US-Israel Iran News LIVE : युद्धात सामील होण्यास नकार दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ब्रिटिश पंतप्रधानांवर भडकले
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला असून, पश्चिम आशियात युद्ध भडकले आहे. इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून जागतिक तेल आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. युद्धासंबंधी आणि देशातील, राज्यांमधील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या या ब्लॉगमध्ये...

पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील थेट लष्करी संघर्ष सुरु आहे. २८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील लष्करी तळ, क्षेपणास्त्र केंद्रे आणि अण्वस्त्र प्रकल्पांना टार्गेट केले. इराणनेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलसह आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या युद्धामुळे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या संघर्षाचा परिणाम केवळ आखाती देशांवरच नाही, तर जागतिक शेअर बाजार, सोन्याचे दर आणि कच्च्या तेलाच्या किमतींवरही होत आहे. या युद्धामुळे विमान सेवांवर मोठा परिणाम झाला असून दुबई, सौदी आणि कुवेतला जाणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत. भारतासह जगभरात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. या युद्धाची प्रत्येक ताजी अपडेट, दोन्ही देशांच्या लष्करी हालचाली आणि भूमिका जाणून घेण्यासाठी आमच्या या लाईव्ह ब्लॉगला फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
भाजपकडून राज्यसभेच्या नऊ उमेदवारांची नावे जाहीर
भाजपने सहा राज्यांमधून राज्यसभेच्या नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन आणि शिवेश राम यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. संजय भाटिया यांना हरियाणामधून, राहुल सिन्हा यांना पश्चिम बंगालमधून, लक्ष्मी वर्मा यांना छत्तीसगडमधून, मनमोहन शामल आणि सुजित कुमार यांना ओडिशामधून, तारश गोवाला आणि जगनमोहन यांना आसाममधून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
-
युद्धात सामील होण्यास नकार दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ब्रिटिश पंतप्रधानांवर भडकले
इराणविरुद्ध अमेरिकेच्या युद्धाला पाठिंबा देण्यास नकार दिल्याबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यावर टीका केली आहे. ते मदत करत नाहीत, मला कधीच वाटले नाही की ते असा निर्णय घेतील असं ट्रम्प यांनी म्हटले आहे.
-
-
पंढरपूर : सांगोला चौकात ट्रॅफिक पोलिसांवर गंभीर आरोप
पंढरपूरमध्ये सांगोला चौकात ट्रॅफिक पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘नो-एन्ट्री’ कारवाईदरम्यान ट्रक चालकाकडून 2 हजार रुपये रोख घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पावती न देता रक्कम घेतल्याची चालकाने तक्रार दिली आहे.
-
परभणी : नवरचना विद्यालयात कचऱ्याची होळी
परभणी येथील नवरचना विद्यालयात परिसरातील कचरा गोळा करून होळी करण्यात आली आहे. निसर्गाच भान आणि जाण जपून येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. येथे नेहमीच मुलीच्या हातानेच होळी पेटवली जाते. नैसर्गिक रंगाचीच उधळण येथे रंगपंचमीला केली जाते.
-
होळीनिमित्त ठाण्यात गौतमी पाटीलचा डान्स
ठाण्यात नगरसेवक अभिजीत पवार आयोजित रंग दे कळवा या होळीच्या कार्यक्रमाला गौतमी पाटीलने नृत्य सादर केले. यावेळी गौतमी पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचे चरण स्पर्श केले. आव्हाडांनी देखील गौतमी पाटीलला रंग लावत होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल गौतमने आव्हाडांचे आभार मानले.
