अली रेजा अराफी यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेच्या माजी NSA ने केला आहे. त्याआधी राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी काल सांगितलं की, अमेरिकी आणि इस्रायली हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर नव्या परिषदेने आपलं काम सुरु केलं आहे.

  • 02 Mar 2026 11:58 AM (IST)

    सोलापूर – कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी बोंबाबोंब आंदोलन

    सोलापूर –  कांद्याला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून  बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आंदोलन सुरु आहे.  कांद्याला साडेचार हजार हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

  • 02 Mar 2026 11:39 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या मोठी घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या मोठी घसरण. सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची चांदीच्या दरात 7 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

    सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 70 हजार 465 रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 96 हजार 640 रुपयांवर पोहोचले.

  • 02 Mar 2026 11:31 AM (IST)

    कुवेतमध्ये अमेरिकेचं F-15 फायटर जेट पाडलं

    इराणनं अमेरिकेचं लढाऊ विमान पाडल्याचा दावा करण्यात येत आहे.  कुवेतमध्ये अमेरिकेचं F-15 फायटर जेट पाडलं. इराणच्या ड्रोननं लढाऊ विमान पाडलं असा दावा करण्यात येत आहे.

  • 02 Mar 2026 11:21 AM (IST)

    बीड – सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून सोने लुटणारी टोळी जेरबंद ;

    सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून सोने लुटणारी टोळी बीड पोलिसांनी जेरबंद केली . 21 फेब्रुवारी रोजी दिघोळ आंबा रोडवर एका सराफा व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यात तिखट चटणी टाकून चाकूचा धाक दाखवत सोने लुटून पोबारा केला होता.

    8 दिवसांच्या कालावधीत तपासाची चक्र फिरवत बीड पोलिसांनी या टोळीला अटक करून लुटण्यात आलेलं सोनं जप्त केलं.

  • 02 Mar 2026 11:11 AM (IST)

    इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाचा मुंबईतील हवाई वाहतुकीला मोठा फटका

    मध्य पूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाचा मोठा फटका मुंबईतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला बसला आहे.  मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणारी रविवार आणि सोमवारची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे विमानही सुरक्षिततेसाठी अर्ध्यातून पुन्हा मुंबईला वळवण्यात आलं.

  • 02 Mar 2026 10:56 AM (IST)

    इस्त्रायलच्या यरुशलमध्ये इराणकडून मिसाईल हल्ले, ६ जण जखमी

    इस्त्रायलच्या यरुशलमध्ये इराणकडून मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. या मिसाईल हल्ल्यात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 02 Mar 2026 10:47 AM (IST)

    अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात 48 तासांत इराणचे मोठे नुकसान, 48 नेते ठार

    अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये गेल्या ४८ तासांत इराणचे अतोनात नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे ४८ प्रमुख नेते आणि ४० प्रमुख लष्करी कमांडर मारले गेल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या नऊ युद्धनौका बुडवण्यात आल्या आहेत. तसेच इराणच्या नौदल मुख्यालयाचेही मोठे नुकसान झाले आहे.

  • 02 Mar 2026 10:37 AM (IST)

    फिरण्यासाठी गेलेले शहापूरमधील २५ हून अधिक पर्यटक दुबईत अडकले

    इराण इस्त्रालय युद्धामुळे शहापूरमधील २५ हून अधिक पर्यटक दुबईत अडकले. एका टूर कंपनीसोबत दुबईला गेले होते. दुबईमध्ये विमानसेवा बंद असल्याने पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

  • 02 Mar 2026 10:27 AM (IST)

    आम्ही ट्रम्पला मारु इच्छित नाही – इराण

    डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणने प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही ट्रम्पला मारु इच्छित नाही, असे इराणने म्हटले आहे.