-
-
पुणे, जळगावमध्ये अडकलेले 42 पर्यटक सुखरुप परतले
दुबईमध्ये अडकलेले जळगाव याबरोबरच पुण्यातील ४२ पर्यटक सुखरूप आज विमानाने मुंबईत परतले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दुबईत अडकलेल्या पुणे आणि जळगाव येथील पर्यटकांसाठी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली होती
-
दुबईत अडकलेल्या राज्यातील नागरिकांसाठी सरकारची मदत
दुबईत अडकलेल्या राज्यातील नागरिकांसाठी सरकारची मदत.. केंद्र सरकारसोबत समन्वय साधत सर्वतोपरी मदत करण्याची तयारी… संबंधित यंत्रणांमार्फत सर्व नागरिकांशी सातत्याने संपर्क सुरु… उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची ट्विट करुन माहिती…
-
दोहामधील भारतीय दुतावासाकडून भारतीयांसाठी सूचना जारी
दोहामधील भारतीय दुतावासाकडून भारतीयांसाठी सूचना जारी… अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, दूतावासाचं आवाहन… केवळ अधिकृत आणि विश्वसनीय माहितीवरच विश्वास ठेवा’- भारतीय दूतावास..
-
दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी
दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी…अबुधाबीहून पहिले विमान बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर दाखल….तर दुबईवरुन दिल्ली विमानतळावर पहाटे विमान दाखल….
-
युद्धामुळे केळी निर्यात ठप्प; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका
जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या निर्यातक्षम केळीने गेल्या वर्षी जागतिक बाजारपेठेत भक्कम स्थान निर्माण केले होते. २०२५ मध्ये तब्बल १० हजार कंटेनर्सची विक्रमी निर्यात झाल्याने कृषी अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली होती. सध्या देखील दररोज सुमारे २० कंटेनर केळी आखाती देशांकडे पाठवली जात होती. मात्र इराण, इज्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. केळी निर्यात ठप्प झाल्यामुळे किडी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
-
खामेनींच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारचं मौन का?
खामेनींच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारचं मौन का?, ही तटस्थता नसून, य़ाला जबाबदारीपासून पळ काढणं म्हणताच… अमेरिका-इस्रायल युद्धावरुन सोनिया गांधींचा निशाणा
-
जालना रोडवर मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग
छत्रपती संभाजीनगर मधील जालना रोडवर भीषण आग लागली. ही आग मंडप डेकोरेशनच्या गोदामाला लागली. या आगीत मंडप डेकोरेशनचे संपूर्ण सामान जाळून खाक झाले. सध्या घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहचल्या असून आग विझवण्यात येत आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाही.
-
आमदार नारायण कुचेंचा पारंपरिक लेंगी नृत्यावर डान्स
बदनापूर अंबड मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी आज अंबड तालुक्यातील विविध तांडा वस्तीवर जाऊन बंजारा समाज बांधवाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा असलेल्या होळीचा उत्सव साजरा केला. तसेच धुलिवंदनाचा आनंद घेतला.या वेळी बंजारा बांधवसोबत नारायण कुचे यांनी पारंपरिक असलेल्या लेंगी नृत्यावर ठेका धरला.
-
इराणमध्ये भूकंपाचे धक्के
इस्त्रायल आणि इराण युद्ध सुरु असताना इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणच्या गिराश परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
-
तरुणाईची चिखलात धुळवड
रंगात रंगुनी रंग माझा वेगळा धुळवडीच्या निमित्ताने सर्वत्र उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातून शहरांमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी धुळवडीच्या निमित्ताने चिखलामध्ये मनसोक्त आनंद लुटला. मातीशी आमचं घट्ट नातं आहे त्यामुळे आम्ही या सणाचा आनंद घेत आहोत अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
-
वाळू तस्करांची फौजदाराला जीवे मारण्याची धमकी
रॉयल्टी बाबत विचारणा केली असता वाळू तस्करांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील फौजदाराला धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे. माहूर पोलीस ठाण्यात चार जणांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
भविकांना मारल्यावर कोण दर्शनाला येईल-छगन भुजबळ
त्र्यंबकेश्वर मंदिर मारहाण प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. भविकांना मारल्यावर कोण दर्शनाला येईल, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. भाविक चुकला तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे. मारहाण केल्यावर कुप्रसिद्ध मिळते, असे भुजबळ म्हणाले.
-
जेव्हीपीडी ग्राउंडवर होळीचा उत्सव
मुंबईतील जुहू येथील जेव्हीपीडी ग्राउंडवर होळीचा उत्सव सुरू झाला आहे. बॉलिवूड डीजे गाण्यांवर तरुणी होळीच्या रंगात नाचत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उत्सवात सहभागी होऊ शकतात.
-
कोकणातले खेळे (गोमू आणि संकासुर) आज विरार मध्ये अवतरले आहेत
होळी आणि रंगपंचमी ची कोकणातील संस्कृतीचे आज दिवसभर दर्शन होणार असून, कोकणच्या खेळ्यांचा भोवनीचा नाच विरारकर अनुभवणार आहेत. आगळा वेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी ही गर्दी केली आहे.
-
विद्यार्थी सुखरूप भारताकडे रवाना
पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टेडीजचे ८४ विद्यार्थी सहलीसाठी दुबईला गेले होते. मात्र ते अडकून पडल्याने त्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला होता. आता हे सर्व विद्यार्थी हॉटेल मधून विशेष बसने दुबई विमानतळाकडे रवाना झाले असून, त्यांनी दुबई सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
-
झाडावर विमान आदळले नाही-छगन भुजबळ
मी गेलो होतो तिथं,विमान झाडावर आदळले नाही. तिथे कुणीही असे म्हटले नाही. मलाही आश्चर्य वाटलं झाडावर आदळले. जर विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान झाले असता ना असे छगन भुजबळ म्हणाले.
-
रंगकर्मी धुळवडीला थोड्याच वेळात होणार सुरूवात
मुंबई ठिकठिकाणी रंगपंचमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. हाच उत्साह आणि आनंद आपल्याला लाडक्या कलाकारांमध्येही पहायला मिळतोय. गेल्या 12-13 वर्षापासून आपले सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन हा रंगपंचमीचा आनंद साजरा करतात. रंगकर्मी धुळवडीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे.
-
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था
इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार असून संध्याकाळी 164 नागरिक मुंबईत दाखल होणार आहेत.
-
दुबईत अडकलेल्या उमरगा येथील ज्येष्ठ नागरिकांशी आमदार प्रवीण स्वामी यांनी साधला संपर्क
युद्धजन्य परिस्थितीमुळे उमरगा शहरातील चार ज्येष्ठ नागरिक दुबई येथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर उमरगा-लोहरा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी संबंधित नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. प्रशासनाकडून लवकरच त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार स्वामी यांनी दिली.
-
ग्रहणामुळे धुळवडच्या कोंबड्या विक्रीला फटका
धुळवड निमित्ताने मटण आणि कोंबड्यांवर ताव मारला जातो, मात्र धुळवडच्या दिवशीच ग्रहण आल्याने त्याचा फटका कोंबड्या विक्रीला बसल्याचं पाहायला मिळतंय. धूळवड निमित्ताने सांगलीत ठीक-ठिकाणी देशी कोंबड्याला मोठी मागणी असते,कोंबड्यांचे दर देखील मटणापेक्षा अधिक आहेत. पाचशे रुपयांपासून तब्बल 1500 पर्यंत कोंबड्यांचा दर आहे. मात्र धुळडच्या दिवशीच ग्रहण आल्याने कोंबड्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने, त्याचा फटका कोंबड्या विक्रीवर झाल्याचे पाहायला मिळतोय. विटा या ठिकाणी चौका चौकात कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रेते दाखल झाले होते, मात्र कोंबड्या खरेदीला ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
-
केज तालुक्यातील विडा गावातुन धुलीवंदनानिमित्त जावयाची गदर्भ सवारी, 90 वर्षांपासूनची परंपरा कायम
बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे गेल्या 90 वर्षांपासून कुठलाही एक जावई शोधून गावात आणला जातो आणि त्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. आनंतराव देशमुख यांनी 90 वर्षांपुर्वी स्वतः च्या जावयाची चेष्टामस्करीत गाढवावरून मिरवणूक काढली होती, तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. दरवर्षी आठ दिवस अगोदर पासूनच जावयाच्या शोधासाठी गावातील तरुण फिरत असतात. यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढून कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते. मात्र यावर्षी सोन्याचे भाव वाढल्याने केवळ कपड्याचा आहेर जावयाला दिला जाणार आहे. स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावर्षीचा मान शिवाजी गालफाडे या जावयाला मिळाला.