  • 02 Mar 2026 10:26 AM (IST)

    खामनेईंनी मला मारलं असतं – डोनाल्ड ट्रम्प

    मी आयातुल्ला अली खामेनेई यांना मारलं नसंत तर खामनेईंनी मला मारलं असतं, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. खामनेईंनी मला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

  • 02 Mar 2026 10:16 AM (IST)

    दुबईत कार्यक्रमासाठी गेलेले जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिक अडकले

    अमेरिका इराण युद्धात होणाऱ्या हल्ल्यामुळे दुबईत जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिक अडकले. विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी गेलेले ३१ जण युद्धामुळे दुबईत अडकून पडले आहेत. सध्या हवाई हल्ल्यामुळे दुबई येथून विमानसेवा बंद झाल्यामुळे सर्व जण अडकले असून ते हॉटेलात सर्व जण सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे .दोन दिवसापासून सततच्या होत असलेल्या हल्ल्यामुळे दुबईतील पर्यटन स्थळ तसेच सार्वजनिक ठिकाण बंद करण्यात आल्याची माहिती देखील नागरिकांनी दिली आहे.

  • 02 Mar 2026 10:06 AM (IST)

    यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील पोलिसांची मुलगी दुबईत अडकली, अचानक फ्लाईट रद्द झाल्याने फटका

    यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या रवी जाधव यांची कन्या जागृती जाधव दुबईत अडकली. ती दुबईला एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलो होती. जागृती जाधव ही 1 मार्चला फ्लाईटने भारतात येणार होती, मात्र वेळेवर फ्लाईट रद्द झाल्याने ती दुबईत अडकली असून सध्या ती सुरक्षित असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

  • 02 Mar 2026 09:55 AM (IST)

    भारतीय दूतावासाच्या महत्वाच्या सूचना..

    भारतीय दूतावासाने युद्ध सुरू असलेल्या ठिकामी अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी काही सूचना केल्या आहेत. जिथे आहात तिथे सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

  • 02 Mar 2026 09:50 AM (IST)

    भारताचे इराणच्या युद्धावर बारीक लक्ष

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे युद्ध थांबवण्याची मागणी केली असून इस्त्रायलच्या पंतप्रधानांसोबत फोनवर चर्चा देखील केल्याची माहिती मिळत आहे.

  • 02 Mar 2026 09:40 AM (IST)

    इराण आणि मध्य पूर्वेतील हवाई वाहतूक बंद

    युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि मध्य पूर्वेतील हवाई वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 3 मार्चपर्यंत ही हवाई वाहतूक बंद राहण्याचा एक अंदाज आहे.

  • 02 Mar 2026 09:30 AM (IST)

    प्री शेअर मार्केट कोसळले…

    सध्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत मोठे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर बघायला मिळत आहे. प्रीशेअर मार्केट कोसळल्याचे दिसत आहे.

  • 02 Mar 2026 09:20 AM (IST)

    दुबईतील इराणी हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    दुबईमध्ये इराण सतत हल्ले करत आहे. दुबईतील इराणी हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुबई विमानतळावरही मोठा हल्ला करण्यात आला.

  • 02 Mar 2026 09:05 AM (IST)

    इराणचे समर्थक आणि सुरक्षा दलामध्ये मोठी चकमक

    इराणचे समर्थक आणि सुरक्षा दलामध्ये मोठी चकमक झाली. काल इराणी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. अमेरिका आण इस्त्रायलच्या निषेध केला जात होता.

  • 02 Mar 2026 08:55 AM (IST)

    नाशिक महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प आज होणार सादर

    नाशिक महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीकडे  अंदाजपत्रक सादर केला जाणार आहे. चार वर्षानंतर स्थायी समितीच्या सभापतीकडे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 3200 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंदाजपत्रकात शहरातील पायाभूत विकास काम आणि येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देखील विकास निधुची तरतूद असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

  • 02 Mar 2026 08:45 AM (IST)

    “मुंबई चायनीज ग्रील” हॉटेलवर मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याकडून हल्ला

    छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील बीड बायपास रोडवरील “मुंबई चायनीज ग्रील” हॉटेलवर मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याने हल्ला करत तोडफोड केली. सीसीटीव्ही कॅमेरे, फ्रिजसह साहित्याचे नुकसान करण्यात आले. ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून सातारा पोलीस ठाण्यात 8–10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

  • 02 Mar 2026 08:43 AM (IST)

    इस्रायल-इराण युद्धाचा फटका पुणेहून आखाती देशात जाणारी विमाने रद्द….

    अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे…. अमेरिका, इस्राएल आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धाची धग आता संयुक्त अरब अमिरातीतील दुबई पर्यंत पोहचली आहे. इराणने दुबईसह काही देशांत ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे आखाती देशातील बहुतांश सर्वच विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. पुण्यातून काल आणि आज दुबईला जाणारे विमाने रद्द करण्यात आली आहेत….

  • 02 Mar 2026 08:31 AM (IST)

    इराण–इस्राईल युद्धामुळे दुबईतील बंदर व्यवहार ठप्प

    नाशिक – द्राक्ष व कांदा निर्यात बंद झाली आहे… यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसणार आहे. रमजान काळात आखाती देशांत भारतीय द्राक्ष व कांद्याला मागणी वाढली पण, इराण–इस्राईल युद्धामुळे दुबईतील बंदर व्यवहार ठप्प झाले आहेत. विमानतळ व बंदर वाहतूक बंद झाल्याने निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. मागणी वाढूनही भारतीय निर्यातदारांना शेतकऱ्यांना फायदा नाही. दुबईमध्ये शेतमालाचे दर एका रात्रीत तिप्पट वाढले आहेत.  भारतातून द्राक्ष व कांदा, पाकिस्तानातून बटाटे-मिरची पुरवठा थांबला आहे.  युद्धामुळे दुबईत कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली असून  नाशिकच्या निर्यातदारांकडे चौकशी वाढली, पण पुरवठा अशक्य झाला आहे.

  • 02 Mar 2026 08:28 AM (IST)

    अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम पर्यटनावर

    छत्रपती संभाजीनगर :  अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम पर्यटन क्षेत्रावरही दिसू लागला असून, परदेशात पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांच्या परतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विमानसेवा विस्कळीत होणे आणि काही विमानतळांवरील उड्डाणे रद्द झाले आहेत,  त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील सुमारे 150 पर्यटक दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.  याशिवाय विविध देशांतील विमानतळांवरही काही प्रवासी अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 02 Mar 2026 08:26 AM (IST)

    इराणने कुवैतमध्ये अनेक ड्रोन डागले

    इराणच्या सौन्याने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. इराणने कुवैतमध्ये अनेक ड्रोन डागले आहे. अमेझॉनच्या क्लाउड युनिट, AWS ने दिलेल्या माहितीनुसार, UAE मधील त्यांच्या एका डेटा सेंटरच्या Availability Zone वस्तू पडल्याने ठिणग्या आणि आग लागली, ज्यामुळे तात्पुरती वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे. कनेक्टिव्हिटी पुनर्संचयित करण्यासाठी काही तास लागू शकतात. तर इतर झोन सामान्यपणे कार्यरत आहेत… अशी देखील माहिती समोर येत आहे.

  • 02 Mar 2026 08:18 AM (IST)

    लेबनॉनमध्ये परिस्थिती गंभीर, इस्रायली सैन्याने अनेक शहरे रिकामी करण्याचं आवाहन

    इस्रायली सैन्याने सुरक्षेच्या कारणामुळे लेबनॉनच्या 50 शहरांना रिकामे करण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य लष्करी संघर्ष लक्षात घेता सैन्याकडून आवाहन करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने लेबनॉनच्या भूमीवरून कारवाया सुरू केल्या आहेत.

Published On - Mar 02,2026 8:14 AM

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.