-
जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गांजाची तक्सरी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई
जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गांजाची तक्सरी करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन वाहनासह गांजा जप्त, जप्त गांजाची किंमत लाखो रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
-
पुण्यात सकाळपासूनच धुलिवंदनाचा रंगोत्सव उत्साहात…
पुण्यात सकाळपासूनच धुलिवंदनाचा रंगोत्सव उत्साहात सुरु आहे. लहान मुलांना पासून युवकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. पुण्यात सर्वत्र जोष जल्लोष आणि उत्साह धुळवडीच्या निमित्ताने तरुण-तरुणीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने विशेष मुलांसाठी तसेच तरुण तरुणींसाठी भव्य रंगोत्सवाचे आयोजन केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, महापौर मंजुषा नागपूर धुलिवंदन महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.
-
आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यतील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले
आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यतील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले. दुबई सरकारकडून अडकलेल्या भारतीयांची मोफत राहण्याची व्यवस्था केली आहे. विमा कंपनीतर्फे आयोजित कॉन्फरन्ससाठी सोलापूरसह राज्यभरातील 370 विमा प्रतिनिधी 27 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 43 लोकांचा समावेश आहे. हे सर्व विमा प्रतिनिधी आज मायदेशी भारतात परतणार होते मात्र इराण-इजराईल युद्धमुळे भारतकडे येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द झालेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत या सर्व लोकांना दुबईतच थांबावं लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या विमा प्रतिनिधिनी केलीय.
-
अमेरिकन दूतावासावर अत्यंत मोठा हल्ला
इराणकडून साैदीतील अमेरिकन दूतावासावर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. अमेरिकन दूतावासावर एका मागून एक हल्ले केली जात आहेत.
-
गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई
दोन वाहनासह गांजा जप्त, जप्त गांजाची किंमत लाखो रुपये असल्याची माहिती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांची संयुक्त कारवाई. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत
-
दुबईत अडकलेल्या भारतीयांना राज्य सरकारची मदत
दुबईत अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी राज्य सरकार पुढे सरकले असून राज्य सरकारकडून मदत पोहोचवली जात आहे.
-
इराणकडून फतेह 2 मिसाईलचा वापर
इराण, अमेरिका आण इस्त्रायल यांच्यातील युद्ध पेटले असून इराणकडून थेट फतेह 2 मिसाईलचा वापर हल्ला करण्यासाठी करण्यात आला आहे.
-
इराकमध्ये लोक आक्रमक अमेरिकन दूतावास कार्यालय टार्गेटवर
इराकमध्ये लोक आक्रमक झाले असून अमेरिकन दूतावास कार्यालयावर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. अमेरिकेन दूतावास कार्यालयाला टार्गेट केले जात आहे.
-
मध्यपूर्व आशियात बुलढाण्याचे सहा नागरिक अडकले; जिल्हा प्रशासनाकडून संपर्काचे आवाहन
मध्यपूर्व आशियातील विविध देशांमध्ये विमान सेवा रद्द झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सहा नागरिक तिथेच अडकून पडले आहेत. सायली दांडगे, रमेश उबरहंडे, गणेश उबरहंडे, बद्रीश्वर पवार, डॉ. पूजा लोखंडे आणि काश्मिरा शाह अशी या व्यक्तींची नावे आहेत. या परिस्थितीची दखल घेत बुलढाणा जिल्हा प्रशासनाने तातडीने या सर्वांशी संपर्क साधला असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. परदेशात अडकलेल्या या नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास त्यांनी तातडीने संबंधित देशातील भारतीय दूतावासाशीसंपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन दरवाढीची टांगती तलवार; मुंबईत सध्या पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
इराण आणि इस्रायलमधील लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत सध्या पेट्रोलचे दर १०३ रुपये ५० पैसे तर डिझेलचे दर ९० रुपये प्रति लिटरवर स्थिर असले तरी, येत्या काळात यात मोठी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आखाती देशांतील तणावामुळे इंधन आयातीचा खर्च वाढल्यास त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होईल, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. सध्यातरी देशांतर्गत किमती ‘जैसे थे’ असल्या तरी जागतिक घडामोडींमुळे इंधन दरवाढीचे संकट गडद होत आहे.
-
युद्ध लवकर थांबणार नाही, अमेरिका प्रदीर्घ लढाईसाठी तयार; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य करताना हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. हे युद्ध लवकर थांबणार नाही. ते किमान आणखी चार ते पाच आठवडे सुरू राहू शकते,” असे स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. इराणच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका प्रदीर्घ काळ लष्करी मैदानात उतरण्यास सज्ज आहे, असा इशाराही त्यांनी दिला. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
-
पुणे जिल्ह्यातील १२३ नागरिक दुबईत सुरक्षित, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने मोठी माहिती दिली आहे. १ ते २ मार्च दरम्यान दुबईत अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील एकूण १२३ नागरिकांशी जिल्हा प्रशासनाने यशस्वीरित्या संपर्क साधला असून, हे सर्व नागरिक सुरक्षित असल्याची खात्री पटली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे की, आखाती देशात असलेल्या आपल्या नातेवाईकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती हवी असल्यास किंवा मदतीची गरज असल्यास तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
-
आखाती देशातील युद्धाचा नाशिकच्या कांदा आणि द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका
पश्चिम आशियातील युद्धाचे पडसाद आता थेट महाराष्ट्रातील शेतीवर उमटू लागले आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे नाशिकच्या कांदा आणि द्राक्ष निर्यातीला मोठा ब्रेक लागला आहे. सध्या JNPT (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) बंदरावर नाशिकहून आलेले कांदा आणि द्राक्षाचे तब्बल २०० कंटेनर अडकून पडले आहेत. शनिवारी रात्रीपासून दुबई बंदरावर नवीन रजिस्ट्रेशन बंद झाल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
-
दुबईत अडकलेल्या शेकडो भारतीयांची सुखरूप घरवापसी; विशेष विमानाने मुंबईत आगमन
पश्चिम आशियातील युद्धाचा वणवा पेटल्यानंतर दुबई विमानतळावर झालेल्या हल्ल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तिथे अडकलेल्या भारतीय प्रवाशांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. दुबई विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द झाल्याने शेकडो भारतीय प्रवासी तिथेच अडकून पडले होते. या प्रवाशांची दोन दिवस स्थानिक हॉटेल्समध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेऊन भारत सरकार आणि अमिरेट्स (Emirates) विमान कंपनीच्या समन्वयाने एका विशेष विमानाचे आयोजन करण्यात आले. हे विशेष विमान आज पहाटे ३ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. आपल्या मायदेशात सुखरूप पोहोचल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, अनेकांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.
-
सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर इराणचा भीषण ड्रोन हल्ला; इमारतीला मोठी आग
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाचा बदला घेण्यासाठी इराणने आक्रमक पाऊल उचलले असून, सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य केले आहे. इराण समर्थित गटांनी केलेल्या या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात दूतावासाच्या इमारतीचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे यापरिसरात भीषण आग लागली आहे. या हल्ल्याच्या वेळी दूतावास रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे, मात्र या घटनेमुळे आखाती देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
Published On - Mar 03,2026 7:58 AM
